Saturday 11 April 2020

फक्त जय हिंद म्हणा ना रे

lokshaahichaa pahaarekri, लोकशाहीचा पहारेकरी

आज महात्मा फुलेंची जयंती. त्यांना मनपूर्वक अभिवादन. १४ एप्रिलला बाबासाहेबांची जयंती त्यांनाही आजच अभिवादन. त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेबद्दल कोणालाही शंका असण्याचे कारण नाही. परंतु
मोदींनी १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले तेव्हा अनेकांनी मोदींवर दलितद्वेषाचा शिक्का मारला. अनेकांनी 'बाबासाहेबांची जयंती साजरी करता येऊ नये म्हणून मोदींनी मुद्दाम असे केले' असे विष ओकले.   या लॉक डाऊनच्या काळातच राम नवमी येत होती, हनुमान जयंती येत होती. परंतु कोणाही हिंदूने  हे उस्तव साजरे करता येणार नाहीत म्हणून दुःख व्यक्त केले नाही . मग आता जातीयवादी कोणाला ठरवायचे?

आज महात्मा फुल्यांच्या जयंतीनिमित्त शीतल साठे आणि सचिन माळी यांचा महात्मा फुल्यांच्या जीवनावर आधारित स्फूर्तिगीतांचा कार्यक्रम होता. त्यांनी सुरुवात केली, "जय ज्योती, जय क्रांती, जय भीम....... आपण सगळे महात्मा फुल्यांची आणि बाबासाहेबांची लेकरे आहोत. आम्हाला फुल्यांच्या, बाबासाहेबांच्या विचारांची गरज आहे... "

माझ्या मनात विचार आला, "आम्ही फुल्यांची, बाबासाहेबांची लेकरे का? छत्रपती शिवाजी महाराजांची लेकरे का नाही? स्वातंत्र्यवीर सावरकरांची लेकरे का नाही.... त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे सगळे 'बाप' बाजूला  ठेवून, "आम्ही सर्व या भारतभूची लेकरे आहोत." असे म्हटले तर काय बिघडेल? मी आजवर कोणत्याही हिंदू वक्त्याला, 'आम्ही याच्या पोटचे, आम्ही त्याच्या पोटचे.' असे संबोधताना पाहिले नाही. मग या महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेदरकरांचा सवतासुभा कोणी उभा केला? कोण जातीय वाद पेरतं आहे? कोण माणसामाणसात पाचर ठोकत आहे?"

मागे एका दलित कवीच्या कवितेत लाल किल्ल्यावर निळा झेंडा फडकवला पाहिजे अशी ओळ वाचली? का रे बाबा? तिरंगा काय चांगला दिसत नाही का?

सगळे प्रश्नच आहेत माझ्यासमोर? कोण देईल याची उत्तरे? कोण माणसातल्या माणुसकीला खतपाणी घालेल. देशाच्या सीमेवर लढणारा सैनिक भगव्या, हिरव्या, निळ्या अशा कोणत्याही झेंड्यासाठी लढत नाही. त्याचा झेंडा एकच. तिरंगा. मग आम्ही का मिरवतो आहोत आमच्या खांद्यावर असे वेगवेगळ्या रंगाचे झेंडे.

पुरे झालं शाहू, फुले, आंबेडकर. फक्त जय हिंद म्हणा ना रे.

6 comments:

  1. अगदी योग्य विचार मांडताय सर तुम्ही.

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनपूर्वक धन्यवाद.

      Delete
  2. Replies
    1. भोयरसाहेब नमस्कार. तुमचा अभिप्राय आला पोस्टवर. आनंद वाटला.

      Delete
  3. So true sir! जयहिंद!!

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनपूर्वक धन्यवाद.

      Delete