Saturday 6 June 2020

सीझर आणि जोडवी

vijay shendge images
हिंदू धर्माला, हिंदू श्रद्धांना, हिंदू रितीरिवाजांना वेड्यात काढण्यात अनेकांना धन्यता वाटते. दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ चालवली म्हणून देशातली अंधश्रद्धा दूर झाली असे काही नाही. आणि दाभोळकरांनी अवतार घेतला नसता तर आजही लोक गळ्यात काळ्या बाहुल्या बांधून फिरले असते असे नाही. माझी श्रद्धा आहे. परंतु अंधश्रद्धा मी देखील मानत नाही. माझ्यावर अंधश्रद्धा मनू नये हे संस्कार करायला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कोणी कार्यकर्ता आलेला नाही. 

काल वटपौर्णिमा होतो. आणि एका मुलीची वडाला फेऱ्या मारणाऱ्या बायकांचे नवरे मरत नाहीत का?
आशा आशयाची पोस्ट होती. अर्थात ती मुलगी हिंदू धर्मीय नव्हती. इतर धर्मातील मंडळींना हिंदू धर्मावर, हिंदू धर्मातील चालीरीतींवर, हिंदू देवतांवर, टिका करण्यात असुरी आनंद मिळतो. पण तसे केल्याने हिंदू धर्माला कमीपणा येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आयुष्य वेचलं. आणि आता पुन्हा हिंदू धर्माचं रक्षण करण्याची वेळ आली आहे.

आज आपण गणित तज्ज्ञ म्हणून रामाजुन यांचे नाव घेतो, शून्याचा शोध आर्यभट्टांन्नी लावल्याचे सांगतो, पाणिनींना व्याकरणाचे आद्य प्रवर्तक मानतो, इतर धर्मियांना यापैकी कशाचाही गंध नव्हता. आणि तरीही आज हिंदू धर्माची पीछेहाट होते आहे. याला जबाबदार कोण? आम्हीच. आम्ही माणूस म्हणून जगण्याची हाकाटी देतो. परंतु आम्ही फक्त जगतो. अनेकांचा धर्माला काही उपयोग नाही, माणसाला काही उपयोग नाही. ते फक्त जन्माला येतात जगतात आणि आकाशातून पडणारी उल्का आकाशातच जळून राख व्हावी तसे संपून जातात.   

हिंदुधर्म शास्त्राधारित आहे. आणि तो तसा आहे म्हणूनच भारतात आणि हिंदू धर्मात अनेक विचारवंत होऊन गेले. हिंदू धर्म हाच मूळ आहे. आणि कोणी काहीही केलं तरी हिंदू धर्म टिकून राहणार आहे. इतकेच नव्हे तर आज ना उद्या सगळे पुन्हा हिंदू धर्मात विलीन होतील. दक्षिण अमेरिकेत हिंदू धर्म रुजतो आहे. हजारो  अमेरिकन हिंदू धर्माची दीक्षा घेत आहेत. 

असो मुद्दा तो. मुद्दा आहे हिंदू धर्मातील चालीरितींचा. प्रामुख्याने स्त्रियांच्या बाबतीत तर कपाळावर कुंकू लावण्यापासून, पायावर जोडवी घालण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीला शास्त्राधार आहे. तीन चाळीस वर्षांपूर्वी कोणत्याही स्त्रीचं बाळंतपण सीझर करून करण्याची वेळ यायची नाही. परंतु आजकाल निम्म्याहून अधिक बाळंतपण सीझर करून करावे लागते. का? 

विवाहित महिला पायांच्या बोटांमध्ये चांदीची जोडवी घालतात. परंपरा, प्रथा म्हणून जोडीवी घातली जात असली तरी त्यामागे काही आरोग्यविषयक कारणे आहेत. जोडवे पायाच्या अंगठ्याच्या बाजूच्या बोटांमध्ये घातले जाते. चांदीचे जोडवे अ‍ॅक्युप्रेशरचे काम करतात. यामुळे तळव्यापासून नाभीपर्यंतच्या सर्व नसांना फायदा होतो. तसेच पायाच्या बोटांचा संबंध पोट आणि गर्भाशयाशी असतो. जोडवे धारण केल्याने या नसांवर दबाव पडतो. यामुळे पोट आणि गर्भाशय निरोगी राहते. इतकंच नव्हे तर जोडवी महिलांची प्रजनन क्षमता वाढवतात. तसेच चांदी ही चंद्राशी संबंधीत असते. चंद्र हा मनाचा कारक आहे. हे धारण केल्याने मानसिक शांतता लाभते. गर्भधारणेसाठी पृथ्वीतत्व म्हणजे मुलाधारचक्र प्रभावित होणे गरजेचे असते. पायातील पैंजण, कडि, कमरेवरील मेखला हे अलंकार पृथ्वितत्व जागृतीचे अलंकार आहेत. 

जोडवी वापरण्याची प्रथा आजही आहे. परंतु माझ्या आजीची जोडवी बोटा एवढी जाड होती. आईच्या पायात करंगळीच्या जाडीची जोडवी असत. आणि आता त्याची जाडी आणखीनच कमी झाली असून चांदीचा दोरा बोटाभोवती गुंडाळलेला असावा असे वाटते. आता कोणी म्हणाले कि स्त्रिया गपचूप घराच्या बाहेर निघाल्या तर आवाज व्हावा म्हणून त्यांच्या पायात जोडवी, पैंजण घातले जात असत. तर तसे मुळीच नाही. हे नक्की.   

No comments:

Post a Comment