Tuesday, 11 March 2014

Love poem : तुझ्यापेक्षा...........

पावसाळ्याचे दिवस. काळे ढग..... गार वारा आणि तिची वाट पाहत थांबलेला तो. कित्ती वेळाची वाट पाहतोय तो तिची. पण ती येत नाही. पाऊस मात्र बरसतोच आहे रिमझिम.…………रिमझिम. पाऊस बरसतोय   आभाळातून आणि त्याच्या डोळ्यातूनही.

फार फार राग येतो त्याला तिचा.
नेहेमीच उशीर. उशीर करायचा आणि ओठावर एक गुलजार, खट्याळ हसू घेऊन यायचं. तिचं ते खट्याळ हसू पहिलं कि त्यानं सारं विसरून जायचं. तिला झालेला उशीर......त्याच्या जीवाची झालेली तगमग…………. युगायुगा एवढा भासलेला प्रत्येक क्षण……… सारं सारं विसरायचं त्यानं.

सारं सारं विसरायचं आणि तिचं हसू झेलायचं.

जुन्या कितीतरी भेटी त्याला आठवतात. तिचा मागमूसही नसतो वाटेवर. रिमझिमणारे डोळे सुकून गेलेले असतात. पाऊस मात्र बरसतच असतो. झाडाच्या पानापानातून त्याला कवेत घेतो.

तेव्हा त्याला वाटत तिच्यापेक्षा पाऊसच बरा. तो नेहमीच आपली सोबत करतो. ती सोबत असते तेव्हाही आणि ती सोबत नसते तेव्हाही. म्हणून  तो म्हणतो -


4 comments:

  1. अनघा कुलकर्णी5 September 2014 at 18:04

    छोटी पण गोड कविता .

    ReplyDelete
  2. अनघा तू अलिकडे नियमित प्रतिक्रिया देतेस. असंच पाठबळ हवं.

    ReplyDelete
  3. खुप मस्त.

    ReplyDelete
  4. चिन्मय तुमच्या नियमित प्रतिक्रिया पाहून लिहिण्याचा खुप हुरूप येतो.

    ReplyDelete