Saturday, 8 March 2014

Women's Day : तू स्वप्नं....तूच सत्य

तुला खूप राग येत असेल नाही आमचा ........ आमच्या संस्कृतीचा..........आमच्या परंपरेचा ? वर्षानुवर्षे
संस्कृतीच्या कोणत्या जोखडात जखडून टाकलंय आम्ही तुला ? शहरात तरी
तुझ्या विचारांना, कर्तुत्वाला काहीसा वाव मिळतोय, पण खेड्यात..............तू जुंपलेली असतेस घाण्याला अहोरात्र.

खरंतर तू या विश्वाचा आस..........
तू आम्हा साऱ्यांच्या जगण्याचा ध्यास..............
तू स्वप्नं, जगण्याला उमेद देणारी.............
तू सत्य, वास्तवाचं भान देणारी ..........
तू आभाळ, पंखाला बळ देणारं  ..........
तूच माती, थकल्यानंतर आधार देणारी.

खूप लिहायचं होतं. पण थांबतोय.................
तुझ्यातल्या मायेला सलाम करून.

2 comments:

  1. khupach khare lihile aahes....! sree che man achuk janale aahes....!!!! Nice poem... Vijay...!

    ReplyDelete
  2. समिधा प्रतिक्रियेबद्दल आभार. आईशिवाय आपण नाही हे प्रत्येकाला माहित असतं. अगदी पट्टीच्या गुन्हेगारालाही. त्यामुळेच जेव्हा समाज प्रत्येक स्त्रीत आई पहायला शिकेल. अगदी आपल्या बायकोत आणि प्रेयसीतही. तेव्हाच समाज स्त्रीचा आदर करू लागेल.

    ReplyDelete