Friday 28 March 2014

Love Poem : ती सोबत नव्हती म्हणुनी

उन्हाळा सरतो. आभाळात काळे ढग जमू लागतात. उन्हाची झळ कमी होते. गार वाऱ्याची झुळूक मन उल्हासित करते. मग सहाजिकच तिला घेऊन डोंगर दऱ्यात............. गार वाऱ्यात.............पावसाच्या धारात  जावं असं त्याला वाटतं. त्याचं हे असं आभाळासारख भरून आलेलं मन तो तिच्या जवळ मोकळं करतो. तीही त्याच्या सुरात सूर मिसळते. आणि मग मित्र मैत्रिणीन सोबत डोंगर दऱ्यात जाऊन पाऊस होण्याचा बेत ठरतो.
ठरल्यावेळी.............ठरल्या ठिकाणी सारे जमतात. हा आला ............. तो आला ............. ती आली ............... तीही आली..........पण ती कुठाय ?


तो बेचैन. काय करावं ? मग तिला फोन. तिचं कारण .............नेहमीचंच. " बाबा नको म्हणाले."

तो हिरमुसलेला. आता कशाला जायचं पावसात ? ती नाही सोबत, मग रिमझिमणाऱ्या धारात चिंब कसं होता येईल आपल्याला ? कोणाच्या काळ्याभोर केसातून ओघळणार पाणी घेणार आपण ओंजळीत ? आपल्या वाफाळलेल्या चहाच्या कपातला घोट कोणाला देणार आपण ? आपल्या प्लेट मधली गरम भजी खाताना कोण भांडणार आपल्याशी ? नकोच ! जाऊच नये आपण मित्रांसोबत. असे असंख्य विचार त्याच्या मनात. पण सगळ्यांच्या आग्रहासमोर काहीच चालत नाही त्याचं. मग तो बळेच जातो त्यांच्या सोबत.

तो जातो खरा त्यांच्या सोबत. धापा टाकत सगळे डोंगर माथ्यावर पोहचतात. पण कसला पाऊस आणि कसलं काय ? सगळीकडे लख्ख उन. त्याच्या पोळलेल्या मनाला चटके देणारं. ऐन पावसाळ्यातही डोंगरमाथ्यावर चक्कं रखरखतं उन. त्याला वाटतं ती सोबत नाही म्हणुनच पाऊस आला नाही.

पण घरच्यांची परवानगी घेवून ती उशिरा का होईना ती डोंगरमाथ्यावर पोहचते. आणि ती जेव्हा दूर वाटेच्या वळणावर दिसते तेव्हा त्याच्या ओठांवर तर हसू फुलतच पण आकाशातला ढगांचं  रूप घेवून आलेला घननीळ कृष्णही हसू लागतो .................... टपोऱ्या थेंबांच रूप घेवून तिला स्पर्शु पाहतो.

या साऱ्याची हि कविता - ' ती सोबत नव्हती म्हणुनी '

 

1 comment: