सकाळी सकाळी चिरंजीव म्हणाले, "बाबा आज आईचा दिवस आहे ना."
मला संदर्भ लक्षात येईना. बायको म्हणाली, "बघ येतंय का बाबांच्या लक्षात!"
तरीही मला काही धागेदोरे लागेनात. शेवटी चिरंजीव म्हणाले, "अहो, बाबा आज मदर्स डे आहे ना."
बायको किचनमध्ये फोडणी टाकत होती. तिला जोरदार ठसका येत होता. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे गॅससमोर उभी राहून ती घामेघूम झालेली होती. मदर्स डे असला काय, वुमन्स डे असला काय आणि
पत्नी डे असला काय तिची किचनच्या ठसक्यातून सुटका होत नसते. माझ्या बायकोची तरी अशी सुटका वैगेरे करून घेण्याची इच्छा नसते. मला कोणत्याही 'डे' चं फारसं कौतुक नाही. अगदी 'फादर्स डे' चं आणि 'मॅन डे' चं देखील.
तरीही आज काही महिलांचनी 'हॅपी मदर्स डे' म्हणत शुभेच्छा दिल्या. आता 'मदर्स डे' च्या शुभेच्छा महिलांनी मला का पाठवाव्यात? हे मला न उलगडलेले कोडे आहे. कदाचित यात औपचारिकतेचा भागच अधिक असतो. महिला तर महिला, काही पुरुषांनी सुद्धा मला 'मदर्स डे' च्या शुभेच्छा दिल्या. आता हे का? तेही कोडंच. कदाचित प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष दडलेला असतो, आणि प्रत्येक पुरुषात एक स्त्री अर्थात आई सुद्धा दडलेली असावी म्हणून असेल कदाचित. परंतु मी, महिलांना 'स्त्री हि क्षणाची बाई आणि चिरकालीन आई असते.' म्हणत तुम्हालाही मदर्स 'डे' च्या शुभेच्छा म्हणत आलेल्या शुभेच्छांची परतफेड केली.
मुळात आपण परस्त्रीकडे पाहताना तिच्यातली बाई शोधण्यापेक्षा तिच्यातली आई शोधली पाहिजे. ज्या दिवशी तसा दिवस येईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने 'मदर्स डे' साजरा झाला, असे म्हणावे लागेल. पण तसे होणे कठीणच. काही मंडळी आईसोबतचा डिपी ठेवतील, अनेकजण आईविषयीचे स्टेट्स ठेवतील. पण खरंच कितीजण आईचा मनापासून आदर करतात. आम्ही शहरात वावरणारी मंडळी कमीत कमी 'हॅपी मदर्स डे' म्हणत आईचा हातात हात तरी घेतो. तिचा डिपी ठेवतो. काहीतरी स्मरणात राहील असं स्टेटस ठेवतो. पण खेडेगावातल्या आयांची काय अवस्था असते याचा मी फार जवळून अनुभव घेतला आहे. गरिबा घरीही आईला देवपण मिळतेच असे नाही.
कालच गावाहून एका मित्राचा फोन आला. आमक्या आमक्याच्या म्हातारीने विहिरीत उडी घेऊन जीव दिला. 'मदर्स डे' च्या पूर्वसंध्येला हि घटना घडली होती. का अशी वेळ येते एका आईवर? कोण जबाबदार याला?
माहेरचं आणि सासरचं नाव लावायची पद्धत आली. कोणी आणली हि पद्धत? जिजाऊंनी नाही आणली, येसूबाईंनी नाही आणली, अहिल्याबाई होळकरांनी त्यांचं माहेरचं शिंदे हे आडनाव कधी लावलं नाही. माझ्या माहितीप्रमाणे सुधा मूर्ती सुद्धा माहेरचं नाव लावत नाहीत. मग हि माहेरचं नाव लावायची पद्धत आणली कोणी?
आपल्या नावासोबत आईचे नाव लावण्याची आणखी एक फॅशन आली आहे. कशासाठी? आईचा विसर पडू नये, असा हेतू त्यामागे असेल तर तो चुकीचाच आणि आणि जगासमोर आपल्या आईचे नाव मिरवावे या हेतूने कोणी तसे करत असेल तर तेही अनावश्यक. कारण असे काहीही करून आईच्या उपकारातून कधीही उतराई होता येत नाही. सणसुद जसे साजरे केले जातात तसे हे दिवस साजरे केले जातात. वूमन्स डे आहे म्हणून कोणी बायकोच्या पुढ्यातील भांड्याचा पाळा ओढून घेत नाही. स्त्री हि ईश्वराची अशी निर्मिती आहे, कि तिच्याविषयी नियमित आदर बाळगायला हवा. आई म्हणून तिच्याकडे आदराने पहायला हवं. परंतु बाई म्हणून सुद्धा तिच्याकडे आदरानेच पहायला हवं. मात्र एखादा पुरुष एखाद्या स्त्रीकडे प्रेमभावनेने पहात असेल तर तो त्या स्त्रीचा आदर करत नाही असंही नाही म्हणता येणार. त्याचवेळी अनेक पुरुषांना स्त्रीविषयी आदर राखून प्रेम करता येत नाही हेही वास्तव आहे.

अभिप्रायाबद्दल मनापासून आभार.
ReplyDelete