कॉलेजच्या धुंद वातावरणात ती भेटते. फुलासारखे फुलायचे ..... फुलपाखरासारखे फुलांवर झुलायचे हे दिवस. खट्याळ.....उनाड...... स्वछंदी...... आनंदी......स्वप्नाळू......हळवे.
वारं प्यालेल्या खोंडासारखं हे आयुष्य. पण हे असं उनाड, खट्याळ, स्वछंदी आयुष्य ओंजळीत घ्यायला ती पुढं येते. आपल्याही नकळत आपण तिचे होतो. इतके कि आयुष्य म्हणजे फक्त ती..... दुसरं काही नाही. अशी आयुष्याविषयीची आपली व्याख्या निचित होते.
तिचे डोळे .... तिचे ओठ ...... तिचा स्पर्श ...... तिचा सहवास ........झोपेमध्ये तिची स्वप्नं ...... जागेपणी तिचा ध्यास. आपलं अस्तित्वच हरवून बसतो आपण. आपल्या आयुष्याला फुटलेल्या या नव्या अंकूरांनी मोहोरून जातो आपण.
पण....कुणास ठाऊक काय घडतं. तिचं कि आपलं कुणास ठाऊक कुणाचं, पण कुणाचं तरी चुकतं. रुसवा ..... अबोला ........ दुरावा ........आणि आपल्या आयुष्याचे असंख्य तुकडे. सारं काही ओंजळीतून विखुरलेलं. जणू आपलं आयुष्य ....... आपल्या आयुष्याची स्पंदनंच हरवलेली. आता हे सारं शोधायचं कुठं ? कुणाच्या डोळ्यात ? कशाच्या आधारावर जगायचं यापुढ ? प्रश्न ........प्रश्न ....... आणि फक्त प्रश्न. एका देवदासला पडलेले.
No comments:
Post a Comment