झाडं काय खातात ? हे आपण विज्ञानात शिकलेलो आहोत. झाडं मुळांद्वारे
क्षार आणि पाणी घेतात. हवेतील कार्बनडाय ऑकसाईड आणि सूर्यप्रकाश यांच्या
मदतीने हरितद्रव्याचे पृथ्थकरण करतात. हे सगळं आपल्याला माहित आहे. काही झाडंतर कीटक खाऊन उदरनिर्वाह करतात हेही आपल्याला माहित आहे.
पण झाडं
लोखंडही खातात हे आपल्याला माहित काय ? मी माझ्या शेजारील शेतात असं झाड
पाहिलं आहे. हा लोखंड खाण्याचा प्रकार म्हणायचा कि अन्य काही हे आपण
ठरवायला हवं.
झाला काय होतं. शेजारील शेतकऱ्याने त्याची विहिरीतली मोटर
( पाण्याचा विजेवर चालणारा पंप ) विहिरीच्या शेजारील झाडाला तारेने जखडून
टाकला होता. झाडाच्या खोडाभोवती आदीच तीन मिलीमितारच्या जाडीच्या तारेचे
चांगले बोटभर जाडीचे वेटोळे घातलेले. ही घटना चारपाच वर्षापूर्वीची.
परवा मी ते झाड जवळून पाहिलं तेव्हा लक्षात आलं पूर्वी खोडाच्या वरील बाजूने असलेले तारेचे वेटोळे आता बोटभर खोडात शिरलेले आहेत. वरून खोडाच्या सालीचा एकसंध लेप तयार झाला आहे. मी त्या एकसंध खोडावरील काही भाग खोलवर टोकरून पाहिलं तेव्हा लक्षात आलं कि आतील बोटभर जाडीचे तारेचे वेटोळे विरघळून गेले आहेत. म्हणूनच मी आजच्या पोस्टला नाव दिलंय - लोखंड खाणारं झाड. अर्थात कोणत्याही झाडाभोवती करकचून तारेचा असा विळखा घातला ते प्रत्येक झाड अशाच रीतीने ती तर खाऊन टाकेल हे नक्की.
आज दुसरा कुठलातरी चांगला विषय डोक्यात आला नाही का ?
ReplyDeleteआभार यतिनजी. आज पहिल्यांदा तू मला माझ्या ब्लॉगवर प्रतिक्रिया दिली आहेस. यापुढे इथे आणि अशाच प्रतिक्रिया मिळतील हि अपेक्षा. आणि अगदी प्रांजळ प्रतिक्रिया दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार. मी मुद्दामच हि पोस्ट टाकली. मला पहायचं होतं मी असलं काही लिहिला तर माझ्या रसिक वाचकांना काय वाटतं ते. ठीक आहे यापुढे अशा प्रकारचं काही लिहिणार नाही.
ReplyDeletemahiti aavadali..
ReplyDeletewe city people don't know anything like this haapens .. thanks for tyhe info. keep posting like this ..
some addn info ..
मित्रा प्रतिक्रियेबद्दल आभार. हे सारं गंम्मत म्हणुन लिहिलं. छाया चित्रं वास्तव असली तरी माझ्या लिखाणाला शास्त्रीय आधार नाही.
ReplyDelete