जगभरातल्या तमाम अनिवासी भारतीयांना माझा मनापासून सलाम. मेडिसन स्केवर इथं त्यांनी सादर केलेल्या नृत्य आणि संगीताच्या कार्यक्रमाची एक छोटीशी चित्रफित इथं देत आहे. कदाचित अनेकांनी ती पहिली असेल. ज्यांना पुन्हा पहावीशी वाटत असेल त्यांच्यासाठी आणि ज्यांनी पहिलीच नसेल त्यांच्यासाठी.
मोदींनी अमेरिकेत हिंदीतून भाषण केलं. त्यासंदर्भातली बातमी ABP माझानं फेसबुकवर अपलोड केली. त्या बातमीला अनेकांच्या प्रतिक्रिया होत्या. पण अनेकांच्या प्रतिक्रिया मान घाली घालायला लावतील अशा होत्या. अशी मंडळी फेसबुकच्या व्यासपीठावर पाहिली की
हेच का आमच्या देशाचं भविष्य असा प्रश्न पडतो. अर्थात अशा प्रतिक्रिया देणारे बरेचजण शिवसेनेचे पाठराखे होते. त्यामुळं सहाजिकच त्या प्रतिक्रियांना आणि त्या प्रतिक्रिया देणाऱ्यांना फारसं गृहीत धरावसं वाटलं नाही.
भाषेचा अभिमान असणं यात गैर काय ? अमेरीकेतलीच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात भूषणावह कामगिरी करणारी आमची भारतीय पिढी सातासमुद्रापलिकडे राहुन मायभूमीवर, मातृभाषेवर. या मातीतल्या संस्कारांवर जीवापाड प्रेम करताना पाहिलं कि अक्षरशा भरून येतं. त्यामुळेच मी माझ्या ब्लॉगवर मे महिन्यात पोस्ट केलेली ' माझ्या मराठी मातीला ' हि कविता त्या सर्वांना अर्पण केली होती.
परवा अमेरिकेत त्याच मंडळीनी ज्या उस्फुर्तपणे मोदींच स्वागत केलं ते पाहुन त्यांना मनापासून सलाम करावासा वाटला. अर्थात त्या घटनेला दहा दिवस होऊन गेले. मग मी आज इतक्या उशिरा का जागा झालोय असा प्रश्न अनेकांना प्रश्न पडला असेल. तर मित्रहो गेली पाचसहा दिवस मी शेतावर होतो. तिथं संगणकच नाही. त्यामुळे आज पुण्यात आलो आणि लगेच लिहायला बसलो.
गाण्यांची चपखल निवड, कार्यक्रमाचं आखीव नियोजन आणि देशप्रेम अशा तीनही सुत्रात बांधलेला हा कार्यक्रम. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे भारतीय सरकारकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत न घेता केलेला.
नाही तर आम्ही. साधा आपल्या चौकातला गणेशोत्सव साजरा करायचा म्हणलं कि राजकीय पुढाऱ्यांच्या समोर हात पसरणार. हे पुढारीही आपण फार मोठे दानशूर असल्याचा आव आणत आपल्या डोक्यावर उपकारच ओझं ठेवणार.
लेख छानच. त्यांचं कौतुक करून तूनही छान औचित्य साधलत.
ReplyDeleteविनय प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.
ReplyDelete