Tuesday, 14 October 2014

Shiv sena, BJP, Indian Politics : खुर्ची दिसते चोहीकडे

खरंतर आज लिहिणारच नव्हतो. कारण मी इथं महिनाभर ओरडुन सांगतोय, " बाबा उद्धवा. तुझं चुकतंय रे. " पण तो ऐकेल तर खरं ना ! 

तो तिकडं घसा फोडुन एवढंच सांगत सुटलाय,
" त्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला. ", " ज्यांना नाथाभाऊ म्हणालो त्यांनीच लाथ घातली. "  " त्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला. ", " ज्यांना नाथाभाऊ म्हणालो त्यांनीच लाथ घातली. " " त्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला. ", " ज्यांना नाथाभाऊ म्हणालो त्यांनीच लाथ घातली. " …………………………


विकासाविषयी शब्द नाही. नुसतं हेरीटेज कायदा, संत विदयापीठ, घुमान येथील नामदेवांचे राष्ट्रीय स्मारक, वारकरी भवन, सागरी मार्ग, उद्यानं. याला विकास म्हणतात ? आमच्या तरुणांना रोजगार कसा मिळेल ? शेतकऱ्यांना वीज आणि पाणी कसं मिळेल ? याविषयी चकार शब्द नाही. काही झालं कि एकच महाराष्ट्रभर व्हर्चुअल क्लासरूम उभारणार. लातूरमधल्या बीडमधल्या तरुणांना तिथेच शिक्षण घेऊन मुंबई पुण्यातली पदवी मिळणार. पण मुलांना पदवी मिळणं फारसं कठीण नाही. नौकऱ्या मिळत नाहीत हे काही ते लक्षातही घ्यायला तयार नाहीत. म्हणजे काँग्रेसन - राष्ट्रवादीन एका तऱ्हेन शिक्षणाचा बाजार मांडला हे दुसऱ्या तऱ्हेन मांडणार. नुसतं काय ! तर म्हणे, " आनंदीबेन आल्या. त्यांनी महाराष्ट्रातल्या उद्योगपतींना गुजरातला येण्याचं आव्हान केलं आणि मोदी त्यांना काहीच म्हणाले नाहीत. " अरे तुम्ही बोलवा ना उद्योगपतींना महाराष्ट्रात. तुम्ही दया ना आव्हान इतर राज्यांना. पण नाही आम्ही फक्त एकाच विचार करत आलो महाराष्ट्राला कुठल्या बाजुनी आणि कसं खावा. आहो जिला आपण अर्धांगिनी म्हणतो त्या बायकोलाही काही कमी पडलं ती माहेरचा रस्ता धरते. हे तर उद्योगपती आहेत. त्यांना काहीतरी कमी पडलं म्हणुनच ते तुस्र्या राज्यात गेले ना ? कि मोदींनी त्यांना लाच देऊन हाताला धरून नेलं. 

उद्योगपती म्हणजे काय कुकुलं बाळ आहेत का कि त्यांना चॉकलेटच आमिष दाखवुन मांडीवर घ्यावं आणि हवं तिथं न्यावं. 

परवा एका भाषणात राज ठाकरे सांगत होते, " मी लातुरला गेलो होतो. तिथं एक हॉटेल होतं. छोटसं तीस चाळीस खोल्यांचं. पण त्या हॉटेलमुळे लातूरमधल्या ३०० मुला मुलींना तिथे काम मिळालं. आता मला सांगा राज्यभर अशी हॉटेल बांधली तर किती जणांना रोजगार मिळेल. पण नाही आमची इच्छाशक्ती नाही. "

रोजगार निर्मितीचा हा फंडा पटतोय का हो तुम्हाला ? असले फंडे मांडण्या अगोदर राज ठाकरेंनी आज महाराष्ट्रात किती हॉटेल आहेत. तिथं किती तरुणांना काम मिळालंय. त्यातले कायम स्वरूपी किती, हंगामी किती त्यांना शासकीय नियमानुसार सर्व सोयी सुविधा मिळतात का ? खुप गोष्टी आहेत. 

परवा मुंबईतल्या एका सभेत ठाकरे पिता - पुत्रांना पार कंबरेत वाकुन जमिनीला नाक घासताना पाहिलं. स्वर्गीय बाळासाहेबांनी तर सोडाच पण अन्य कोणत्याही नेत्यानं व्यासपीठावरून इतका लाळघोटेपणा केल्याचं मी तरी पाहिलं नाही. पण मोदींनी संसदेत दंडवट घातला म्हणुन यांनी इथं. बरं व्यासपीठावरील इतरांनी का नाही हो दंडवट घातला. हे दोघे पितापुत्र का पुढे ? कारण आपण नजरेत भरलो पाहिजे ना ! किती ठरवुन करायचं सारं. सत्तेसाठी किती हा ढोंगीपणा. आजवर आपण कुणी यांना अशा रीतीने वाकलेलं पाहिलं आहे का आठवा. 

जाऊ दे ! कोळसा कितीही उगाळा. काळा तो काळाच.  असे गल्लोगल्ली किती उमेदवार उंबऱ्यावर नाक घासतात आणि किती जण लहानाथोरांच्या पायावर डोकं ठेवतात हे आम्ही वर्षानुवर्ष पहात. पण झालं काय त्या पितापुत्रांना येवढं वाकुन गेलेलं पहिल्यापासून आमच्या मनात फक्त एकच विचार माणुस सत्तेसाठी किती हपापलेला असतो नाही. आणि मग त्या क्षणापासून आमच्या मनातया राजकीय वात्रटीकेनं घर केलं. पण जमेना. आज सकाळी अंथरुणातुन बाहेर पडल्यापासून तिनं आमचा पिच्छा पुरवला. 

वात्रटिका तर लिहुन झाली पण. आमच्या नेहमीच्या रीतीप्रमाणे तिच्यासाठी चपखल चित्र हवं होतं. ते तयार केलं. आणि आता पोस्ट करतो. 
पण पोस्ट करण्याआधी एक विनंती - मी गेली महिनाभर शिवसेनेवर, काँग्रेसवर, राष्ट्रवादीवर, मनसेवर टिका करतोय. म्हणजे तुम्ही भाजपाला मतदान करा असं मुळीच सांगणार नाही. 

माझा निर्णय मी घेतलाय. तुमचा तुम्ही घ्या. पण मतदान जरूर करा. 


आणि हो, हि वात्रटिका आवडली तर प्रतिक्रिया नक्की नोंदवा.


खुर्ची दिसते चोहीकडे


आनंदी आनंद गडे
खुर्ची दिसते चोहीकडे
उगाच का ही सरते पुढे
मज आशेला जाती तडे

मज दुसरे काही कळेना 
खुर्चीवरुनी नजर ढळेना
इकडे तिकडे नजर वळेना
मद्याविना नशा चढे
खुर्ची दिसते चोहीकडे 

खुर्चीविना होईल हसे
खुर्ची माझ्या मनी वसे
खुर्ची नसता लागेल पिसे
स्वप्न मला हो एक पडे
खुर्ची दिसते चोहीकडे

खुर्ची नाही भास जरा हो
खुर्ची माझा श्वास खरा हो
खुर्चीपुढे हि क्षुद्र धरा हो
ऐका माझे बोल खडे
खुर्ची दिसते चोहीकडे

नका करू हो विचार कोता
तुम्हीच माझे माय नी पिता
तुमच्या चरणी माझा माथा
माझ्या उराशी तुमचे जोडे
खुर्ची दिसते चोहीकडे 

6 comments:

  1. केशव पवार14 October 2014 at 17:37

    प्रति रामदास फुटाणे. ग्रेट.

    ReplyDelete
  2. मी एवढा थोर नाही केशवजी. मी अत्यंत सामान्य कवी आहे. लोकांना आवडतं हाच माझा आनंद. कुणी माझी अशी एवढ्या मोठ्या माणसाशी तुलना करू नये. आपले आभार.

    ReplyDelete
  3. thackrey kutumbawar tumcha rag disto .. ani khanjir khupsala he sangne bhagch hote karan modina sarwat adhipasun thackrey yanchich pathimba dila agdi 2002 chya danglit sudha ..,, ajhi fadanvis kiwa khadse yanchyakade baghun nahi modinekade baghun matdan zale ,, ani vidarbhat weglya widarbhachya muddyawarun ... ani swatache jiwawar 63 amdar anle he kai kami kele ?? ani udhav thackreykade rajkiy praglbhata nasel modi , shaha , pawaranchya tulnet , pan ji iccha shakti ahe , management ahe tyache kai ?? ... cm bananyadhi modi yani konte vidhansabheche bhushawale hote ??...

    ReplyDelete
  4. प्रणवजी प्रतिक्रियेबद्दल आभार. मी स्वतः शिवसैनिक आहे हे आपणास पटणार नाही. परंतु पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत माझी सख्खी भिन आणि भाऊ नगरसेवक आहेत. त्यामुळेच मी शिवसेनेच्या विरोधात लेखण करण्याचे काहीच कारण नाही. उद्धव ठाकरेंनी पाच जागा कमी घेऊन १४५ जागा लढवल्या असत्या तर काय झाले असते. आज २२० आमदारांश युती सत्तेत राहिली असती आणि हा सगळा तमाशा झाला नसता. पण आज शिवसेना भाजपा युती असती तर मी युतीचीच बाजु उचलून धरली असती. माझ्या लेखांचे समर्थन करणारे अनेकजण आहेत. आपण डोळसपणे विचार करा. आणि भाजपानं या पाच वर्षात काही भरीव नाही केलं तर मी त्यांच्यावरही टीका करायला कमी करणार नाही.

    ReplyDelete
  5. प्रत्येक वेळी शिवसेनेवर टीका काय करताय .....
    तुम्ही एकूण घ्या.....जर बापाकडून चूक झालीतर बाप बदलण्याची आमची परंपरा नाही.........
    मी सांगतो कि, भाजप हराम खोर पक्ष आहे,
    राष्ट्रवादी वर टीका करायची अणि त्यांचाच पाठींबा घ्यायचा हा कसला प्रकार........

    जर तुम्हाला टीका करायची हौस असेलतर खुशाल करा, तुम्ही कितीही टीका केलीतर तुम्हाला फक्त आणि फक्त शिव्याच भेटतील .....
    शिवसेनेत काल हि होतो , आहे आणि राहीन ..........
    जय शिवसेना........

    ReplyDelete
  6. राहुलजी माझ्या सगळ्या पोस्ट वाचा. म्हणजे माझे म्हणणे आपल्या लक्षात येईल. आणि असे अपशब्द वापरून काहीच उपयोग नाही.

    ReplyDelete