Friday 24 October 2014

BJP, Shiv sena : लाचार उद्धव ठाकरे आणि स्वाभिमानी शिवसैनिक

लोकसभा निवडणुका पार पडल्या. पाठोपाठ विधानसभा निवडणुका आल्या. प्रंचंड चर्चा झाली. युती तुटली, आघाडीची घडी विस्कटली. कधी नव्हे अशी निवडणुक मतदारांना  पहायला मिळाली. पाच प्रमुख पक्ष रिंगणात होते. त्या संदर्भात मी लिहिलेली ' विधानसभेला दिवस गेले ' हि राजकीय वात्रटिका लिहिली. रसिकांना ती खुप आवडली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी खूप आटापिटा केला आणि ते पदरात पडत नाही असं पहाताच युती तुटेल अशी वेळ आणली. मुख्यमंत्रीपदाची हाव जेवढी
उद्धव ठाकरेंना होती तेवढीच अजित पवारांना. उद्धव ठाकरेंप्रमाणेच त्यांनीही मुख्यमंत्रीपद वाट्याला येत नाही हे पहाताच आघाडी मोडीत काढली. हे सगळं पाहून मी ' आनंदी आनंद गडे ' या बालकवींच्या कवितेचा मुखडा घेऊन ' खुर्ची दिसते चोहीकडे ' हि राजकीय वात्रटिका लिहिली.तिलाही रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ' पंडित नेहरू ते आदित्य ठाकरे ' हा कवितावजा लेखही खुप गाजला.


मतमोजणी पार पडली. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांना बहुमत मिळालं नाही. सत्ते स्थापनेसाठी कुणाचा तरी पाठींबा घेणं आवश्यक ठरलं. समयसुचकता दाखवत शरद पवारांनी भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी असल्याचं जाहीर करून टाकलं. उद्धव ठाकरे मात्रं ' मी काय माझा फॉर्म्युला घेऊन कुणाच्या मागे फिरू काय ? त्यांना माझा पाठींबा हवा असेल तर त्यांनी प्रस्ताव घेवून आमच्याकडे यावं आम्ही त्या प्रस्तावावर विचार करू. ' एवढंच म्हणत राहिले. पण सत्तेचा वाटा आपल्या हातून निसटतोय असं पहाताच. पावसाची वाट पहाणारा शेतकरी जसा आशाळभूतपणे आभाळाकडे पाहतो तसे दिल्लीकडे पाहु लागले. कारण सत्तेचा वाटा ' आत्ता नाही तर कधीच नाही ' हे त्यांना कळून चुकलं असेल.

माझ्या या विधानावर अनेक शिवसैनिक माझ्याशी नक्कीच भांडतील. त्यांचं माझ्याशी भाडंणं चुकीचं नाही असं  मी मानतो. कारण शिवसेनेवर आणि शिवाजी महाराजांवर शिवसैनिकांची जेवढी श्रद्धा आहे उद्धव ठाकरेंची जेवढी नसावी असं  मला वाटतं. कारण फेसबुकच्या माध्यमातून भाजपावर आणि मोदींवर टिकेची झोड उठवणारे शिवसैनिकांना शिवसेनेचा सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय फारसा रुचलेला नाही. त्यामुळेच मोदींवर टीका करणारे शिवसैनिक आज उद्धव ठाकरेंना ' लाचार ' म्हणताहेत. 

पण मित्रांनो उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा नाही. परंतु हा दिवस येऊ येऊ शकतो आपल्याला भाजपा बरोबर जाण्याची वेळ येऊ शकते याचा कुठलाही विचार न करता त्यांनी ज्या अपरिपक्वपणे भाजपावर टिका केली ते चुकीचं होतं. त्यांची हि वर्तणूक उद्धव ठाकरे राजकीय दृष्ट्या किती अपरिपक्व आहेत हेच दाखवुन देते. या
उलट सर्वात आधी भाजपाला पाठींबा जाहीर करणारे शरद पवार किती चाणाक्ष आहेत हेच दिसून येतं. शरद पवारांच्या या निर्णयानंतर मी लिहिलेला ' शरद पवारांची गुगली ' हा लेखही वाचकांना फार आवडला होता. आणि त्यातील मी व्यक्त केलेल्या मतांशी अनेकजण सहमत होते.

पण उद्धव ठाकरेंसाठी वापरलेली लाचार हि उपाधी माझी नाही. ती मी फेसबुकवरून उचलली आहे. सत्तेत सहभागी होण्यासाठी भाजपाच्या मागे फिरणं हि उद्धव ठाकरेंची लाचारी नव्हती मित्रांनो. काळाची गरज ओळखुन टाकलेलं ते पाऊल होतं. पण अशीच पावलं त्यांनी यापुढे टाकली तर ते शिवसेनेच्या हिताचं असेल. कारण यापुढे उद्धव ठाकरे असेच वागत राहिले तर शिवसेनेचं अधपतन कोणीही टाळू शकणार नाही. 

असो. आजचं हे सारं लिखाण मी उद्धव ठाकरेंवर टिका करावी म्हणुन केलेलं नाही. तर नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांची आपल्या पक्षावर किती श्रद्धा असते यावर भाष्य करावं म्हणुन केलं आहे. मित्रांनो तुमची तुमच्या पक्षावरील निष्ठा हि नक्कीच कौतुकाची बाब आहे. परंतु त्यासाठी इतर पक्षावर आणि नेत्यांवर असभ्य भाषेत टिका करू नये हे तुम्हाला पटायला हवं.   

2 comments:

  1. PANCH VARSHA NANTAR YA KURCHI MADHE KAON DISTE TE PAHU YA VIJAY SHENDGE

    ReplyDelete
  2. पंढरीनाथजी, आपल्या प्रतिक्रियेचा नेमका रोख कळला नाही. किंवा कळुनही मी काही कळत नाही असे दाखवतोय असे समजा. पण कृपया थोडं स्पष्ट लिहा.

    ReplyDelete