Saturday, 25 October 2014

How to create blog in Marathi : मराठीत ब्लॉग लिहायचाय


कुठे आणि कसा लिहावा ब्लॉग ? अलिकडे अनेक तरुण ब्लॉग लिहु इच्छितात. पण ब्लॉग कसा आणि कुठे लिहितात ? हे अजूनही बऱ्याच जणांना माहित नाही. ब्लॉग लिहिणं हि प्रक्रिया सोपी नक्कीच नाही. आणि वाचकांना वाचावासा आणि पहावासा वाटेल असा ब्लॉग लिहिणं तर त्याहून कठीण. पण
तुमच्या मनात विचारांची गर्दी असेल तर ब्लॉग नक्की लिहावा. त्यासाठी तुम्हाला फारसं काही लागत नाही. हवं असतं ते एखादं इमेल खातं ते गुगलच असेल तर उत्तमच. पण गुगलच खात नसेल तर तुम्हाला wordpress.com या किंवा अन्य ब्लॉगिंग साईटवर जाऊन ब्लॉग सुरु करावा लागेल. अनेक मंडळी wordpress.com, किंवा blogger.com या दोन ब्लॉगिंग साईटचा वापर करत असली तरी इतरही अनेक साईट्स उपलब्ध आहेत blog.com , penzu.com, squarespace.com, sbvtle.com, tumblr.com, web.com , weblly.com, wix.com या साईट्स त्यापैकी काही प्रमुख साईट्स आहेत. इथे आपण केवळ blogger.com वर ब्लॉग कसा सुरु करायचा ते पाहू -

१ ) तुमच्या गुगल खात्यावर लॉग इन करा.

२ ) उजव्या बाजुच्या कोपऱ्यात जे नऊ चौकोन दिसतात त्यावर किल्क करा.
      इथे तुम्हाला g + , g , You Tube असे नऊ पर्याय दिसतील.

३ ) त्याखाली more हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

४ ) इथे तुम्हाला आणखी सात पर्याय दिसतील. त्यातील blogger या पर्यायावर क्लिक करा. 

५) त्या पानावर तुम्हाला New blog हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. 
    येणाऱ्या पानावरील पहिल्या बॉक्स मध्ये तुमच्या ब्लॉगचे नाव लिहा. जसे माझ्या ब्लॉगचे नाव आहे - '
    रिमझिम पाऊस '

६) पुढच्या रकान्यात तुमच्या ब्लॉगची लिंक कशी असावी असे आपणास वाटते ते लिहावे. माझ्या ब्लॉगची लिंक -  
   maymrathi.blogspot.com अशी आहे. यातील केवळ maymrathi एवढीच अक्षरे आपणास
     लिहायची असतात.

७) तुमच्या ब्लॉगची पार्श्वभुमी कशी असावी ते तुम्हाल ठरवता येते. त्यामुळेच template या
     मथळ्याखालील  आपणास योग्य वाटेल ती template निवडा.

८) शेवटी create blog वर क्लिक करा.

 आता तुमचा ब्लॉग अस्तित्वात आला आहे. त्यावर कुठे कसे लिहावे आपणास कळेलच. न कळल्यास नक्की विचारा. 

3 comments:

  1. धन्यवाद. मार्गदर्शन केल्याबद्दल.

    ReplyDelete
  2. मित्रा, शक्यतो निनावी प्रतिक्रिया देऊ नयेत. आपण ब्लॉग सुरु केलात काय ? कें असल्यास त्याची लिंक पाठवावी.

    ReplyDelete
  3. Great post. I was checking constantly this blog and I'm inspired!

    Very useful info specifically the last section :) I deal with such info much.
    I used to be looking for this certain information for
    a long time. Thanks and good luck.

    ReplyDelete