Monday, 3 February 2014

Meaning Of Love : प्रेमाचा अर्थ



दुसऱ्यावर प्रेम करणं हा प्रत्येकाचं कर्तव्यही आहे.

पण माणसाला नेहमीच हक्काची आणि अधिकाराची जाणीव असते पण कर्तव्याचा विसर पडतो. त्यामुळेच मला असा प्रश्न विचारावासा वाटतो कि खरंच किती लोकांना प्रेमाचा अर्थ माहित असतो ? अनेकजण सहज पुढं येऊन म्हणतील, ” प्रेमाचा अर्थ तर प्रत्येकालाच माहिती असतो. तरुण वयातल्या परस्परांविषयीच्या भावना म्हणजे प्रेम.”
नाही सगळ्यांकडून एवढंच उत्तर येईल असं नव्हे. उत्तरला अनेक पदर असतील. पण त्या पदराला झालर मात्र एकाच असेल. ” तारुण्यातला प्रेम तेच खरं प्रेम. “

खरंतर प्रेमाचा अर्थ कुणालाच कळत नाही. तो कळाला असता तर

विवाहित जोडप्यांमध्ये घटस्पोट झाले नसते………..हुंडाबळी गेले नसते……….प्रेमापोटी कुणी कुणाचे बळी घेतले नसते………….आणि कुणी आत्महत्येलाही प्रवृत्त झाले नसते.

खरंच प्रेमाचा अर्थ बऱ्याच जणांना माहित नसतो. आणि तो माहित आहे असा जर कुणाचा दावा असेल तर त्यांनी पुढील प्रश्नाचा उत्तर द्यावं.

सुंदर नसलेल्या मुलीवर प्रेम करायला तुम्हाला आवडेल ?

गरीब मुलाच्या प्रेमात तुम्ही स्वतःला झोकून द्याल ?

आणि मला खात्री आहे या दोन्ही प्रश्नाची उत्तर परस्परांकडून नकारार्थी येतील. हे चुकीचं आहे किंवा अनैसर्गिक आहे असं नाही म्हणत मी. कारण काटेरी झुडूप कुणालाच आवडत नाही पण गुलाब मात्र प्रत्येकालाच हवासा असतो. फुलपाखरू व्हायला प्रत्येकालाच आवडतं पण पतंगाला कुणीही झटकून देतं.अगदी तसंच मुलांना हव्या असतात सुंदर तरुणी तर मुलींना हवे असतात श्रीमंत तरुण. हे ढोबळ विधान आहे. याला अपवाद असतील नाही असं नव्हे. सर्वसामान्यपणे चित्र दिसत ते असंच.

पण ज्या मुली सुंदर नसतात आणि जे तरुण देखणे किंवा श्रीमंत नसतात त्यानंही प्रेमाची गरज असतेच याची जाणीव तरी आपल्याला असते का ?

ओस्तवालड स्वर्त्झा म्हणतो , ” प्रेम ही अशी आगकाडी आहे जी एकाच वेळी दोन हृदयात आग पेटवते. ”
  • तर ओरीस्टोटल , ” Love give the impels to the world from in-completion to the compilation. “
  • According to the David Viscott, “  love and be loved is to feel the sun from both sides.”
पण मी परवा बर्फी पहायला आणि - 

To love the needy is the love " 

अशा प्रेमाच्या एका नव्याच व्याखेने माझ्या मनात जन्म घेतला. मला वाटत तुम्ही माझ्या या व्याख्येशी सहमत असाल.

2 comments:

  1. मिलिंद चव्हाण6 September 2014 at 16:39

    ” To love the needdy is the love “
    अशा प्रेमाच्या एका नव्याच व्याखेने माझ्या मनात जन्म घेतला.मला वाटत तुम्ही माझ्या या व्याख्येशी सहमत असाल.
    तुमची व्याख्या स्वीकारावी अशीच आहे. प्रेम हे अंधळ असतं असं म्हणतात. पण ते चित्रपटात कथा कादंबऱ्यात. प्रत्यक्षात प्रेम अधिक डोळस असतं आणि म्हणूनच ते केवळ सौंदर्य आणि पैसा पहातं.

    ReplyDelete
  2. मिलिंद प्रतिक्रियेबद्दल आभार. प्रेम डोळस असावं पण स्वार्थी नसावं म्हणून तर मी त्याविषयी अधिकाधिक लिहितोय.

    ReplyDelete