खूप खूप वर्षापूर्वी लिहिलेली हि चारोळी. चारोळी म्हणजे काय हे हि मला तेव्हा फारसं ठावूक नव्हतं. एकाखाली एक चार ओळी लिहिल्या म्हणजे झाली चारोळी असं माझ मत होतं. आजही बहुतेकजण या एकाच हेतूने आणि विचाराने चारोळी लिहितात. कल्पनांचा फारसा पसारा मांडवा लागत नाही. विषय आणि आशय फारसा तणावा लागत नाही. एकदम इनस्टंट फूड सारखं. एका खाली चार ओळी लिहायच्या, दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत यमक साधायचं. बस.....
झाली चारोळी.
पण खरचं चारोळी इतकी सोपी नाही. तांदळाच्या दाण्यावर रामायण लिहण्यासारखं आहे चारोळीच. खपू मोठा आशय घेऊन येण्याऱ्या मोजक्याच ओळी म्हणजे चारोळी. हि चारोळीची मला भावलेली व्याख्या.
अवतीभोवती आपण पाहतो तेव्हा आपल्याला जाणवत हे जग फार फार स्वार्थी आहे. इतकं कि बऱ्याचदा माणसाला आपलं थोडं सुद्धा वाईट झालेलं नको असत. पण इतरांच चांगलं झालेलंही पाहवत नाही. थोडी फार मोजकी माणसं त्याला अपवाद असतातही किवा आहेतच. पण बहुतांश लोक हे आसे वृत्तीने नागवे असलेले.
अशी हि वृत्तीनं नागवी असलेली माणसं जेव्हा त्याचं भलं होत नाही तेव्हा दुसऱ्यांचहि भलं होऊ देत नाहीत.
जग असं खूप वाईट असलं तरी चांगली माणसही खूप होऊन गेली आहेत या जगात. त्यात संत ज्ञानेश्वर आहेत……संत गाडगे महाराज आहेत ……छत्रपती श्री शिवाजी महाराज आहेत ……मदर तेरेसा आहेत. या महात्म्यांसारखी आणखी कितीतरी नाव घेता येतील. पण हे सारे महात्मेच. पण सामान्य मानसाच काय ? तो कायमच दुसर्याला पाण्यात पहात राहतो.
चांगली माणस जशी होवून गेली तशी आजही काही चांगली माणसं आहेत. त्यात जेष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर यांसं नाव जसं घेता येईल तसं जेष्ठ समाजसेवक आणणा ह्जारेंसंही नाव घेता येईल. या अशा सदगृहस्थानच्या अंगावर चिखलफेक करणारेही खूप आहेत.
या दृष्ट व्यक्तींना आपण चांगल्या माणसांच्या सहवासात राहून आपण चांगल वागावं असं नाही वाटत. उलट ही दृष्ट वृत्तीची मंडळी एक होतात आणि चांगल्या माणसाला वाईट ठरवतात. तीन अट्टल दारूबाजांनी चौथ्याला दारू प्यायला फशी पाडाव तसं. अशा वृत्तीच्या लोकांसाठी लिहिलेल्या या ओळी. चारोळी.
मित्रहो जग हे असं आहे. स्वतः नागवं आहे म्हणून अंगभर कपडे असणाऱ्या माणसाला नागवं करणारं. अशा या जगात आपण आपला चांगुलपणा टिकवून धरायला हवा. एवढच सांगायचय मला.

Great sirji.
ReplyDeleteचारच ओळी पण केवढा आशय !
ReplyDeleteकेशवजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.
ReplyDeleteBadhiya.
ReplyDeleteकेशवजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. आपण आधीही प्रतिक्रिया दिली होती. बहुधा आपल्या लक्षात नसावे. असो. पुन्हा एकदा आभार.
ReplyDelete