Friday 14 February 2014

Valentine's Day : Why to and how to celebrate

celebration of valentine day
 व्हॅलेंटाईन डे का साजरा करतात ? कुठून आली ही परंपरा ? कुणी आणली ? कधी काळी हा दिवस कसा साजरा केला जात होता ? आज कसा साजरा केला जातोय ? मुळात व्हॅलेंटाईन  शब्दाचा अर्थ काय ? या सगळ्या प्रश्नांचा शोध घेण्याचा हा छोटासा प्रयत्न. 
तिसऱ्या शतकातक युरोपात एक ख्रिस्ती राजा होऊन गेला.  राज्याच्या सैन्यात व्हॅलेंटाईन नावाचा एक सैनिक होता. लग्न केल्यास माणसाची बुद्धिमत्ता आणि शक्ती कमी होते असे त्या राजाचे मत होते. म्हणूनत्या राजाने आपल्या सैनिकांना विवाह करण्यास बंदी घातली होती.

राज्याच्या सैन्यात व्हॅलेंटाईन नावाचा एक सैनिक होता. त्याने राजाच्या या बंदी हुकमास विरोध केला. म्हणून राजाने त्याच्या सैनिकाचा अर्थात व्हॅलेंटाईन यांचा शिरच्छेद केला. लग्न ही बाब प्रेमाशी निगडीत आहे. अशा रितीने व्हॅलेंटाईन याने प्रेमाच्या नैसर्गिक हक्कासाठी आहूती दिली. म्हणून त्या दिवसाचा संबंध प्रेमाशी जोडला गेला.

परंतु  व्हॅलेंटाईन याच्या बलीदानातली उदात्तता आणि आज ज्या रितेने ' व्हॅलेंटाईन डे ' साजरा केला जातो यात केव्हडी तफावत आहे.

अनेक देशात हा दिवस वसंत ऋतूच्या आगमनाप्रित्यर्थ साजरा केला जातो.

ख्रिस्ती राज्यात ख्रिसमसच्या जिंगल ज्या रितीने लहान मुलांसाठी भेटवस्तू पाठवतो. त्याचप्रमाणे  नॉरफोक या प्रांतात १४ फेब्रुवारी या दिवशी ' जॅक ' व्हॅलेंटाईन मुलांसाठी गोड मिठाई आणि भेटवस्तू घराच्या मागील बाजूस सोडून जातो. 

No comments:

Post a Comment