हवेची झुळूक यावी आणि विरून जावी ………पावसाची सर यावी पण माती कोरडीच
रहावी ……… ओंजळीत पाणी घ्यावं पण ओंजळ ओठाशी नेऊस्तोवर सरून जावं तसं
व्हायचं. पण आज मात्र चार सहा तास तिच्याशी झटलो. तिनेही फार आढेवेढे घेतले
नाहीत. गरीब गायीसारखी हाताशी आली. आज कुणास
ठाऊक कशी पण
कविता लिहून झाली. खूप दिवसांनी. माझ्यातली कविता कोमात गेली होती. पण तिचा श्वास चालू असेल अशी जाणीव व्हायची. मनातल्या शब्दांची थरथर जाणवत होती पण कागदावर काही उतरत नव्हतं. पण आज मात्र सारे पाश झुगारून ती शरण आली. पण या आधी मीही तिला शतदा शरण गेलो होतो. आजही सारंकाही तिच्याच कलानं घेतलं. केजरीवाल………. राहुल ………. मोदी साऱ्यांना मनात बाहेर काढलं. मोदींना सर्वात शेवटी. कारण मोदी या देशाचं आजचं वर्तमान आणि उद्याचं उज्ज्वल भविष्य आहेत. कवितेच्या काही ओळी इथं देतोय. संपूर्ण कविता उद्या पोस्ट करीन. आशा आहे या ओळी आणि कविता तुम्हाला मनापासून आवडतील.

हसू कसं येतं
दिवस सरतात ….
रात्री सरतात
काळाच्या गर्तेत
वर्षही भरकटतात …. १
रात्री सरतात
काळाच्या गर्तेत
वर्षही भरकटतात …. १
प्रेम उधळेल आपल्यावर
असं कुणीच नसतं जवळ
जख्मेमधून रक्त आपल्या
वहात असतं भळभळ ….२
असं कुणीच नसतं जवळ
जख्मेमधून रक्त आपल्या
वहात असतं भळभळ ….२
मन करावं मोकळं असे
सगळे असतात दूर
मनामध्ये आठवणींचे
खोल रिते सूर …. ३
सगळे असतात दूर
मनामध्ये आठवणींचे
खोल रिते सूर …. ३
कुणीच नसतं अवतीभवती
उदास दिवस भयाण राती
पायाखाली वाट सोबती
उदास दिवस भयाण राती
पायाखाली वाट सोबती
वरती आभाळ भुईस माती ….४
नकोनकोश्या आठवणींचा
हळूच बसतो चटका
नको नको म्हणता म्हणता
रागही येतो लटका …. ५
हळूच बसतो चटका
नको नको म्हणता म्हणता
रागही येतो लटका …. ५
No comments:
Post a Comment