Saturday, 22 February 2014

Marathi Poem : माणसेही नागवी

नागवेपणा हीन आहे तरीही माणसाला नागवेपणाच आकर्षण आहे. का होत अस ? कारण मला माहित नाही. पण परवा मी पोस्ट केलेली ' नागव्यांच्या बाजारात ' या कवितेला खुप रसिकांनी भेट दिली. केवळ म्हणून मी आज पुन्हा ' नगव्या ' या शब्दाचा उल्लेख असलेली कविता पोस्ट करतोय अस नाही.
 कधी कधी सकाळी सकाळी झोपेतून जागं व्हावं. झोप मस्त झालेली असावी आणि तरीही नागव्या माणसांबद्दलचे विचार मतात दाटून यावे. कसं वाटेल तेव्हा ? अगदीच नकोसं नकोसं वाटेल नाही. काहीतरी अशुभ......अमंगल मनात दाटून येईल. आपले आपणच फार खजील होऊन जाऊ. हो कि नाही. पण मनात कधी काय यावं हे आपल्या हाती नसतंच मुळी. कोणत्याही क्षणी आपण एका अज्ञात शक्तीच्या हातचं बाहुलं असतो.
ती शक्तीच नियंत्रण ठेवत असते आपल्यावर. त्यामुळेच आपण कधीही काही वाटून घेऊ नये. ते विचार पेलणं शक्य असेल तर पेलावेत नाही तर झटकून टाकावेत.
परवा माझंही असंच झालं.
झोपेतून जागं झालो आणि ओठांवर ओळी -
नागवी जनावरे
माणसेही नागवी
स्तनातुनी पुतना
फक्त विष जागवी.
त्या विचारांना त्या ओळींना तसाच कुशीत घेवून पडून राहिलो. दोनचार दिवसापूर्वीच मी माझी नागव्यांच्या बाजारात हि चारोळी पोस्ट केली होती. अलीकडे एकूण वातावरण नैराश्याचच आहे.  सरकारची मनमानी......कोटींचे घोटाळे.......वाढती महागाई.......मनामनातून आटत चाललेलं प्रेम........खूप खूप गोष्टी मनात येत होत्या. अशी का वागतात हि माणसं ? यांना का प्रेम नाही एकमेकांविषयी ? हि का फक्त स्वतःचीच पोटं भरू पहातात ? माणसं का अशी जनावरासारखी वागतात ? एक न अनेक विचार आणि मनात या ओळी. पुढच्याही चार ओळी अंथरुणात असतानाच सुचली. उठलो. दातही नाही घासले. ब्रश नव्हे पेन हाती घेतलं आणि एका दमात कविता लिहून काढली.
निराशेच्या या वातावरणही एक आशेचा किरण घेवून जन्माला आलेली. हिच ती कविता.

2 comments:

 1. किरण लांडे5 September 2014 at 18:14

  ' माझे घर जाळण्या पाणीही पेटले '
  आणि
  ' पाणी शोधन्यास मी आगीमध्ये पोहलो. ' दोन्ही कल्पना एकदम सुरेख.

  ReplyDelete
 2. किरण प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. हि कविता पोस्ट करून खुप महिने झाले. मला वाटलं. हि कविता रसिकांना फारशी आवडली नसावी.

  ReplyDelete