स्वातंत्र्यदिन ! १५ ऑगस्ट १९४७. त्यावेळी साऱ्या हिंदुस्तानात गुढ्या उभारल्या गेल्या होत्या. आज आमचा ६४ वा स्वातंत्र्यदिन. पण आज आम्हाला गुढ्या उभाराव्याशा वाटत नाहीत.कारण ………..
आज आम्हाला आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखं वाटतंय. आज आठवतय राजगुरू, भगतसिंग, सुखदेव अशा वीरांचं बलिदान………….आज आठवतेय स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भोगलेली काळ्या पाण्याची शिक्षा………….आज आठवताहेत,
” स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारचं .” असं ब्रिटिशांना ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक…………….
आज आठवताहे, ” तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दुंगा.” असं म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोस ……………..
आज आठवतंय अशा अनेकांचं बलिदान. अशा अनेकांनी आपल्या रक्ताचं शिंपण करून आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं.
आणि आज साठ वर्षांनतर आमच्या पुढाऱ्यांनी आम्हाला काय दिलं……..तर महागाई, गरिबी, भ्रष्टाचार. गरिबी आणि ह्श्रीमंती असं वाढत चाललेलं दुभंगलेपण.
आणि हे असं दुभंगलेपण आमच्या पदरात घालणारे पुढारी आम्हाला भारत महासत्ता होण्याची स्वप्नं दाखवताहेत.
कसे घेऊन जाणार आहेत ते या देशाला त्या शिखरावर ?
खरंतर आमच्या देशातल्या बोटावर मोजता येण्याइतपत पुढारयांकडेहि आमच्या पवित्र ध्वजाला स्पर्श करण्याची पात्रता नाही. पण तरीही ते आज ठिकठिकाणी आमचा ध्वज विटाळतील. हे सारं थांबायला हवं
मित्रांनो. आणि त्यासाठी आपण साऱ्यांनी जागं व्हायला हवं.
परवा अशीच माझी एका सदगृह्स्थांशी चर्चा झाली. या देशाचा उद्धार कोण करणार ? असा माझा सूर. यावर ते म्हणाले, ” फार, फार अवघड आहे ते. या देशाला पारतंत्र्यातून सोडविण्यासाठी एक भगतसिंग…………एक राजगुरू…………..एक लोकमान्य टिळक……………..एक महात्मा गांधी पुरेसे ठरले. पण या पुढाऱ्यांच्या मगरमिठीतून हा देश सोडवायचा असेल तर त्यासाठी शंभर सावरकर……….. शंभर महात्मा गांधी …………..शंभर भगतसिंग हवेत.”
मित्रहो शिवाजी पुन्हा जन्मायला हवं असं प्रत्येकाला वाटतं. पण तो आपल्या घरात नव्हे तर दुसऱ्यांच्या घरात. पण आता घराघरात शिवाजी जन्माला येण्याची वेळ आली आहे.
चला !
आज आमच्या स्वातंत्र्यदिनी -
” या देशाला भ्रष्टाचाराच्या आणि मतलबी पुढाऱ्यांच्या जोखडातून सोडविण्याची शपथ घेवू या.”
स्वातंत्र्यदिनाच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेछा !
जयहिंद.
शंभर सावरकर हवेत. ग्रेट थॉट. पण मोदी आलेत. आता फारशी चिंता करायचं कारण नाही. गरज आहे ती आपण साऱ्यांनी त्यांना साथ देण्याची.
ReplyDeleteनवनीतजी, या भ्रष्ट पुढयार्यांना एक मोदी कितीसे पुरे पडतील या विषयी शंकाच आहे. मोदिसुद्धा शंभर हवेत.
ReplyDelete