Friday, 1 May 2020

वाया गेलेलं साहेबांचं भिजणं

cartoon by vijay shendge

कोरोना यायच्या आधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हाच महाराष्ट्राच्या अधोगतीला सुरुवात झाली होती. महाभकास आघाडी हे जनतेच्या मनातलं सरकार मुळीच नव्हतं. भाजप-शिवसेनेने एकत्र येत सरकार बनवलं असतं तर जनतेला मनापासून आनंद झाला असता. परंतु
आत्ता नाही तर कधीच नाही याची ठाकरे थिंक टॅन्कला जाणीव होती. जनतेचं काहीही झालं तरी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हवं होतं. ते त्यांनी मिळवलं. त्यासाठी भ्रष्टवादीशी युती केली. पण उद्धवजींनी याला जनतेचं सरकार म्हणू नये. कारण राज्यातल्या ४३ टक्के जनतेने भाजप शिवसेना युतीच्या बाजूने मतदान केले होते तर आघाडीला अवघे. ३२ टक्के मतदान झाले होते.

पंधरा वर्षे सत्तेत राहून आणि खाऊन खाऊन पोट भरल्यावर पचन होईपर्यंत पाच वर्षे सत्ते बाहेर राहण्याचं काँग्रेस राष्ट्रवादीला फारसं दुःख नव्हतं. परंतु २०१९ च्या निवडणुका पार पडल्या आणि आता आपल्याला सलग १० वर्षे सत्तेबाहेर रहावं लागेल याची जाणीव राष्ट्रवादीच्या राजकीय धुरींना अस्वस्थ करत होतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी हपापलेले आहेत याची त्यांना जाणीव होती. आज स्वबळावर १०४ आमदार निवडून आणणारी भाजप पुढल्या वेळी स्वबळावर सत्तेत येऊ शकते त्यामुळे आज जर आपण संधीचा फायदा घेतला नाही मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतलं नाही तर शिवसेनेची मनसे होईल पण आपला मुख्यमंत्री पुन्हा कधीच होणार नाही. बरं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच व्हायचं होतं म्हणून ते स्वतःच बोहल्यावर चढले.

साहेब पावसात भिजले म्हणून आघाडीला आघाडीला फायदा झाला. असे म्हणून सगळ्यांनीच साहेबांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. परंतु वास्तव असे आहे कि - 

१) राष्ट्रवादीला २०१४ तुलनेत ०.५ टक्के मतदान कमी झाले. 

२) काँग्रेसला २०१४ च्या तुलनेत २.१ टक्के मतदान कमी झाले. 

३) भाजप शिवसेनेची मतदानाची टक्केवारी देखील २०१४ तुलनेत कमी झाली. 

४) भाजपला २.०६ तर 

५) शिवसेनेला २.९४ टक्के कमी मते पडली. 

त्यामुळे साहेबांच्या भिजण्याचे कौतुक करणाऱ्या सो कॉल्ड पत्रकारांनी, राजकीय विश्लेषकांनी साहेबांचे भिजणे कामी आले असे म्हणूनच नये.

साहेबांनी फार मोठे राजकारण केले आणि भाजपला फार मोठा धोबीपछाड दिला असे कोणीही म्हणून नये. कारण असा धोबीपछाड आमचा बांधावरचा शेतकरी बांध कोरता कोरता देत असतो. स्वार्थाचं राजकारण करायला फार बुद्धिमत्ता लागत नाही. 

6 comments:

  1. खुप परखड आणि वास्तविक

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.

      Delete
  2. Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.

      Delete
  3. Balasaheb Ingulkar2 May 2020 at 21:52

    पवाराची खरी ओळख हीच
    आहे

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.

      Delete