स्त्रीयांनी त्यांची अंतर्वस्त्र पुरुषांच्या दृष्टीस पडू नयेत अशा रितीने वाळायला घालावीत असा एक साधारण मापदंड आहे. फेसबुकवर या संदर्भात एका तरुणीची पोस्ट वाचायला मिळाली. तिचे म्हणणे, "आम्ही आमची अंतवस्त्र
अगदी उघड्यावर वाळायला घालू. पुरुषांनी त्यांच्या नजरा शुद्ध करून घ्याव्यात. अशा अति शहाण्या, बुद्धिवान व्यक्तींच्या पोस्टवर मी कधीही व्यक्त होत नाही.
मुळात तुम्ही व्याख्यानाला जा, साहित्यसंमेलनाला जा, एखाद्या वैचारिक चर्चासत्राला जा, किर्तनाला जा तिथल्या श्रोत्यांचं सरासरी वय असतं ५० वर्ष. पंचविशी तिशीचा तरुण तिथे अभावानेच आढळतो. हा तरुण वर्ग २०० रुपयाचं पुस्तक विकत घेऊन वाचणार नाही. पण ४०० रुपयाचं तिकीट काढून सिनेमाला जाईल. नेटफ्लिक्सची मेंबरशिप घेईल. कारण मल्टिफ्लेसला सिनेमा पहाणं, नेटफ्लिक्सची मेंबरशिप असणं हे स्टेटस सिंम्बॉल झालं आहे.
आमच्या पिढीवर संस्कार करण्यात आई वडिलांचा जेवढा वाटा होता. तेवढाच मोठा वाटा पुस्तकांचा होता. आजही आईवडील चांगलेच संस्कार करत आहेत. परंतु मोठी झाल्यावर खांदे उघडे टाकणारे ड्रेस वापरता येणार नाही म्हणून चार सहा वर्षाच्या मुलीचे खांदे उघडे टाकणारे कपडे आई मुलीच्या अंगावर चढवते तेव्हा मनापासून वाईट वाटते. आजची पिढी पुस्तक हातात धरायलाच नको म्हणते. कीर्तन ऐकायला नको म्हणते, विचारवंतांचं व्याख्यान ऐकायला नको म्हणते मग संस्कार येणार कुठून? सिनेमातून कि नेटफ्लिक्स मधील मालिकांमधून. मी एक गोष्ट ठामपणे सांगू शकतो ९० % सिनेमे संस्कार करण्याच्या कामाचे नसतात. आणि जे सिनेमे काही संस्कार करू शकतील असे १० % सिनेमे आजचा तरुण बघत नाही. आई वडिलांनी कितीही संस्कार केले तरी इतर माध्यमातून त्याला चुकीची दिशा दिली जाते आणि म्हणूनच अंतर्वस्त्राविषयी अशी पोस्ट लिहिण्याची बुद्धी होते.
लॉक डाउनच्या काळात कोणी काय केलं माहित नाही. पण मी रोज कमीत कमी ६० पाने वाचली. वर्तमानपत्र चघळण्यापेक्षा हे केव्हाही उत्तम. अशा रितीने मी २० हुन अधिक पुस्तकं वाचली. त्याच बरोबर या काळात एका कादंबरीचे लेखन केले. एका कथासंग्रह होईल एवढ्या कथा लिहिल्या. फेसबुकवरील पोस्ट तर तुम्ही बघता आहातच. याच बरोबर मी रोज सकाळी झी टॉकीजवर किर्तन पहायचो. त्यातला हा किस्सा.
किर्तनकाराचे सांगत होते, "ज्या बाईचे पोट झाकलेलं असेल त्या बाईच्या पोटी कधीही दुर्गुण असणारी संतती जन्म घेणार नाही. लग्नात वरपक्षाकडून, मुलीच्या आईला एक साडी दिली जाते. आज त्याला आम्ही सरसकट आहेर म्हणतो. परंतु जुने लोक त्या साडीला पोटसाडी म्हणायचे. ज्या उदरातून जन्माला आलेले सर्वगुणसंप्पन कन्यारत्न आपण ग्रहण करणार ते उदर झाकलेले रहावे म्हणून हि पोटसाडी दिली जायची."
ज्यांना याचा वैज्ञानिक संबंध शोधायचा आहे त्यांनी अभ्यास करावा. परंतु आता शॉर्ट टी शर्ट घालून वावरणाऱ्या मुलींना पोट झाकण्याचे आणि पोटसाडीचे महत्व कसे पटावे?
Post vachali, Tumche aani maze vichar baryach anshi jultat sir! Mi pan vyavsayane abhiyanta aahe, aani vruttine lekhak (thoda kavi suddha).
ReplyDeleteतुम्ही वृत्तीने लेखक आहात याचा आनंद वाटला. तुमच्या लेखनाला शुभेच्छा.
Deleteअप्रतिम
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल मनापासून आभार
Delete