Sunday, 3 May 2020

उधोजी झाले का मनासारखे?

cartoon by vijay shendge

गेल्या चार सहा महिन्यात ज्या गोष्टी घडताहेत त्या पाहून फार उद्विग्न झालो आहे. १०४ आमदार असलेला पक्ष बाहेर बसतो आणि ५४ आमदार असलेल्या पक्षाचा आमदार नसलेला माणूस मुख्यमंत्री होतो. यापेक्षा दुसरी लोकशाहीची थट्टा असू शकेल असे
मला तरी वाटत नाही. मला राज्यपालांच्या कोट्यातून आमदार करा हे नाटक खेळून झाले. विरोधक मला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचू पहात आहेत असे जनतेला भासवून झाले. कोरोना आला नसता तर हे सगळे करण्याची मला गरज नव्हती. परंतु केंद्र सरकार आणि विरोधक मला कात्रीत पकडत आहेत. मला राज्यपालांचे उंबरे झिजवायला लागत आहेत.

आता उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढवतील. निवडून येतील. मुख्यमंत्रीपदी कायम रहातील. खरेतर त्यांनी जनतेतून निवडून यायला हवे होते. पण तसे करत नाही. का ते नंतर कधीतरी लिहीन. 

तेही सोडून देऊ. जगात कोरोना आला. तो भारतात आला. त्याचे दुःख ते काय करायचे? परंतु त्याचा उद्रेक आणि अतिरेक नेमका महाराष्ट्रातच का होतो? देशाच्या कोरोना ग्रस्तांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्रात २८ % कोरोना बाधित आहेत हो. कोणाची चूक आहे यात? आता महाराष्ट्रात जास्त टेस्ट होताहेत म्हणून महाराष्ट्रात जास्त रुग्ण आहेत हे तुणतुणं कोणी वाजवू नये. महाराष्ट्रात लागण जास्त झाली, त्यामुळे संशयित जास्त आढळले आणि त्यामुळे महाराष्ट्रातली रुग्णसंख्या जास्त आहे. याउलट परिस्थिती इतर राज्यात आहे. लागण कमी, संशयित कमी आणि म्हणून रुग्ण संख्या कमी.

अगदी आठ दिवसापूर्वी अजित पवार म्हणाले कि, "आता अधिक कडक पावले उचलावी लागतील. लॉक डाऊन अधिक कडक करावे लागेल." मग आजवर काय केले. अनंत करमुसेला जीवघेणी मारहाण होते, पालघरला दोन वृद्ध संतांना मारहाण केली जाते. त्यांचे बळी घेतले जातात. राहुल कुलकर्णीला अटक होते. म्हणजे काय? आमच्या विरोधात बोलायचे नाही असेच ना? 

कोरोनावरून फार चर्चा होऊ नये म्हणून मुख्यमंत्री पदाचा विषय लावून धरला. आता विधान परिषदेची निवडणूक जाहीर होते म्हटल्यावर तो विषय आणि त्याविषयावरून केंद्रावर आणि विरोधकांवर चिखलफेक करण्याची संधी संपली. मग IFCS काढले. हे IFSC म्हणजे काय? हे दोन टक्के लोकांनाही माहित नसेल. पण शेंबड्या पोरांनीही IFSC गुजरातला हलवणार म्हणून थयथयाट सुरु केला. पाच वर्षांपूर्वी सुद्धा मुंबईतून हे हलवणार, मुंबईतून ते हलवणार अशाच वावड्या उठल्या. त्यातले काय गुजरातला गेले. आणि काय मुंबईत राहिले यावर कोणीही चर्चा करत नाही. 

ज्या लोकांनी साठ पासष्ठ वर्ष सत्ता भोगून जनतेच्या हिताचे राजकारण केले नाही. ते आज जनहिताचे राजकारण करतील असा त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे. किती हा भोळेपणा?   

2 comments:

  1. Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनपूर्वक धन्यवाद.

      Delete