मी महाराष्ट्राचा त्यामुळे मी उद्धव ठाकरे, अजित पवार, शरद पवार यांच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव करण्याची इच्छा व्हायला हवी. पण
तसे होत नाही. या आणि महाराष्ट्रातल्या सध्या सत्तेत असणाऱ्या इतर कोणत्याही नेत्यांपेक्षा मला मनोहर पर्रीकर जवळचे वाटतात. मला सुषमा स्वराज जवळच्या वाटतात. राजकीय नभावर नुकत्याच उदयाला आलेल्या त्या तेजस्वी सूर्याबद्दल जास्त आपुलकी वाटते. मीच नव्हे माझ्या सारखे महाराष्ट्रात लक्षावधी लोक आहेत. ज्यांना सध्या सत्तेत असणाऱ्या कोणत्याही नेत्याबद्दल आत्मीयता नाही. असे का होत असेल त्या विषयी विचार करण्याची ना नेत्यांना गरज वाटत ना त्यांच्या मूठभर समर्थकांना.
जेव्हा महाराष्ट्र राज्यातील कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीवर भाष्य करण्याचा अनेकजण गुजरातचा दाखला देतात. परंतु गुजरातची लोकसंख्या महाराष्ट्राच्या निम्मी आहे. म्हणजे आज रोजी गुजरातची रुग्ण संख्या १०००० असायला हवी होती जी ७००० आहेत. उपचार घेत असलेले रुग्ण ८००० असायला हवेत जे कवळ ५२०० आहेत. बरे झालेले रुग्ण १९०० असायला हवे होते तर गुजरातमध्ये बरे अधिक म्हणजे २१०० आहेत, महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमधील मृतांचा आकडा अधिक आहे. परंतु तो टिका करावा असा नक्कीच नाही. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमध्ये केवळ ७० रुग्ण अधिक आहेत.
योगींची आणि उद्धव ठाकरेंची तर तुलनाच होऊ शकत नाही. उत्तरप्रदेशची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा ८ कोटीने अधिक आहे. आणि तरीही रुग्ण संख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेश नेहमीच सहाव्या सातव्या क्रमांकावर राहिले आहे. सत्तेत आल्यापासून योगीजींनी एकहाती सत्ता चालविली आहे. गुन्हेगारी विश्वाला तर त्यांना हवा तसा चाप लावला आहे. गुन्हेगारी विश्वाला विधानभवनात उभे राहून खुले आव्हान दिले आहे. मोदी हे देशाला लाभलेलं कणखर नेतृत्व आहेत योगी हे राज्याला लाभलेलं कणखर नेतृत्व आहे. असं नेतृत्व प्रत्येक राज्याला लाभायला हवं. प्रत्येक राज्यात दोन चाकाची, तीन पायाची सत्ता असेल तर राज्य चालविण्यात असंख्य अडचणी येतात हे आता महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आले असेल.
मुळात उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्य मुख्यमंत्रीपदासाठी आवश्यक असणारे गुणच नाहीत. आपल्या बापजाद्यांनी उभ्या केलेल्या पक्षाचा रिमोट म्ह्णून काम करणे आणि एका राज्याचा मुख्यमंत्री होणे यातला फरक आता त्यांच्या लक्षात आला असेल. वाडवडिलांची बागायती जमीन कसने फार कठीण नसते.परंतु सावडीने शेती करणे किती अवघड असते याचा अनुभव शेतकरी बांधवांना उत्तम असतो. आज अजित पवार मुख्यमंत्री पदी असते तरी राज्यातले चित्र वेगळे दिसले असते. परंतु आत्ता परिस्थिती अशी आहे कि इतरांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही आणि उद्धव ठाकरेंना निर्णय घेता येत नाही. अशा मुख्यमंत्र्यांना, योगींच्या नखाची सर येणेही कठीण. त्यामुळेच चूक सुधारणे हि काळाची गरज आहे. भविष्यात जनता हि चूक सुधारेल आणि राज्य चालविण्यास सक्षम आणि एकहाती सरकार सत्तेत आणेल हे नक्की.
खरंच आहे, तीन तीगाडा आणि काम बिघाडा असंच आहे. महाराष्ट्राचं अभद्र नशीब अजून काय.
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल मनापासून आभार.
Delete