Sunday 31 May 2020

उधोजींपेक्षा मोदींची आई श्रीमंत

cartoon by vijay shendge

नेते उमेदवारी अर्ज भरतानात्यांची मालमत्ता अर्जात नमूद करतात. अर्थात हा पायंडाही खऱ्या अर्थाने अंमलात आणला तो टी एन शेषन यांनी. त्यांनी बडगा उगारला म्हणून नेते सरळ वागू लागले. एक अधिकारी सगळ्या पुढाऱ्यांना किती आणि कसा
वाकवू शकतो, ते शेषन यांनी दाखवून दिले. तेही त्यांना कोणतीही झेड सुरक्षा नसताना. अदित्य ठाकरे यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला आणि त्यांच्या नावावर २५ कोटींची मालमत्ता असल्याचं जाहीर झालं. उधोजींनी फॉर्म भरला आणि त्यांच्या नावावर १२५ कोटींची मालमत्ता असल्याचं जनतेला कळालं. काल परवापर्यंत यांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता किती याची जनतेला काहीही कल्पना नव्हती. एवढी मालमत्ता कुठून आली हे विचारायचे नाही.

पवार कुटुंबियांच्या मालमत्तेचे गणित तर काही वेगळेच आहे. पार्थ पवारने ३० ते ३५ कोटींची मालमत्ता कशी गोळा केली हे माहित नाही. १० एकरात ११० कोटींची वांगी कशी पिकतात? हे कोडे अजून सुटलेले नाही. तरीही जनतेला हि माणसं जनतेचं कल्याण करतील असं वाटतं. पवारसाहेबांनी गेल्या पन्नास वर्षात पवार घराण्याव्यतिरिक्त दुसरा नेता बारामतीत घडू दिला नाही. घरातून मात्र एकामागून एक माणसं राजकारणात आणली. 

उधोजी मुख्यमंत्री झाले, पोराला कॅबिनेट मंत्री केले लगेच पालकमंत्री सुद्धा केले. बरं विधानसभेत चिरंजीव बसतात कुठे, बरोबर पिताश्रींच्या मागे. असो प्रश्न त्याचा नाही. कोट्यवधींची मालमत्ता असणाऱ्या या मंडळींनी कोरोना विरोधातील लढ्यासाठी पीएम फंडाला स्वतःच्या खिशातला १ रुपया देण्याचे काही कारण नाही, परंतु सीएम फंडाला किती दिले? याची मी अनेक मार्गाने खातरजमा केली. आपल्या सर्व नेत्यांनी सीएम फंडात त्यांचा एक महिन्याचा पगार दिला आहे. हा पगार यांना जनतेच्या पैशातून दिला जातो. थोडक्यात काय तर कोट्यवधींची माया गोळा करणाऱ्या या माणसांनी स्वतःच्या खिशात हात न घालता दानशूर झाल्याचा आव आणला आहे. 

७० वर्षाची कमलाम्मा तिच्या ६०० रुपये पेन्शन मधली ५०० रुपयाची रक्कम पीएम फंडाला देते, मोदींची आई स्वतःच्या खिशातले २५००० रुपये पीएम फंडल्स देते. मग आमच्या पुढाऱ्यांची श्रीमंती काय फक्त निवडणुकीला पैसे उधळण्यासाठी आहे काय? निवडून आल्यावर जेसीबीने गुलाल उधळण्यासाठी पैसे खर्च करण्यात यांना धन्यता वाटते का? म्हणूनच मला कमलाम्मा आणि मोदींची आई हिराबेन या जनतेचे कैवारी असल्याचा आव आणणाऱ्या नेत्यांपेक्षा अधिक श्रीमंत वाटतात. आमचे नेते जनतेसाठी स्वतःच्या खिशातले चार आणे खर्च करत नाहीत. म्हणूनच व्यंगचित्रात पुढाऱ्याची प्रतिमा मी उलटी दाखवली आहे. 

No comments:

Post a Comment