Thursday, 21 May 2020

देवेन्द्राने काय केलं असतं???

cartoon by vijay shendge

राज्यातला कोरोनाचा विळखा दिवसें दिवस आवळला जातो आहे. उद्धव ठाकरे आमदार झाले. त्यांचं मुख्यमंत्रीपद अढळ झालं. काल तर त्यांनी  छत्रपतींची सिंहासनारूढ मूर्ती पाठीशी ठेवून टिव्हीवर झळकण्याचं औचित्य साधलं. त्यांनी छत्रपतींची मूर्ती पाठीशी का ठेवली
ते मी नंतर उलगडुन सांगेल. परंतु आज मी या विषयाकडे का वळलो ते सांगतो.

२२ कोटींच्या युपीमध्ये कोरोना अत्यंत नियंत्रणात आहे. आज रोजी उत्तर प्रदेशात अवघे २००० कोरोना बाधित रुग्ण उपचाराखाली आहेत. ३००० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर महाराष्ट्रात आज रोजी २७००० रुग्ण उपचाराखाली आहेत. आणि अवघे १०००० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. फार सविस्तर आकडेवारी मी इथे देणार नाही. परंतु महाराष्ट्र सरकारचे अपयश झाकण्यासाठी योगीजींवर शिंतोडे उडविण्याचे काम सुरु आहे. काँग्रेसच १००० बसचं नाटक जनतेच्या हितासाठी रचलेलं नसून योगी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यासाठी रचलेलं आहे. 

आज पर्यंत उद्धव ठाकरे उत्तम काम करत आहेत असे म्हणणारे काँग्रेस समर्थक या परिस्थिती देवेन्द्र फडणवीस यांनी काय केलं असतं? असा प्रश्न उपस्थित करून उद्धव ठाकरे यांचं, आणि महाराष्ट्रातील तीन पायाच्या सरकारचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकजण देवेन्द्र फडणवीस यांनी गेल्यावर्षीच्या पूरपरिस्थिती समाधानकारक काम केलं नाही असा आरोप करत आहेत. परंतु पुराच्या पाण्याला बांध घालता येत नाही. कोणत्याही प्रकारचं औषध देऊन त्यावर नियंत्रण ठेवता येत नाही.

सुरुवातीला महाराष्ट्रात परदेशातून अधिक प्रवासी येतात त्यामुळे महाराष्ट्रात अधिक कोरोनाबाधित आहेत अशा रितीने बाजू मांडली जात होती. परंतु आता देवेन्द्र फडणवीस यांनी काय केलं असतं असा सवाल उपस्थित केला जात आहे. देवेन्द्र सत्तेत असते तर त्यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवून दाखवलं असतं, करून दाखवलंच असतं परंतु स्वतःचं मुख्यमंत्रीपद शाबूत ठेवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियंत्रित ठेवण्यासाठी नेमके काय केले हे कोणी सांगेल काय? देवेन्द्र सत्तेत असते तर त्यांनी करून दाखवलंच असतं. उद्धव ठाकरेंनी काय करून दाखवलं हे कुणी सांगेल काय?  

2 comments:

  1. आरोप प्रत्यारोप करायची सवय लागली हाय. नीट बसून खाता येत नाही ओ त्यांना .

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.

      Delete