केवळ एखाद्याचा लाळघोटेपणाही त्याला अगदी उच्चपदावर घेऊन जातो. काहींचा गोडबोलेपणा त्यांना हात देतो. मध्ये एका कार्यक्रमात नीलम गोर्हे यांनी एक कविता म्हणून दाखवली. म्हणे मी आमच्या उद्धव साहेबांवर लिहिली आहे. अशी भाटगिरी केली प्रगती साधने फारसे कठीण जात नाही.
संजय राऊत एका मुंबापुरीच्या वर्तमानपत्राचा संपादक आहे, तो खासदार आहे म्हणजे तो फार हुशार आहे असे काही नाही. हातात अधिकार आहेत. आणि त्या अधिकाराचा वापर करून ते हवे तसे बोलत असतात. नारायण राणे यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. नारायण राणे तरी एका पक्षाचा प्रवक्ता म्हणून बोलले असतील. अथवा एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून बोलले असतील. परंतु एक सामान्य नागरिक म्हणून मला त्या आधीपासून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज वाटते. आज फडणवीस सत्तेत असते तरी या परिस्थितीत मी त्यांच्यावर टीकाच केली असते.
परंतु नारायण राणे यांच्या मागणीचा समाचार घेताना संजय राऊतांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल तर गुजरात, राज्यस्थान आणि दिल्लीत सुद्धा राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे असे विधान केले. पण तुम्ही हे कशाच्या आधारावर म्हणता? असे विचारण्याची धमक एकही पत्रकारात नाही. मी संपूर्ण आकडेवारीचा अभ्यास केला आणि जे चित्र समोर आले ते अत्यंत गंभीर आहे. गुजरात, राज्यस्थान, दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करायची कि नाही याचा निर्णय केंद्र सरकार घेईलच. परंतु महाराष्ट्रात त्वरित राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी हे मात्र नक्की.
इतर राज्यांचे जाऊ द्या गुजरामध्येतरी राष्ट्रपती राजवटीची गरज काय महाराष्ट्रात एकूण रुग्ण ५७ हजार, गुजरातमध्ये १५ हजार, महाराष्ट्रात रिकव्हरी रेट ३१ %, गुजरातमध्ये ४९ %, महाराष्ट्रात उपचाराखालील रुग्णांचे प्रमाण ६५ % गुजरातमध्ये ४८ %. संजय राऊतला दाखवा हि आकडेवारी. अभ्यास तर उधोजी करणार नाहीत आणि संजय राऊत सुद्धा. अभ्यास करू नका. पण पिन बुडाची विधाने तरी करू नका ना. आणि उत्तरप्रदेश तर कुठे चित्रात सुद्धा नाही. त्यामुळे योगींचे नाव सुद्धा घेऊ नका.
महाराष्ट्र / गुजरात तुलना करा अथवा मुंबई / दिल्ली तुलना करा. महाराष्ट्राने माती खाल्ली हे कोणीही नाकारू शकत नाही. महारातष्ट्रात सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय प्रवासी येतात असे अनेकांचे म्हणणे असायचे. मग दिल्लीत काय फक्त आंतरराष्ट्रीय रेल्वे उतरतात काय? मुंबईपेक्षा दिल्लीत २५ % जास्त आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात हे लक्षात असू द्या. आता करा तुलना. उद्धव ठाकरे फक्त विधाने करणार. आज ना उद्या परिस्थिती सुधारेल या आशेवर ज्या नागरिकांनी दोन महिने अक्षरशः घरात बसून काढले आहेत. त्यांनी उद्या लॉक डाऊन उठल्यावर कशाच्या आधारावर घराबाहेर पडायचे? परिस्थिती तर दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सुधारणा झाली नाही तर महाराष्ट्र लवकरच लाखाचा आकडा गाठेल. ती वेळ येऊ द्यायची नसेल तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करायला हवीच.
महाराष्ट्रात त्वरित राजवट लागू करण्यात यावी.
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद. परंतु असे मनात आल्यावर लगेच राष्ट्रपती राजवट लागू करायला हे काही काँग्रेसचं सरकार नाही. जे काही होईल ते संविधानाच्या चौकटीत होईल.
DeleteIt's a failure of central government who followed lockdown blindly.It should be planned taking suggestions from all states.Lockdown shall be pre intimated so that everyone will reach safely at their natives.Now when the situation is out of control, responsibility is handed over to states so that states will be blamed for failure.
ReplyDeleteसाहेब आपण कोण आहात माहित नाही. परंतु जगाच्या तुलनतेत देश कुठे आहे पहा. आणि देशाच्या तुलनेत राज्य कुठे आहे ते बघा. माझ्या दुसऱ्या एका लेखात मी सगळी आकडेवारी दिली आहे. अगदी मुंबई दिल्ली, अशी तुलनाही करू शकता तुम्ही.
Delete