जगातले कोणतेही आईवडील मुलांवर वाईट संस्कार करत नाहीत. परंतु त्यासाठी आईवडील स्वतः संस्कारक्षम असायला हवेत. दारूची भट्टी लावणाऱ्या गृहस्थाच्या मुलाने
दारूची भट्टी लावली तर त्यात त्याचे काय चुकले? आज टिकटॉक वर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या जोडप्याच्या मुलांनी पुढे जाऊन तेवढेच केले तर मुलांना दोष का द्यायचा? आई वडील चांगले संस्कार करत असतानाही सामाजिक आकलनातून मुलांवर चुकीचे संस्कार होण्याची शक्यता असते. तरीही आई वडिलांच्या संस्काराचा पाया पक्का असेल तर मुले चुकीच्या मार्गाला जात नाहीत हे कोणालाही नाकारता येणार नाही.
दारूची भट्टी लावली तर त्यात त्याचे काय चुकले? आज टिकटॉक वर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या जोडप्याच्या मुलांनी पुढे जाऊन तेवढेच केले तर मुलांना दोष का द्यायचा? आई वडील चांगले संस्कार करत असतानाही सामाजिक आकलनातून मुलांवर चुकीचे संस्कार होण्याची शक्यता असते. तरीही आई वडिलांच्या संस्काराचा पाया पक्का असेल तर मुले चुकीच्या मार्गाला जात नाहीत हे कोणालाही नाकारता येणार नाही.
मध्ये एका नामस्मरण करणाऱ्या, तबला वाजवणाऱ्या, नामस्मरण सुरु केलं कि रडू थांबवणाऱ्या आणि नामस्मरण बंद केलं कि रडू लागणाऱ्या लहान मुलांचे व्हिडीओ फार व्हायरल झाले होते. अशाच रीतीने मुलं पंधरा सोळा वर्षाची होईपर्यंत पुरेशी काळजी घेतली तर मुलं बिघडण्याची शक्यता कमीच रहाते. आता आम्ही मुलांना मित्र मानतो असे म्हणत चिअर्स म्हणत मुलांच्या ग्लासाला ग्लास भिडवणाऱ्या आई बाबांच्या बद्दल मी काय बोलणार? शिवाय अलीकडे "ए.... बाबा" म्हणत बाबाचा फुटबॉल करण्याची पद्धत सुद्धा रुजली आहे. कोणी त्याचे कितीही समर्थन करो ते चूक आहे हे नक्की.
मी राजकीय लेखन करो अथवा सामाजिक लेखन करो समाजात चुकीचा संदेश जाणार नाही याची पूर्ण काळजी घेतो. समाजाला काही चांगला संदेश देणं हाच माझ्या लेखनाचा हेतू. राजकीय लेखन करतानाही मी कौरवांच्या बाजूला उभा नाही याची मला जाणीव असते. कौरवांच्या बाजूने लढणारे लक्षावधी योद्धे होते. तसे आजही आहेत. ते बाण सोडणारच. अंतर्वस्त्र आणि पोटसाडी या पोस्टवर सुद्धा, अत्यंत फडतूस पोस्ट अशा शिक्का मारणारे गृहस्थ होतेच. असो तर विषय तो नाही. विषय संस्काराचा आहे.
एक काळ असा होता कि आपल्या जन्मदात्यांना मम्मी, पप्पा म्हणण्याची फार मोठी क्रेझ होती. इतकी कि गवंड्याच्या हाताखाली काम करणाऱ्यांची, अथवा धुणं भांडी करणाऱ्यांची मुलं सुद्धा नाकातला शेंबूड शर्टाच्या बाहीला पुसत, ढुंगणावरून खाली घसरणारी चड्डी सावरत, मम्मे, पप्पा म्हणत आई वडिलांच्या मागे फिरताना मी पाहिली आहेत.
अर्थात आपल्या आई वडिलांना काय म्हणायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अनेकदा तर आईला मामी, ताई, आक्का, तर वडिलांना दादा, नाना म्हणणारी मुलंही मी पाहिली आहेत. मी स्वतः माझ्या वडिलांना तात्या म्हणायचो. परंतु आईला, वडिलांना उद्देशून वापरल्या जाणाऱ्या या अशा मराठी संबोधनात मला कधीही काहीही गैर वाटलं नाही. पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीत घरातील इतर मंडळी त्या त्या व्यक्तीला जे संबोधन वापरत तेच त्यांच्या मुखी येत असे. शिवाय ती संबोधन मराठी मातीशी नातं सांगणारी आहेत.
परंतु मम्मी-पप्पा, मॉम-डॅड मधलं इंग्राजळेपण मला कधीच भावलं नाही. आई वडिलांना अशी इंग्रजी संबोधने वापरणं गैर आहे अथवा ते संस्कार नसल्याचे लक्षण आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही. ब्राम्हण कुटुंबांना इंग्रजी संबोधनाचं आकर्षण असल्याचं मला कधी दिसलं नाही. मला जेव्हा मुलगा झाला तेव्हा त्याने आम्हाला आई बाबा म्हणावं असंच वळण आम्ही लावलं. आणि ते आम्हाला आई बाबा म्हणताहेत हे ऐकून आम्ही धान्य झालोत. पण एक किस्सा सांगावा असा आहे.
माझा छोटा मुलगा दुसरी, तिसरीत असावा ( अर्थात सेकण्ड, थर्डला ). त्याने शाळेत कोणाची तरी खोडी काढली असेल. त्याला त्याच्या बाईंनी ( मॅडमने ) बोलावलं. रागावलं. आणि, "उद्या शाळेत येताना तुझ्या मम्मीला घेऊन शाळेत यायचं." असं बजावलं.
माझा मुलगा म्हणाला, "मला मम्मी नाही,"
"मग कोण असतं तुझ्या घरात." बाई म्हणाल्या.
"आई असते." तेव्हा त्याच्या बाईंना उलगडा झाला. दुसऱ्या दिवशी तो आईला घेऊन शाळेत गेला. तेव्हा त्याच्या बाईंनी हा किस्सा सांगितला.
कुणी म्हणेल, "यात विशेष काय?"
विशेष काहीच नाही. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तिसरीत शिकणाऱ्या मुलाला, आईलाच मम्मी म्हणतात हे त्याचं अज्ञान नव्हतं. जन्म दात्यांना आई बाबा म्हणतात हा आमचा संस्कार त्याच्या मनात खोल रुजला होता. सांगायचं ते एवढं कि पाण्याला वळण मिळेल तसं पाणी वाहतं आणि मुलांवर संस्कार कराल तशी ती घडतात.
No comments:
Post a Comment