Sunday 17 May 2020

बाबा आता, देव सुद्धा उघडे करायचे का?

cartoon by vijay shendge

काही दिवसापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी देवस्थानांच्या ताब्यात असेल सोनं सरकारने राष्ट्रीय प्रवाहात आणावं असं विधान केलं. आणि अनेक पत्रकारांनी, विचारवंतांनी त्यांच्या भूमिकेचं स्वागत गेलं. एका लेखात तर हिंदू देवस्थानांकडेच का नजर जाते? मशिदींकडे का
पैसे मागत नाही? असे विचारू नका. अशीही टिपण्णी केली होती. हि अशी पोस्ट लिहणारा एक हिंदूच होता हे विशेष.

देवस्थानांचे सोने चलनात आणा हे सांगणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतःच्या खिशातले सीएम फंडाला किती कोटी दिले. आपण एखाद्या ठिकाणी देवदर्शनाला जात तेव्हा आपण कधी दानपेटीत पण पन्नास हजार रुपये टाकता का? आपल्या पक्षाला देशातली गरिबी दूर करता आली नाही. आणि आता हे देव भिकेला लावायला निघाला आहात का? देवस्थानांकडे असलेले सोने सरकारने ताब्यात घ्यावे असे सुचविणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांनी देशाची आर्थिक दुरावस्था का झाली याचे उत्तर द्यावे. मशिदींना, चर्चला कोट्यवधी रुपयांचं अनुदान पुरवणारे सरकार देवस्थांना किती पैसा पुरवते ते सांगावे.

आज देशातले बहुतेक देवस्थानं अन्नछत्र चालवतात. दिवसभर मोफत अन्नदान सुरु असते. कित्येक देवस्थाने हॉस्पिटल चालवतात.गरजूंना अत्यल्प दरात आरोग्यसेवा उपलब्ध करून देतात. अनेकप्रकारची विधायक कामे देवस्थाने करत असतात. साहेब आज देशभरात एक लाखाहून अधिक देवस्थाने आहेत. आणि प्रत्येक देवस्थानात आणि देवाच्या दारात प्रत्येकी १०० लोक पोट भरतात असे गृहीत धरले तरी या देवस्थास्थांच्या जीवावर एक कोटी जनता पोट भरते. त्यामुळे कृपा करा आणि या देशातले देव भिकेला लावण्याचे मार्ग सुचवू नका.

मुळात पृथ्वीराज चव्हाण हे काही अर्थतज्ज्ञ नाहीत. परंतु असे काहीतरी सुचवायचे. प्रस्थापित केंद्र सरकार असे काही करणार नाही हे यांना चांगले माहित आहे. त्यामुळे सरकारने केले नाही म्हणून त्यांच्या विरोधात बोंब मारायला हे तयार आहेतच. आणि समजा दुर्बुद्धी सुचून सरकारने असे काही केले तर हिंदूंचा रोष ओढवून घेतीलच. एवढाच जर हा उपाय प्रभावी वाटत होता तर आपण का नाही असे कधी केलेत?

बाबा तुमच्यात धमक असेल तर 'मुस्लिम मशिदींना, मदरशांना, हज यात्रेला दिले जाणारे अनुदान बंद करावे' असे विधान करून दाखवा बरं. हिंदूंच्या विरोधात, हिंदू देवस्थानांच्या विरोधात काहीही बोलले तरी कोणी काही करत नाही. शिवाय हिंदू नेत्यांच्या विरोधात बोलणाऱ्या नेत्यांची शेपूट धरणारे फितूर हिंदू आमच्या देशात कमी नाही. देवस्थानांची संपत्ती हि देशाचीच संपत्ती आहे. देव ती स्वर्गात नाही घेऊन जाणार. परंतु आपण आजवर देशातल्या जनतेला भिकेला लावले, देशाला भिकेला लावले आता देशातल्या देवांना उघडे करू नका.

No comments:

Post a Comment