आज फारच महत्वाचं काम होतं म्हणून आज घरातून बाहेर पडलो होतो. वेळ दुपारी बरे ते एक. रस्ता ओसंडून वहात होता. केवळ सिटी बस रस्त्यावर दिसल्या नाहीत. दुकाने बंद आहेत. हॉटेल बंद आहेत. पण पब्लिक रस्त्यावर येऊन
काय करतंय माहित नाही. फळं विक्रेते शेतमाल विकणारे रस्त्याच्या कडेला कुठेही वाहन उभे करून विक्री करत होते. ग्राहक तिथे उभे राहून राजरोस खरेदी करत होते. यात कुठेही कोरोना पॉसिटीव्ह असू शकतो याची जाणीवही कोणाच्या चेहऱ्यावर दिसत नाही. बरं फक्त पुरुषच रस्त्यावर फिरताहेत असे नाही. महिला, मुलीसुद्धा मागे नाहीत.
कोरोनाचा विषाणू ७ दिवस कोणाच्या संपर्कात आला नाही तर त्याचा प्रभाव संपून जातो हे प्रत्येकाला माहित आहे. एखाद्या भागातला, एखाद्या व्यक्तीवरील कोरोनाचा प्रभाव संपुष्टात यावा म्हणून १४ दिवस कॉरंटाईन केले जाते हेही माहित आहे. तरीही लॉक डाउन पे लॉक डाऊन करायची वेळ का येते? दोन महिने झाले लॉकडाऊनवर लॉकडाऊन, लॉकडाऊनवर लॉकडाऊन, लॉकडाऊनवर लॉकडाऊन, जाहीर होत चालला आहे . परंतु कोरोनाचा प्रभाव कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे.
आताही पुण्य मुंबईतली वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन पुन्हा लॉक डाऊन वाढवले जाईल. परंतु १५ जून नंतर तरी रुग्णसंख्या आटोक्यात आलेली असेल का? कोरोना रुग्णांवर BCG लसीचा प्रयोग जगाला दिशा देण्याचे डोहाळे उधोजींना लागले होते. साहेब तुम्ही महाराष्ट्राचा विचार करा. महाराष्ट्र कोरोनमुक्त करा. कुणीही उठावं आणि फुगून बैल होण्याचा प्रयत्न याला काहीच अर्थ नाही. तुमची भाषण ऐकून कोरोना जाणार नाही.
आज काही शर्थी अटींवर अनेक भागातले व्यवहार सुरु करायला सरकारने परवानगी दिली आहे. त्या भागातील कोरोनारुग्ण तरी कमी झाली आहे का? उलट पंधरा दिवसापूर्वी महाराष्ट्रातले चार जिल्हे कोरोनमुक्त होते. आज त्याही भागात दहावीस कोरोनारुग्ण उपचाराखाली आहेत. मग सरकार काय करते आहे. केवळ १५ दिवस लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी केली असती तरी आज लॉकडाऊनवर लॉकडाऊन जाहीर करण्याची वेळ आली नसती. परंतु आमचे सरकार जनतेसाठी कसे काम करते हे दाखवण्यासाठी तुम्ही भाजी मार्केट उभारण्याचा प्रयत्न केलात, तुम्ही खानावळी सुरु केल्या, तुम्ही मरकज वाल्यांवर नियंत्रण ठेवायला कमी पडलात. राज्यात पोलिसांना मारहाणीच्या कधी नव्हे इतक्या घटना घडल्या.
उधोजी तुम्ही १ मी च्या आसपास ३१ मी पर्यंत महाराष्ट्र कोरोनमुक्त करण्याचा संकल्प केला होता. परंतु आपल्याला खाली खेचल्याशिवाय कोरोना महाराष्ट्रातून जाईल असे मला तरी दिसत नाही. आज लोकडाऊन असूनही जनता रस्त्यावर फिरते आहे. लोकडाऊन उठवल्यावर काय होईल? तुम्ही मातोश्री लॉक कराल पण प्रत्येकाची घरे कशी लॉक करणार. वेळ गेलेली आहेच पण जागे तर व्हायलाच हवे ना.
No comments:
Post a Comment