घराणं गांधींचं असो, ठाकरेंचं असो, पवारांचं असो, राणेंच असो, ताटकरेंचं असो, मुंडेंचं असो अथवा खडसेंच असो. त्यांना त्यांच्या सात पिढ्याचं भलं कसं होईल एवढीच चिंता लागलेली असते. मग
अशा नेत्यांकडून सामान्य जनतेचं कल्याण कसं होऊ शकतं.
मी सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणारच असं मी बाळासाहेबांना वाचन दिलं होतं असं उद्धव ठाकरे म्हणत होते. झालं काय ते स्वतःच मुख्यमंत्री झाले. पोराला कॅबिनेट मंत्री केलं. मुंबईचा पालकमंत्री केलं. अदित्य ठाकरेंचं कर्तृत्व काय? पार्थ पवारने काय दिवे लावले? रोहित पवारने काय वे पाजळे? अनेकांची नावं घेता येतील. आमक्याचा नातू, आणि फलाण्याचा पोरगा एवढीच त्यांची जमेची बाजू. आणि तरीही जनता त्यांना मतदान करते? का?
अदित्य ठाकरेचा जन्म किती सालचा? १९९० चा. म्हणजे २९ वर्षी हा आदूबाळ कॅबिनेट मंत्री होतो, पालकमंत्री होतो. आणि आमची २८, २९ वर्षाची पोरं काय करतात? तर ग्रॅज्युएट होतात, पोस्ट ग्रॅज्युएट होतात, स्पर्धा परीक्षांसाठी जागरणं करतात, शंभरातुन एकाला यश मिळते. बाकीचे ९९ अपयशाचे धनी होऊन नैराश्याच्या गर्तेत लोटले जातात?
याच संपूर्ण भूमिकेतून हे विनोदी गीत लिहिले आहे. पहा आवडतंय का?
No comments:
Post a Comment