Friday, 10 July 2020

योगीजी, उधोजी आणि गधोजी

cartoon by vijay shendge

विकास दुबेने आठ पोलिसांची हत्या केली तेव्हाही विरोधकांनी सरकारला दोषी धरले. आणि त्याचा एन्काउंटर झाला तेव्हाही या घटनेची सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली पाहिजे. सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सोनिया, राहुल, अखिलेश आणि मायावती करत आहेत. हि मंडळी अशाच रितीने गुन्हेगारांना पाठीशी घालत
आली आहेत. त्यांना बळ देत आली आहे. विकास दुबे आज मोठा झाला नाही. गेल्या वीस वर्षात अखिलेश, मुलायम आणि मायावती यांच्या राजवटीत मोठा झाला. परंतु योगीजींनी सत्तेत येताच, भर विधानसभेत, 'राज्यात गुंडाराज चालणार नाही. आणि कोणी तसा प्रयत्न केला तर ठोके जाएंगे' असं स्पष्ट शब्दात सांगितलं. आणि ते केवळ सांगून थांबले नाहीत तर सत्तेत आल्यापासून आजवर ६० हुन आधी गुंडांचा एन्काउंटर करण्यात आला आहे. 

आणि आमच्या राज्यात दाऊद पळून जातो, गवळी तुरुंगात तुकडे मोडतो. गुन्हेगारांना कशा रितीने वागवले गेले पाहिजे याचा फार मोठा पाठ योगी आदित्यनाथ यांनी घालून दिला आहे. गुन्हा केला. गोळ्या घातल्या. विषय संपला. चौकशी नको, वर्षानुवर्षे चालणार खटला नको, आणि बाइज्जत सुटण्याची शक्यता नको. उरलेले गुंड आपोआप धडा घेतात. 

आमच्या राज्यात. मागील आठ महिन्यात काय होतंय? पोलिसांना मारहाण केली. गुन्हा नाही. नर्सवर समोर अश्लील चाळे केले. गुन्हा नाही. एसट्या पेटवल्या, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं गुन्हा नाही. आरक्षण मिळत नाही गाड्या पेटवा. कोरेगाव भीमात अजून कोणाला शिक्षा नाही. दाभोलकरांचे, कलबुर्गींचे मारेकरी सापडले नाहीत. दाऊद पळून जायला मदत करणारे आणि स्वाध्वी प्रज्ञासिंगला छळणारे सरकार पुन्हा सत्तेत यायलाच नको. 

दाऊदला पळून जायला कोणी मदत गेली? हे सगळ्यांना माहित आहे. पण पुरावे नाहीत ना. पण योगी सरकार पुराव्याची वाट बघत बसत नाही. १९९३ ला मुंबईत १२ बॉम्बस्फोट होतात. २५७ निरपराध नागरिक मारले जातात. ७०० हुन अधिक गंभीर जख्मी होतात. कोट्यवधी रुपयांच्या सरकारी संपत्तीचं नुकसान होतं. १९९५ ला या हल्ल्याचा मास्टमाईन्ड दाऊद देश सोडून फरार होतो. झोपलं होतं का सरकार? २००७ पर्यंत खटला चालत राहतो. आणि २५७ बळी गेलेल्या नागरिकांच्या बदल्यात केवळ याकूब मेनन या एका गुन्हेगाराला फाशी होते. वास्तविक १०० जणांवर गुन्हा दाखल झालेला असतो. त्या सगळ्यांना तेव्हाच गोळ्या घातल्या असत्या तर? 

मुळात गुन्हेगार छोटा असो अथवा मोठा. तो गुन्हेगार आहे हे माहित असेल तर कोर्टासमोर न्यायलाच नको. तडीपार नको. आज छोटा गुन्हा करणारा उद्या मोठा गुन्हा करणार असतो. त्यामुळे सुधारण्याची वाट बघण्याची गरज नाही. सरकारविरोधी, लोकशाहीविरोधी, देशविरोधी काम करणाऱ्या प्रत्येकाला असेच गोळ्या घालून मारले पाहिजे. बलात्काऱ्यांना हाच न्याय हवा. बलात्कार केला. मेडिकल रिपोर्ट आला. त्यात कोणत्या व्यक्तीने बलात्कार केला हे सिद्ध झाले. मग घाला गोळ्या. गुन्हेगारांनी गुन्हे करायचे. कोर्टाने शिक्षा सुनवायची. आणि मग जनतेने जो कर भरला आहे त्या पैशातून त्यांना पोसत बसायचे. गरज नाही या गोष्टीची. गुन्हेगारांना गोळ्या घाला आणि संपवा. हीच व्यवस्था उत्तम. 

मागच्या सात दिवसात योगीजींनी सहा गुन्हेगारांचा एन्काउंटर केला आहे. याला म्हणतात कार्यक्षमता. योगीजी, उधोजी आणि गधोजी. यातलं गधोजी हे विशेषण ज्यांना गुन्हेगारांना पाठीशी घालणारं सरकार आवडतं. आणि जे तशा सरकारला पाठींबा दर्शवतात त्यांच्यासाठी आहे.

2 comments: