Sunday, 12 July 2020

शरद पवार कितीही मुरब्बी असले तरी

cartoon edited by vijay shendge

साहेब म्हणतात, 'युती झाली नसती तर भाजपच्या आणखी ४० ते ५० जागा कमी आल्या असत्या.' परंतु प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढतो तेव्हा राष्ट्रवादीची किती धूळधाण होते हे साहेब का लक्षात घेत नाहीत. राष्ट्रवादीची स्थापना
करून २० वर्षे झाले. परंतु आजवर राष्ट्रीय राजकारणाला गवसणी घालणे सोडा. राज्यात स्वबळावर सत्ता मिळवणेही राहू द्या. आघाडीचे राजकारण करताना शरद पवारांना राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री खुर्चीत बसवणे सुद्धा त्यांना साधलेले नाही. मग शरद पवार यांच्यावर मुरब्बी राजकर्त्याचा शिक्का कोणी आणि कशाच्या बळावर मारला? बरं राष्ट्रवादीचे म्हणून जे काही आमदार खासदार निवडून येतात ते तसे काँग्रेसचेच असतात हे कोणाला नाकारता येईल?
  
मित्रहो, 'साहेबांना काँग्रेस संपवायची आहे' या पोस्टमधील राजकीय विश्लेषणाशी काहीजण सहमत नाहीत. परंतु पोस्टच्या अगदी सुरुवातीला मी, 'मध्यावधी निवडणुका होतील हि पहिली शक्यता. आणि भाजप राष्ट्रवादी युती होऊ शकते हि दुसरी शक्यता.' असे म्हटले आहे. शरद पवार यांचे राजकारण अत्यंत आत्मकेंद्री आहे.त्यामुळे भाजपसोबत गेलो तर मरणासन्न झालेल्या काँग्रेसला आणखी उतरती कळा लागेल. त्याच बरोबर शिवसेनेलाही जळमटं लागतील. आणि केंद्रात नाही पण कमीत कमी राज्यात तरी आपण भाजपला आव्हान निर्माण करू शकू असे पवारांच्या मनात नक्की असेल. 

महाराष्ट्रात २७ टक्के मराठा, ७ टक्के कुणबी, आणि १६ टक्के SC तसेच ST आहेत. या सगळ्यांची मोट बांधता आली तर महाराष्ट्रात शरद पवार भाजपला शह देऊ शकतात. अर्थात अशी मोट बांधणे शरद पवारांना गेल्या २० वर्षात जमले नाही. आणि जातीयवादापेक्षा धर्मवाद आणि राष्ट्रवाद जनतेला अधिक महत्वाचा वाटत असल्यामुळे शरद पवारने गणित जुळेल अशी शक्यता कमीच. 

आजवर अनेक दलित नेत्यांना पुढे आणून शरद पवारांनी अनेकदा जातीयवादाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. आणि श्वासात प्राण आहे तोवर शरद पवार तसा प्रयत्न करत राहतील. परंतु रात्र थोडी सोंगे फार यातला हा प्रकार आहे. त्यामुळे ती एक शक्यता मी बोलून दाखवली आहे. तसेच होईल असा माझा दावा नाही.  

आता शरद पवार कितीही मुरब्बी असले तरी त्यांच्यावर अंकुश कसा ठेवायचा? त्यांना वेसण कशी घालायची? त्यांचा उधळणार वारू कसा आवरायचा? त्यांच्या गळ्यात कधी आणि कसे लोढणे घालायचे? हे भाजप नेतृत्वाला पुरेपूर माहित आहे. खरेतर २०१९ च्या निकालानंतर शिवसेनेचा हट्ट पुरवून भाजपला सत्ता स्थापन करणे फारसे अवघड नव्हते. आजवर भाजप नेहमीच नम्रतेने वागला आहे. भाजप नमते घेते आहे त्यामुळे त्यांने हवे तसे वाकवू, असा विचार करून शिवसेना नेहमीच मुजोरपणा करत आली. त्यातून झाले काय भाजपची नम्रता आणि शिवसेनेचा मुजोरपणा जनतेच्या लक्षात आला. त्यामुळे जनमानसाच्या मनातील प्रतिमेला तडा गेला आहे. त्यामुळे यापुढे भाजपचा अश्वमेघ रोखणे पवारांनाच नव्हे, कोणालाही शक्य नाही.

3 comments:

  1. बर्याच अंशी बरोबर

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्द्ल मनापासून धन्यवाद.

      Delete
  2. Apple Watch Series 6 Titanium - TiMetal Arts
    Watch Series aftershokz trekz titanium 6 Titanium. Tipe ray ban titanium your heart with the latest Apple black titanium fallout 76 Watch Series 6 ti 89 titanium calculator Titanium. You'll love the range of features titanium exhaust tubing and

    ReplyDelete