Monday 6 July 2020

शिवसेनेचा धोबीका कुत्ता होणार हे नक्की.



२०१९ च्या विधानसभा निवडणुकात भाजप एकटी १२० ते १२५ जागा जिंकेल असं फडणवीस यांना वाटत होतं. 'फिर एक बार मोदी सरकार' या घोषणेप्रमाणेच 'मी पुन्हा येणार' या फडणवीस यांच्या डरकाळीत सुद्धा तथ्य
होतं. शिवसेना-भाजप युती असताना आपण सत्तेच्या रेषेला स्पर्श करू शकणार नाही याची काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खात्री होती. आम्ही मोठे भाऊ म्हणत स्वतःच्या पाठीवर थाप मारून घेणाऱ्या शिवसेनेला या सगळ्यात आपल्याला कुठे फट  सापडते आहे एवढं बघायचं होतं. 

बाळासाहेब गेल्यापासून युतीचं राजकारण म्हणजे, 'वरून किर्तन, पण आतून तमाशा' अशातला प्रकार होता. शिवसेना पाच वर्षे सत्तेची फळ चाखत होती. त्याच बरोबर आम्ही कोणत्याही क्षणी सत्तेतून बाहेर पडू शकतो म्हणत खिशात राजीनामे घेऊन फिरत असल्याचं सांगत होती. परंतु त्यांनी खिशातले राजीनामे कधीच बाहेर काढले नाहीत. सत्ता भोगली. मुख्यमंत्र्यांवर, मोदींवर वेळोवेळी तोंडसुख घेतलं. 

असो. २०१९ चे विधानपरिषदेचे निकाल लागले. भाजपला १०५ जागांवर समाधान मानावं लागलं. आपल्याशिवाय भाजप सत्ता स्थापन करू शकत नाही. हे शिवसेनेच्या लक्षात आलं. शिवाय हवं ते पदरात पाडून घेण्याची हिच वेळ आहे. 'आता नाही तर पुन्हा कधीच नाही' या मंत्राने उचल खाल्ली. खरंतर मुंबई महानगरपालिकेत शिवसेना ८४ आणि भाजप ८२ असा केवळ २ जागांचा फरक असतानाही, भाजपने आख्खी महापालिका शिवसेनेच्या घशात घातली होती. त्यामुळे शिवसेना समंजसपणे वागेल असे फडणवीसांना वाटत होतं. परंतु समंजसपणे वागण्यासाठी शहाणपण असावं लागतं. शहाणपणाचा अभाव असलेली शिवसेना आडमुठेपणा करत राहिली.

२०१४ निवडणुकीचे निकाल लागले तेव्हाही शिवसेनेने अडमुठेपणा केला होताच. विरोधात बसण्याची नौटंकी केली होती. साहेबांनी भाजपला बिनशर्त पाठींबा देण्याची तयारी दाखवली होती. परंतु फडणवीस हुशार होते. लांडग्यावर किती विश्वास ठेवायचा याची त्यांना जाण होती. म्हणून त्यांनी क्षणभर सुद्धा राष्ट्रवादीचा प्रस्ताव स्वीकारला नाही. शिवसेनेची समजूत काढली. जुन्या मैत्रीची आठवण करून दिली. आणि शिवसेनेला आपल्या गोटात घेतलं. पण सत्तेत राहून सुद्धा शिवसेना धुसफूस करत राहिली. 

साहेबांचं भिजणं कामाला आलं नव्हतं हे २०१९ च्या निकालानंतर स्पष्ट झालं होतं. २९ वरून ५४ वर झेप घेतली. पण काहीही केलं तरी आघाडीला सरकार स्थापन करता येत नव्हतं. २०१४ ला फडणवीसांना ऑफर दिली होती. परंतु हात दाखवून अवलक्षण असं म्हणण्याची वेळ आली. फडणवीसांनी पवारांच्या बिनशर्त पाठींब्याला केराची टोपली दाखवली. हात पोळले होते. त्यामुळे यावेळी साहेबांनी शिवसेनेवर जाळं टाकलं. आणि शिवसेना त्यात अडकली. पवारांनी आयुष्यात अनेक माणसांना मोठं केलं आणि अनेकांना धुळीला मिळवलं. ते जे काही करतात ते त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या पक्षाच्या भल्यासाठी. त्यामुळे साहेबांनी आपल्याला टेकू दिला तो त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी. आपल्याला मुख्यमंत्री करण्यासाठी नव्हे हे अल्पमतीच्या शिवसेनेच्या लक्षात आलं नाही. आणि ते बरोबर साहेबांच्या जाळ्यात सापडले. मुख्यमंत्रीपद भोगलं. परंतु निवडणुका ४ महिन्यांनी लागतील अथवा १४ महिन्यांनी. पण जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा शिवसेनेचा न घर का ना घाट का असा धोबीका कुत्ता होणार हे नक्की.     

No comments:

Post a Comment