शाळकरी वयात प्रजासत्ताकदिनी आणि स्वातंत्र्यदिनी प्रभातफेऱ्या निघायच्या. 'महात्मा गांधी कि जय', 'नेहरू चाचाकी जय', 'इंदिरा गांधी कि जय' अशा घोषणा दिल्या जायच्या. शाळकरी वयातला मी देखील त्यात सहभागी
असायचो. १४ नोव्हेंबर हा चाचा नेहरूंचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जायचा. तो बालदिन म्हणून साजरा होत असला तरी, नेहरूंनी एखाद्या मुलाला उचलून घेतल्याचा फोटो मी आजवर पाहिला नाही.
महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह केला. त्यांनी दांडी मार्च काढला. हे आम्हाला शिकवलं गेलं. गांधी जन्माला आले नसते तर आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं असं आमच्या मनावर बिंबवलं गेलं. गांधीजींच्या अहिंसेमुळे कोणताही रक्तपात न होता आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, हे आमच्या मनावर कोरलं गेलं. परंतु आमच्या मनावर असं कोरत असताना, स्वातंत्र्य लढ्यात लाखो स्वातंत्र्यवीरांनी प्राणाची आहुती दिली, हे आमच्यापासून लपवलं गेलं. जालियनवाला बाग हत्याकांड तरचार सहा ओळीत शिकवलं गेलं.
गांधीजींचे दोन फोटो मी अगदी लहानपणापासून पहात आलो आहे. एक काठी टेकवत दांडी मार्चमध्ये चालत असल्याचा आणि दुसरा सांय प्रार्थनेला जाताना डाव्या उजव्या बाजूला आधाराला दोन तरुणी असल्याचा. ज्या वयात फारसं कळत नव्हतं तेव्हाही आधाराला तरुणीच का? तरुण का नाही? असा प्रश्न पडायचा. महात्मा गांधी यांचे 'माझे सत्याचे प्रयोग' मी मनापासून वाचले आहे. परंतु ते पुस्तक वाचून मी अजिबात भारावून गेलो नाही . त्यांच्या त्या पुस्तकांपेक्षा आमच्या आनंद यादवांच्या, 'झोंबी' , 'नांगरणी' या आत्मकथनात्मक कादंबऱ्या दहापटीने श्रेष्ठ आहेत.
पंडित नेहरू सिगारेट ओढत असल्याचा आणि माउंट बॅटन यांची सिगारेट शिलगावत असल्याचा फोटो अलीकडे आमच्या दृष्टीस पडू लागला आहे. विक्रम साराभाई यांच्या पत्नीला तर त्यांनी ज्या रितीने जवळ घेतले आहे ते पहिले कि फार वाईट वाटते. एखाद्या स्त्रीशी कितीही घरोब्याचे संबंध असतील तरी पंत्रप्रधान या सर्वोच्च पदावरील सामाजिक मर्यादा पाळायलाच हव्यात ना. नेहरूंचे ' Discovery of India' देखील मी वाचले आहे. परंतु भारताचा इतिहाच इतका उज्वल आणि समृद्ध आहे कि त्यात नेहरूंचं मोठेपण कुठेच दिसून येत नाही. गांधीजींच्या 'माझे सत्याचे प्रयोग' आणि नेहरूंच्या 'Discovery of India' या पुस्तकांपेक्षा सावरकरांचे 'माझी जन्मठेप' आणि गोपाळ गोडसे यांचे 'गांधी हत्या आणि मी' हि पुस्तके अधिक जवळची वाटतात. ती पुस्तके लिहिलेली वाटत नाही. अंतःकरणातून आल्यासारखी वाटतात.
आपल्या राष्ट्रपुरुषांविषयी बदनामीकारक लिहू नये याची मला पूर्ण जाणीव आहे. कारण असे करताना त्या राष्ट्रपुरुषांची बदनामी होते कि नाही त्यापेक्षा, माझ्या राष्ट्राची बदनामी होते हे नक्की. परंतु 'एखाद्या देखण्या पुरुषाकडे स्त्रियांनी आकर्षित होणे हा मानवी स्थायीभाव आहे' असे म्हणत एका काँग्रेस समर्थकाची नेहरूंच्या स्त्रीलंपटपणाचं समर्थन करणारी पोस्ट वाचली तेव्हा रहावलं नाही. पंत्रप्रधान होऊन बायका मिठीत घेणाऱ्या नेहरूंपेक्षा, देशासाठी बायकोचा त्याग करणारे मोदी लाख पटीने थोर आहेत, हे ध्यानात असू द्या. संपादक असलेल्या संजय राऊतने आणि पन्नाशी उलटूनही बोहल्यावर चढायची संधी साधायला ज्याला जमलं नाही त्या राहुल गांधीने त्यांच्याविषयी बोलू नये हेच उत्तम.
आपल्या नेत्याबद्दल अभिमान असावा. पण दुसराला कमी लेखून आपली उंची वाढवणे म्हणजे अंध भक्ती.
ReplyDeleteहेच काँग्रेसी भक्तांनी केलं. आता मोदी भक्त तेच करत आहेत.
कमी दाखवण्याचा हेतूच नाही. 'चौकीदार चोर है' म्हणताना, आणि टुकार कार्यकर्त्यांकडून वदवून घेताना राहुल गांधींना लाज वाटली नाही. मग इतरांनी विधिनिषेध बाळगावेत अशी अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे. आणि मी तर अगदी लहानपणापासून माझ्या मनात ज्या भावना होत्या त्याही मांडल्या आहेत.
Deleteखुप मार्मीक आणि परखड लिहीले आहे. खरचं वर्तमान काळातील गतीमान भारत मुलांना शिकविला पाहीजे. पंतप्रधान म्हणुन अभिमान वाटावा असेच आहेत मोदी. आपलं लिखान वास्तविक आणि चुकीचा इतिहास बिंबविणाऱ्यांसाठी चपराक आहे. धन्यवाद.
ReplyDeleteअभिप्रायाबद्द्ल मनापासून धन्यवाद.
Delete