Saturday 11 July 2020

घनश्याम उपाध्याय ..... हाय हाय

cartoon by vijay shendge

'घनश्याम उपाध्याय' हे नाव किती जणांना माहित आहे कोणास ठाऊक? परंतु ज्यांचे वाचन चांगले आहे, त्यांना हे नाव नक्की माहित असेल. तरीही थोडी माहिती देतो. 'घनश्याम उपाध्याय' हा विकास दुबेचा वकील. विकास
दुबेला अटक झाली त्याच दिवशी रात्री दोन वाजता घनश्याम उपाध्यायने सुप्रीम कोर्टात ऑनलाईन याचिका दाखल केली होती. त्यात त्याने, 'विकास दुबेच्या पाच साथीदारांचे एन्काऊंटर बेकायदेशीर तसाच अमानवी होता. गुन्हेगारांचा अशा रितीने एन्काऊंटर होताना दिसते तेव्हा देशाची वाटचाल, तालिबानच्या दिशेने होत आहे असे वाटते.' असे म्हटले आहे.

त्याच्या याचिकेत पुढे तो असेही म्हणतो कि, '२००८ च्या मुंबई बॉम्ब हल्यातील आरोपी, अजमल कसाबलाही बचावाची संधी दिली गेली. तशी संधी मिळणे हा विकास दुबेचा अधिकार आहे. त्यामुळे विकास दुबेचा एन्काउंटर करण्यात येऊ नये, असे आदेश, सुप्रीम कोर्टाने युपी सरकारला आणि पोलीस प्रशासनाला द्यावेत.' परंतु मोदी आणि योगी दोन पावले सगळ्यांच्या पुढे असतात. त्यामुळे सकाळी उजाडून कोर्ट सुरु होण्याच्या आधीच पोलिसांनी विकास दुबेला यमसदनाला पाठवले होते.

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधवचा खटला लढण्यासाठी, नाममात्र १ रुपया फी घेणारे हरीश साळवे कुठे? आणि गुन्हेगारांना, देशद्रोही शक्तींना पाठीशी घालणारे घनश्याम उपाध्याय, कपिल सिब्बल सारखे पोटार्थी वकील कुठे? नकली कागदी पुराव्यांच्या आणि विकाऊ साक्षिदारांच्या आधारे खोट्याचे खरे करणाऱ्या सर्व वकिलांना गोळ्या घालायला हव्यात. पोटाची खळगी भरण्यासाठी खऱ्याचे खोटे करणाऱ्या या वकिलांना जगण्याचा तरी काय अधिकार आहे?   

वकिलांनी सादर केलेले पुरावे, खरे असल्याची खात्री करून घेणे, हे न्यायदेवतेचे अर्थात न्यायासनाच्या खुर्चीत बसणाऱ्या व्यक्तीचे काम आहे. ते काम चोख होत नसेल तर खोटे साक्षी पुरावे सादर करणाऱ्या वकिलाला, आणि त्या पुराव्यांची सत्यता पडताळून न पाहता निर्दोष व्यक्तीला गुन्हेगार ठरविणाऱ्या न्यायाधीशांची सनद रद्द का करू नये?

निरव मोदी असो, विजय मल्ल्या असो अथवा विकास दुबे असो, हि कुप्रवृत्तीची माणसं या चारसहा वर्षात मोठी झालेली नाहीत. मायावती, अखिलेश यादव, राहुल गांधी, प्रियांका गांधी या मागील राज्यकर्त्यांनीच अशा कुप्रवृत्तींना खतपाणी घातलं आहे. आणि आज तेच गळा काढत आहेत. तुरुंगात असताना छगन भुजबळांच्या छातीत नेहमी दुखायचे. आता मात्र त्यांना बाळसे आले आहे. हा माणूस तुरुंगातून सुटून येतो. आमदार होतो. आणि विकास दुबेचा एन्काऊंटर झाला म्हणून हळहळ व्यक्त करतो. यावरून गुन्हेगारांचे पोशिंदे कोण? हे जनतेच्या लक्षात येते.

खरेतर देशविरोधी, राष्ट्रविरोधी कृत्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला गोळ्या घालून मारण्याचे स्वातंत्र्य पोलीस प्रशासनाला हवे. आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली तेव्हा हे मानवतावादी झोपले होते काय? त्यामुळे पोस्टच्या अखेरीस, 'घनश्याम उपाध्याय..... हाय हाय' असेच म्हणेन. परंतु हा धिक्कार एकट्या घनश्याम उपाध्याय याचा नसून गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठबळ देणारया विचारसरणीचा आहे. हे नक्की.    

No comments:

Post a Comment