मित्रहो,
नमस्कार.
मी विजय शेंडगे. आजवर
ब्लॉगरवर रिमझिम पाऊस अर्थात लोकशाहीचा पहारेकरी, वर्डप्रेसवर रे घना या नावाने ब्लॉग लिहीत होतो. जवळ जवळ आठ दहा वर्ष मी अशा रितीने ब्लॉग लिहितो आहे. अनेकदा नियमित लिहिणे होत नाही. त्यामुळे ब्लॉगवरचा ऑडियन्स कमी होतो. परंतु आपण पब्लिक प्लॅटफॉर्मवर लिहिले तर नियमित लिहिलेच पाहिजे अशी गरज पडत नाही. तुम्ही कधीही पोस्ट लिहिली तरी तुमचा ऑडियन्स पोस्टवर येऊ शकतो. त्यामुळे मी आम्ही साहित्यिक आम्ही कलावंत या पब्लिक पोर्टलवर लिहिण्याचे ठरविले आहे.
आपणही या पब्लिक पोर्टलवर लिहावे असे मी आपणास सुचवेन.
सर्वात महत्वाचे म्हणजे हे पब्लिक पोर्टलवर भारतीय बनावटीचे आहे. webster developers या भारतीय कंपनीने हि वेबसाईट डेव्हलप केली आहे. लेखक, चित्रकार, शिल्पकार, वादक, गायक अशा सर्व कलावंतांसाठी हे मुक्त व्यासपीठ आहे. प्रत्येकजण आपल्या कविता, कथा, इतर लेखन, अनुभव इथे लिहू शकतील. आपले फोटो, व्हिडीओ पोस्ट करू शकतील.
सर्वात महत्वाचे म्हणजे यातील आर्ट मॉल या विभागात लेखकांची प्रकाशित पुस्तके, चित्रकारांची चित्रे, शिल्पकारांचं शिल्पकृती वा अन्य इतर प्रकारच्या कलाकृती इथे सेल साठी उपलब्ध करून देता येणार आहेत. त्याचप्रमाणे साईट व्हिजिट करणारे रसिक इथून त्यांना आवडणाऱ्या कलाकृती खरेदी करू शकणार आहे.
खूप चांगली माहिती आहे.पुढच्या वेळी माझ्या ब्लॉगला भेट द्या
ReplyDeleteJio Marathi News