साहेब, शिवरायांचे नाव घेऊन, जनसेवेच्या हेतूने बाळासाहेबांनी पक्ष स्थापन केला. बाळासाहेबांच्या हयातीत त्यांनी सत्तेसाठी कधी अट्टाहास केला नाही. परंतु आपण मात्र बाळासाहेबांची चितेची राख खाली बसू दिली नाही.
सच्चा शिवसैनिक अजूनही बाळासाहेबांच्या नावाने विलाप करतो आहे. तुम्ही मात्र 'आता ना तर पुन्हा कधीच नाही' असं म्हणत मुख्यमंत्रीपदाच्या बोहल्यावर चढलात. पण सत्तेत येऊन तुम्ही नेमकी काय जनसेवा केली? महाराष्ट्राचं काय कल्याण झालं? बेकारी संपली का? हो, पण तुमचं पिल्लू सोबत असल्याशिवाय तुम्ही घराबाहेर पडत नाही हे मात्र अगदी खरं.
तुम्ही जनसेवा किती केली माहित नाही, परंतु विरोधी पक्ष तर तुमच्या भ्रष्ट कारभाराविषयी बोलतोच आहे. परंतु जनता सुद्धा उघडपणे बोलू लागली आहे. कार्डबोर्डचे बेड बनवले त्यात भ्रष्टाचार झाला. १२०० चे बेड २८०० ला घेतले. डेड बॉडीसाठीची ६०० ची प्लास्टिक बॅग ६५०० ला घेतली. मग आयसोलेशन सेंटर उभारणीत, एरिया सॅनिटायझेशन मध्ये, शिवथाळीमध्ये, कुठे कुठे आणि किती भ्रष्टाचार झाला असेल? अहो ई-पास, नॉन कोव्हीड मेडिकल सर्टिफिकेट देणाऱ्या एजन्सी सुद्धा उदयाला आल्या. केवढी हि बोगसगिरी! आणि हि अशी बोगसगिरी फक्त तिघाडी सरकारमध्येच होऊ शकते.
मुळात काँग्रेस- राष्ट्रवादीला सत्ता हवी असते तीच भ्रष्टाचारासाठी. चारा छावण्यात घोटाळा, जलसिंचनमध्ये घोटाळा, आदर्श घोटाळा किती उदाहरणे सांगायची. लवासा काही कुणाच्या घामाच्या पैशातून उभे राहिलेले नाही. यांचे हे असे कारनामे तुम्हाला माहित नाहीत का? परंतु चोरांच्या साथीने का होईना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यासाठी तुम्ही त्यांच्याशी युती केलीत. मागील पाच वर्ष सत्तेत राहून तुमच्या फारसे काही हाती लागलेले नव्हते. स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करणारे सरकार सत्तेत होते ना. आता मात्र चंगळ असेल. 'ना खाऊंगा और ना हि खाने दूंगा' हे मोदींचे धोरण होते. परंतु तुमचा मात्र 'मैं भी खाऊंगा, और दुसरोंको खाने दूंगा' हाच मंत्र असावा असे दिसते.
अधिकाऱ्यांच्या बदल्या हा किती साधा विषय. पण त्यातही तुमचे मानापमान नाट्य रंगले. बदल्या झाल्या काय? त्यानंतर रद्द झाल्या काय? मग बैठक झाली, त्यानंतर पुन्हा बदल्या झाल्या केवढी हि कार्यतत्परता! पण ज्यांना केवळ भ्रष्टाचार करायचा आहे, ते बदल्यांमध्ये देखील मोठी माया गोळा करतात याची आम्हाला जाणीव आहे. नेमका कितीचा व्यवहार झाला? तुम्ही हॉस्पिटलचे बिल जास्त येते त्याविषयी काही बोलत नाही, तुम्ही शाळांनी फी आकारू नये याविषयी काही बोलत नाही. सहा महिने शाळांनी फी घेऊ नये असा आदेश काढा ना? पण ते तुम्ही नाही करणार. कारण जनहित केवळ तुमच्या मुखात आहेत कृतीत नाही.
No comments:
Post a Comment