कृती काहीही करायची नाही. नुसत्या घोषणा करायच्या, जनतेसमोर तुकडा टाकायचा. जनता आपली बसते चघळत. जनतेसमोर तुकडे टाकणं एवढंच महाबिघाडी सरकारचं काम. घोषणा केली कि त्यात जनतेचं सुख
किती याचा विचार कोणीही करत नाही. परवा माझ्याकडे एक इमेज आली होती. एका बाजूला मोदीजींचा फोटो होता. आणि दुसऱ्या बाजूला अजित पवारांचा होता. आणि त्यात मोदींनी रेल्वे भरती थांबल्याचं आणि अजित पवार १० हजार पोलिसांची भरती करणार असल्याचं म्हटलं होतं. कोणीतरी अर्धवट माहितीचा विघ्नसंतोषी माणूस अशी पोस्ट तयार करतो. आणि बाकीची मंडळी ती पोस्ट डोळे झाकून फॉरवर्ड करत राहतात.
महाभकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून महाराष्ट्रासमोरील कोणते प्रश्न निकाली निघाले? संपूर्ण कर्जमाफी झाली का? १०० युनिट पर्यंत मोफत वीज मिळाली का? (आमची अपेक्षा नाही हा, असल्या फुकटेगिरीची!) शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का? कांद्याला भाव मिळाला का? महाराष्ट्रात किती उद्योगधंदे आले? किती बेरोजगारांना रोजगार मिळाला? मराठा आरक्षणाचे प्रश्न मिटले का? धनगर आरक्षणाची तर कोणाला आठवण देखील उरली नाही. जनहिताची नेमकी कोणती कामं सरकारने केली?
असो. तर १० हजार पोलीस भरती करणार हि अजित पवारांची घोषणा मला सुद्धा आठवते. अर्थात सरकार टिकले तर भरती करतील. भरती करतील म्हणजे काय करतील? त्यांना कुठे इमारत बांधायची नाही. कुठल्या मशीन खरेदी करायच्या नाहीत. रेट ठरलेले आहेत. पोलीस भरती ५लाख, शिक्षक भरती १० लाख, बँकेतली भरती १५ लाख. १० हजारातले निम्मे पोलीस पैसे घेऊन भरले तरी ५०००००X ५०००=२५००००००००.रुपये होतात. किती होतोय आकडा बघितलं का? २५० कोटी. पोलीस भरती करायची असलीच तर ती या २५० कोटीसाठी. तुमच्या हितासाठी नव्हे.
बरं सरकार टिकलंच, भरती केलीच तरी त्यासाठी इमारत उभारायची नाही, मशीन घ्यायच्या नाही, घाम गाळायचा नाही, स्वतःच्या खिशातला छदाम घालायचा नाही, पगार स्वतःच्या खिशातून द्यायचा नाही. सरकारी तिजोरी उघडायची आणि पगार द्यायचे. प्रत्यक्षात भरती होते कि नाही, माहित नाहीत. १० हजार पोलीस भरणार कि २००० पोलीस भरणार तेही माहित नाही. पण पोलीस भरती होणार म्हणून यडे अब्दुल्ले नाचायला लागले. बरं हे दिवाणे अब्द्दुल्ले असे काही नाचत आहेत जणू काही यांच्या प्रत्येकाच्या घरातला एक माणूस हाताला धरून पोलीस भरतीसाठी नेला आहे.
मोदींनी रेल्वे भरती थांबवायला सांगितल्याची कोठे बातमी नाही. आणि तसं केलं असेल तर मोदींनी योग्यच केलं असंच मी म्हणेन. कारण रेल्वे बंद आहेत. स्टेशनवर प्रवासी नाहीत. मग रेल्वेभरती करून काय करायचे? भरती केलेल्या कर्मचाऱ्यांनी पाठीवर घेऊन प्रवाशांची वाहतूक करायची का? मुळात अडचण अशी आहे कि आमच्या देशातल्या सुशिक्षित आणि विचारवंत म्हणवणाऱ्या मंडळींना घोषणा आणि कृती यातला फरक सुद्धा कळत नाही. पोलिसांचे पगार किती कापले? नर्सचे पगार किती कमी केले? कोव्हीड सेंटर उभारणीत किती पैसे खाल्ले? बोगस ईपास मध्ये किती घोटाळा केला? आपत्ती मध्ये सुद्धा भ्रष्टाचाराची एकही संधी सोडली नसेल यांनी पण ते ते कोणी बघणार नाही. पण बघाना जनता बघते आहे, आणि परमेश्वर सुद्धा सगळे जाणून आहे. घडा भरावा लागतो एवढेच.
No comments:
Post a Comment