Thursday 9 July 2020

खरंच, जनतेचं काँग्रेस वर प्रेम होतं?

cartoons by vijay shendge

भाजप सलग दोनदा सत्तेत आली. ती केवळ जनतेच्या प्रेमापोटी. परंतु स्वातंत्र्यानंतर १९५२ ते २०१४ या ६२ वर्षातली जवळजवळ ५२ वर्षे काँग्रेस सत्तेत होती. आणि त्यातील ४० वर्षे नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी
पंतप्रधानपदी होते. एक गांधी घराणं देशावर ४० वर्षे देशावर अखंड राज्य करत होतं. पण खरंच काँग्रेसने देशाचा विकास केला? आज जपान, चीन हि सर्व राष्ट्रे भारताच्या सोबतच स्वतंत्र झाली आहेत. आणि त्यांनी साधलेली पहिली तर ७० वर्षात आपण फार काही केलं नाही हे लक्षात येईल. 

देशात एवढी वर्ष देशावर राज्य करणारी कॉग्रेस पुन्हा सत्तेत येईल का? असा विचार केला तर, त्याचे उत्तर नकारार्थीच मिळेल. मग स्वातंत्र्यानंतर काँग्रेस इतकी वर्षे सत्तेत कशी राहिली? त्याची काही कारणं पुढीलप्रमाणे - 
१) मोठ्या प्रमाणात अशिक्षित, गरीब असलेल्या जनतेला, काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं असं वाटत होतं. आणि अभ्यासक्रमातून तसंच बिंबवण्यात आलं होतं. 
२) पहिल्या वीस वर्षात तर काँग्रेससमोर दंड थोपटून उभा राहील असा पक्ष देशात अस्तित्वतात नव्हता. जनता पक्ष अस्तित्वात आला. परंतु अंतर्गत लाथाळ्यांनी त्याची शकले झाली. 
३) १९८५ नंतर भारतीय जनता पक्ष अस्तित्वात आला. परंतु स्थानिक पक्षांचं वाढतं प्राबल्य भाजपला एक हाती सत्ता मिळू देत नव्हतं. 
४) जनतेची राजकीय विचारशक्ती विकसित झाली नव्हती. 
५) गरिबी हटाव या काँग्रेसच्या घोषणेकडे आशेने पहात जनता वर्षानुवर्षे काँग्रेसच्या हातात सत्ता देत होती. 

कॉग्रेसने एवढ्या प्रदीर्घ कालावधीत काय केलं - 
१) मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. 
२) मुस्लिम आणि इतर धर्मियांना बळ दिले. 
३) घराणेशाही निर्माण केली. 
४) काँग्रेसने विकास केला असता तर सत्तर वर्षात आम्ही चीन आणि जपानच्या पुढे गेलो असतो. 
५) परंतु काँग्रेसने तसे न करता जनतेला आरक्षण, अनुदान यात अडकवून ठेवले. 

विचार करू लागलेल्या आणि काँग्रेसने या देशाचे केवळ नुकसान केले आहे लक्षात आलेल्या जनतेने २०१४ ला भाजपच्या हातात सत्ता दिली. २०१९ ला भाजपच्या ओंजळीत वाढते घातले. आणि २०२४ ला भाजप स्वबळावर ( मित्रपक्षांशिवाय ) ३५० पेक्षा अधिक जागांवर सत्तेत येऊ शकते. 

मग पुन्हा काँग्रेस सत्तेत येणार कि नाही. याचे उत्तर १०० टक्के काँग्रेस कधीही सत्तेत येऊ शकणार नाही. काँग्रेसला सत्तेत यायचे असेल तर गांधी घराण्याची झूल फेकून द्यावी लागेल. प्रत्येक प्रांतातील घराणेशाही मोडीत काढावी लागेल. आणि सत्ताधाऱ्यांवर टिका करण्यापेक्षा विकासाच्या गोष्टी कराव्या लागतील. अन्यथा भाजप वर्षानुवर्षे सत्तेत राहील. आणि ते लोकशाहीच्या हिताचे नाही. सत्ताधारी पक्षाने लोकशाही मार्गाने देश चालवायचा असेल तर प्रबळ विरोधी पक्ष हवाच. परंतु प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य लोकशाहीला अत्यंत घातक आहे हे नक्की.  

No comments:

Post a Comment