Friday, 3 July 2020

कहाँ राजा भोज और .....

images by vijay shendge

मला मोदींच अथवा फडणवीस यांचं कौतुक करण्याचं काहीही कारण नाही. नेत्यांची बडवेगिरी करून आमदारकी खासदारकी पदरात पाडून घेणारे अनेक पत्रकार आहेत. कुमार केतकर, संजय राऊत हे पत्रकार

निव्वळ भाटगिरी करून खासदार झाले. अशी अनेक नावे घेता येतील. परंतु माझी अशी काहीही अपेक्षा नाही. तुम्ही आमदार व्हा, खासदार व्हा, पंतप्रधान व्हा नाहीतर मुख्यमंत्री व्हा, तुम्हाला कमरेचा करदोटा सुद्धा सोबत नेता येत नाही. माझा देश राहिला पाहिजे यासाठी हा माझा लेखन प्रपंच.

परंतु उद्धव ठाकरेंचं, राहुल गांधींचं कौतुक करणारी, त्यांची तळी उचलून धरणारी माणसं पाहतो तेव्हा या देशावर वर्षानुवर्षे परकीयांनी राज्य का केलं असेल याचा अंदाज येतो. संभाजी महाराजांचा घात करणारा त्यांचा सख्खा मेव्हणा होता. इतकी बेभरवशाची, विश्वासघातकी माणसं अवतीभोवती असतात आणि तरीही त्यांचं शेपूट धरणारी भुतं त्यांच्या भोवती असतातच. पण तुलना करणाऱ्या मंडळींनी आपण कोणाची कोणाशी तुलना करू शकतो आहोत याचं भान बाळगायला हवं ना. राजा भोज आणि गंगू तेली यांची तुलना कधी कशी होऊ होऊ शकते? गेल्या आषाढीला केवळ वारकऱ्यांचे हित लक्षात घेऊन फडणवीसांनी पंढरपूरला पूजेला जाण्याचे टाळले. वर्षावर प्रतीकात्मक पूजा केली. मग आज सगळे वारकरी घरात असताना उद्धव ठाकरेंनी पंढरपुरात पाय ठेवण्याची काय गरज होती? त्यांनी नसती पूजा केली तर काय अडले असते? 

महाराष्ट्रात पहिला रुग्ण सापडला. हजार झाले. दहाहजार झाले. मुंबईत आला. पुण्यात आला. माझ्या घरापासून चार सहा किलोमीटर दूर आहे. माझ्या ओळखीत कोणाला नाही असं म्हणता म्हणता आज सकाळी जेव्हा त्याची वहिनी कोरोना पॉझिटिव्ह आहे असा असा माझ्या मित्राचा फोन आला तेव्हा हबकलो. आज माझ्या मित्राच्या घरात पोहचलेला कोरोना उद्या कोणाच्याही घरात पोहचू शकतो. आणि तरीही काहीजण मुख्यमंत्र्यांना कार्यक्षम म्हणणार. धन्य आहे. 

गेल्या वर्षी महाराष्ट्रात पुराने घातलेलं थैमान सगळ्यांना माहित आहे. कोरोना औषधोपचार करून आटोक्यात ठेवता येईल. परंतु पुराचे पाणी औषध देऊन आटोक्यात आणता येणार नव्हते. आभाळाला हात लावून पाऊस थांबवता येणार नव्हता. तरीही फडणवीसांनी पूरग्रस्तांना हरप्रकारे मदत करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी नियम मोडीत काढले. परंतु काही मंडळींना दुसऱ्याच्या डोळ्यात नसलेलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यात असलेलं मुसळ दिसत नाही. 

अर्थात दुराचाराची, भ्रष्टाचाराची पाठराखण करणाऱ्या या मूठभर लोकांमुळे फारसा फरक पडणार नाही. तिघांची मोट बांधून सत्तेची खुर्ची बळकावणे नेहमीच शक्य होणार नाही. संजय राऊत यांचं आयुष्य सामनाच्या पानापुरतं आणि त्यांनी मोदींना चीन संदर्भात सल्ला द्यावा. मोदींना जाब विचारावा? तसे तर जिथे प्रश्न उपस्थित करावा तिथे मूग गिळून गप्प बसणारे, आणि नको तिथे प्रश्न उपस्थित करणारे या देशात कमी नाहीत. परंतु त्यांनी निर्माण केलेल्या वादळांचा जनतेवर प्रभाव होणार नाही हे नक्की. कारण कोण राजा भोज आणि कोण गंगू तेली यातला फरक समजायला जनता समर्थ आहे?

2 comments:

  1. Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.

      Delete