Sunday, 19 July 2020

खान तसा खान

images by vijay shendge

'खाण तशी माती' हि म्हण मला अगदी तोंडपाठ आहे. तरीही मी 'खान तसे खान' असं शीर्षक लेखासाठी निवडलं आहे. त्याला कारणही तसंच घडलं आहे.  यातलं खान हे मुस्लिम धर्मीयांसाठी आहेत हेही खरं. जगा आणि जगू
द्या. हीच माझी भूमिका. ज्याने त्याने आपापल्या धर्मावर प्रेम करावं. आपल्या जातीला छातीला कवटाळावं हे योग्य. परंतु दुसऱ्याच्या धर्मावर दुसऱ्याच्या जातीवर कोणी शिंतोडे उडवले तर ते चुकीचेच नाही का? मी कधी कोणत्या धर्मावर टिका केली नाही. करणार नाही. पण हिंदू धर्मावर कोणी चिखल उडवणार असेल तर मी शांत नाही राहू शकत.

ज्यांनी या देशात नाव कमावलं त्या अमीर खानच्या बायकोला या देशात असुरक्षित वाटतं, नसरुद्दीन शहाला या देशात रहायला नको वाटते, शाहरुख खानची भूमिका काय आहे हेही आपल्याला माहित आहे. कोणत्याही अतिरेकही हल्ल्यानंतर या मंडळींनी कधीही तोंड उघडलं नाही. हिंदू धर्मीयांनी गोहत्येविरोधात थोडी कठोर भूमिका घेतली कि यांचा इस्लाम खतरेमे येतो. अभिनेत्यांची वैचारिक भूमिका फार उंचीची असते असं नाही. त्यामुळे हि मंडळी काय म्हणतात हि बाब मी कधीच गांभीर्याने घेतली नाही. 

परंतु जो माणूस स्वतःला विचारवंत म्हणवतो, लेखक म्हणवतो त्याने ब्राम्हण धर्माविषयी, त्यांच्या चालीरीतीविषयी बोलावे हे मुळीच योग्य नाही. मुळात मुस्लिम काय, ख्रिश्चन काय, बौद्ध काय, आणि अन्य कोणतेही धर्मीय काय? कुणी आभाळातून पडलेलं नाही. हिंदू धर्माचा इतिहास किती जुना आहे ते ज्ञात नाही. पण दहा हजार वर्षापेक्षा नक्कीच जुना आहे. परंतु इतर सगळे धर्म हे अलीकडच्या दोन हजार अडीच हजार वर्षातले. त्यामुळे इतर सर्व धर्म, स्वतःची  पोळी भाजण्यासाठी राज ठाकरेने मनसे स्थापन करावी, शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन करावी, ममताने तृणमूल स्थापन करावी त्यातला प्रकार आहे. 

राजन खान यांनी ब्राम्हण पुरोहितांपेक्षा ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मगुरूंना श्रेष्ठ ठरवले आहे? कसे काय? मुस्लिम धर्मगुरूंनी आणि ख्रिश्चन पाद्रयांनी बलात्कार केलेली अनेक प्रकरणे सापडतील. दुसऱ्याच्या धर्मातील माणसे आपल्या धर्मात घेणारा धर्म आणि त्या धर्माचे धर्मगुरू श्रेष्ठ कसे? अन्याय झाले म्हणून हिंदु धर्मातील अनेकांनी अन्य धर्म स्विकारला असे आमच्या मनावर बिंबविले गेले आहे. वास्तव हेच आहे कि मुस्लिम धर्मियांनी बळजबरी करून तर ख्रिश्चन धर्मगुरूंनी पैशाचे आमिष दाखवून हिंदू धर्मियांना आपल्या धर्मात खेचले आहे. 

राजन खान यांच्या नावावर ४० पुस्तके आहेत. ती इथल्या प्रकाशकांनी छापली, ती इथल्या लोकांनी वाचली. इथल्या रसिकांनी त्यांना लेखक हि ओळख मिळवून दिली. आणि तरीही या माणसाने हिंदू धर्मातील चालीरीतींविषयी बोलावे. ज्यांना हिंदू धर्माचे वावडे आहे त्यांना या देशात वास्तव्य करण्याचा, इथले पाणी ग्रहण करण्याचा, इथले अन्न घशाखाली घेण्याचा काय अधिकार आहे? मी या गृहस्थांचे काही लेखन वाचले आहे. मी वाचलेल्या निम्म्याहून अधिक पुस्तकात वास्तववादाच्या नावाखाली बीभस्तपणा आढळून आला आहे. बीभस्त लिहिणाऱ्या माणसाने हिंदू धर्मियांवर, ब्राम्हण समाजावर काही ना बोललेलेच बरे. 

त्यांना वाटले असेल मी हिंदू समाजावर नव्हे. त्यातल्या ब्राह्मणजातीवर बोलतो आहे. काही हिंदूना ब्राम्हण जातीवर टिका केली तर आनंदच होणार आहे.त्यामुळे  कोणी काही बोलणार नाही. गप्प राहून लोक खपवून घेतील. पण राजन खान तसे नाही होणार. हिंदू धर्म एक आहे, एक राहील. तुम्हाला कुणाचे ब्रेनवॉश करायचे असेल तर अतिरेक्यांचे मनपरिवर्तन करा, हाफिज सईदला शहाणपणाच्या चार गोष्टी सांगा, तालिबानमध्ये जाऊन तिथे काय चालले आहे ते बघा. राष्ट्रगीत म्हणायला काही मंडळी विरोध का करतात त्याचा शोध घ्या. लव्ह जिहाद काय आहे ते तपासा. इथे सुखाचे दोन घास खाताय ना मग सुखाने रहा. आणखी काय सांगू. 

No comments:

Post a Comment