Friday, 21 May 2021

Tamohara Novel by vijay shendge, तमोहरा विजय शेंडगे लिखित कादंबरी

तमोहरा हि विजय शेंडगे लिखित कादंबरी. माधवी आणि तिची मुलगी साधना या खऱ्या अर्थाने या कादंबरीची नायिका. दोघीही आपल्या परीने आयुष्याला यशस्वीपणे तोंड देतात. 

माधवी हि अनाथ मुलगी. मुलगी झाली म्हणून कोणीतरी जन्मताच रस्त्यावर टाकून दिलेली. हि माधवी स्वतःच्या पायावर उभी रहाते. लग्न होतं. आणि लग्न झाल्यानंतर वर्षभरात नवरा नौकरी सोडून द्यायला सांगतो. काय करत असेल माधवी? तिचा नवरा तिला नोकरी सोडून द्यायला का सांगतो? साधनाच लग्न होतं. आणि तिचा देखील भ्रमनिरास होतो. काय करत असेल साधना? या सगळ्याची उत्तरं या कादंबरीत देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

चार महिन्यात ४०० हुन अधिक रसिकांची पसंती. प्रत्येकानेच एका बैठकीत कादंबरी वाचल्याचं कळवलं. प्रत्येकाच्या संग्रही असावी अशी हि कादंबरी. 

कादंबरी मागविण्यासाठी संपर्क : यशोदीप पब्लिकेशन्स, जोरी हाऊस, नारायण पेठ, बाबा भिडे पुलाचा पुढील                                                         चौकात, पुणे 

                                                 रुतवा प्रकाशन आणि वितरण, बेगमपुरा, औरंगाबाद                                     

                                                 विजय शेंडगे, पुणे ९४२२३५६८२३

ऑनलाईन उपलब्ध :                   बुकगंगा प्रकाशन, पुणे 



Monday, 29 March 2021

कप्प्यात डोकावताना

मी कवींवर फार झोंबणारी टीका करतो. कवींवरच नव्हे तर कोणत्याही सवंग लेखनावर फुलं उधळायला मला जमत नाही. त्यामुळे बहुतेकजण माझ्यापासून चार हात दूर राहण्याचा प्रयत्न करतात. कवी तर माझ्या सावलीला उभं राहणंही पसंत करत नाहीत. अगदी

Saturday, 13 March 2021

सहवास आणि आशीर्वाद.


दुपारी एका व्हॉट्स अप ग्रुपवर एकाने, "चांगल्या प्रतीचे आंबे कुठे मिळतील?" अशी विचारणा केली होती. खाणे, पिणे, फिरणे, मौज, मजा याचा शौक असलेलेच खूप. "चला पार्टी करू या. " तरुणांपासून, ज्येष्ठांपर्यंत आणि वृद्धांमध्येही अगदी पावला पावलाला सापडतील. परंतु

आठ दिवसात कोंबडीला पिल्लं सुध्दा होत नाही.

दोन दिवसावर आलेल्या एमपीएससी परीक्षा आज मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्या. आणि पुन्हा आठ दिवसात परीक्षा घेण्याचे वचन दिले. त्या वाचनाचा भरोसा काय? आठ दिवसांनी कोरोना ची परिस्थिती आणखी गंभीर झाली तर काय करणार आहात? की तेव्हा,

बॉम्बे बेगम आणि अयोध्येचा रावण

नेटफलिक्स वर बॉम्बे बेगम वेब सिरीज आहे. त्या विषयी आणि त्यातील भगवत गीतेचा आधार घेवून लिहिलेल्या संवादा विषयी जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु आज नव्हे कला क्षेत्रात अनेक वर्षापासून हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू चालीरीती , हिंदू रीतिरिवाज याच्या विरोधात लिहिले की तशा लेखकाचा सन्मान केला जातो. त्यालाच पुरस्कार दिले जातात. तशा साहित्यकृतीला,

'समतेचा ध्वज' प्रत्येक कवीने पदरी बाळगावा असा ग्रंथ




( प्रत्येक कवीने लेखकाने हा लेख वाचायलाच हवा.) 

जेष्ठ कवी उद्धव कानडे यांच्या समग्र कवितांचा आढावा घेणारा. त्यातील निवडक कवितांचा समावेश असलेला 'समतेचा ध्वज ' हा ग्रंथ खुद्द त्यांनीच मला दिला. वेळ काढून तो मी वाचला. जमेल तसा समजून घेतला. भारावून गेलो आणि आज पोस्ट लिहायला बसलो. कवी उद्धव कानडे मला गुरुतुल्य. त्यांच्या कवितेवर मी पामराने काय लिहावं. पण जे भारावलेपण आहे ते मला लिहिते करते आहे.  

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलगे

Saturday, 20 February 2021

तमोहराच भेट देईन , Tamohara Novel by vijay shendge

संजय पवार हे धनकवडी - बिबवेवाडी भागातील एक नामांकित LIC प्रतिनिधी. त्यांचं स्वतः चं ऐसपैस ऑफिस आहे. दहा वीस तरुणांना रोजगार पुरवतात. त्यांनी तमोहरा कादंबरीच्या १० प्रती बुक केल्या होत्या. ते म्हणाले, " मी माझ्या विमा धारकांना दरवर्षी डायरी देत असतो. यावर्षी डायरी हवी की कादंबरी असा पर्याय त्यांच्यासमोर ठेवणार आहे. आणि ग्राहकांनी कादंबरीला पसंती दिली तर

तमोहरा : tamohara : दोन ध्रुवावर दोघे आपण

काल सकाळी विजय शहासने या फेसबुक मित्राने इनबॉक्स मध्ये मेसेज केला. म्हणाले, "मला तुमची कादंबरी हवी आहे. काय करायला हवे?" यांची माझ्या पोस्टवर कधी कॉमेंट दिसली नाही. मित्रयादीत आहेत कि नाही याचीही मला कल्पना नव्हती.

 पण त्यांचा मेसेज पाहिल्यावर मी त्यांना, "पोस्टाने हवी असेल तर २३० रुपये गुगल पे करा." असं मी त्यांना सांगितलं.
 
तर ते म्हणाले, "तुमच्या हातून कादंबरीचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे."
 
मी म्हटलं,

Tamohara : तमोहरा : हि माझी लावायची वेळ असते

शिर्षकातील लावायची या शब्दाचे आंबट, चिंबट, तुरट, खारट असे कुणीही कितीही शब्दाछल करू शकतील. परंतु शिर्षकातील लावणे हा शब्द प्रयोग बसणे या अर्थी आहे. आता बसण्याचेही अनेक अर्थ निघतील. पण तळीरामांना नेमका अर्थ लक्षात आला असेल.

तर

Saturday, 25 July 2020

आम्ही साहित्यिक आम्ही कलावंत

 

मित्रहो,
नमस्कार.

मी विजय शेंडगे. आजवर

शिववडा ते शिवथाळी व्हाया शिवसेना : शिवभक्तांना कसे खपते?


परवा माझ्याकडे एक व्हिडीओ आला होता. कोणा स्टेज शो करणाऱ्या तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स वरून शाब्दिक कोटी करण्याचा प्रयत्न केला होता. काही शिववादी तरुणांनी त्याचा शोध घेऊन त्याला मार दिला. व्हिडीओ बनवून व्हायरल केला. त्या व्हिडिओची टॅगलाईन होती, 'नडला तर तोडला.' यातून समाजात काय संदेश पोहचला? केवळ मराठा समाजाला शिवाजी महाराजांच्या विषयी आदर आहे का? छत्रपती शिवाजी महाराज हि कोणाची खाजगी मालमत्ता नाही. परंतु तुम्ही छत्रपतींचा जयजयकार केला तर तुम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे. नाही तर नाही. असे वातावरण निर्माण केले गेले आहे.

व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिली. काय चुकलं त्यांचं? ते विधानसभेचं सभागृह नाही. राज्यसभेचं सभागृह आहे. तिथे आज तुम्ही शिवरायांचा जयघोष कराल. उद्या दुसरा महाराणा प्रतापांचा जयघोष करेल, कोणी बसवेश्वरांचा जयघोष करेल कसं चालेल हे? संजय राऊत यांनी उदयनराजेंना छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे मागितले होते. त्यांचं कोणी काय वाकडं केलं? का नाही कोणी संजय राऊतांची कॉलर पकडली? का नाही त्यांना टोले टाकले? का नाही त्यांची गाडी अडवली? सामनामध्ये मराठा समाज काम करत नाही का? का नाही त्यांनी काम बंद आंदोलन केलं? साहेबांच्या बरोबर आहेत ना मग सगळं. माफ असे आहे का? 

छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, त्यांना आदर्श मानून शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनेतलं 'शिव' हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावांमधलंच 'शिव' आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही. शिवाजी महाराजांचा मावळा म्हणूनच मराठी तरुण मोठ्या प्रमाणात शिवसेनेत दाखल झाला. शिवाजीतला 'शिव' आणि हिंदुत्वाच्या भगव्याने मराठी तरुणांना भुरळ घातली. बघता बघता शिवसेना फोफावली. ८० % समाजकारण आणि २० % राजकारण म्हणता म्हणता शिवसेनेनं समाजकारण फेकून दिले, हिंदुत्वाला मूठमाती दिली आणि फक्त राजकारण करण्याचा निर्णय घेतला.

मला आठवतं आहे अगदी सुरुवातीला शिवसेनेनं झुणका भाकर केंद्रे सुरु केली होती. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. परंतु या झुणकाभाकर केंद्रांच्या नावात,  शिव नव्हते. परंतु 'शिव' वडा म्हणत शिवसेनेने वडापाव जनतेसमोर आणला आहे, जेवणाच्या थाळीला 'शिव' थाळी म्हटलं हे कितपत योग्य आहे. यात छत्रपतींच्या प्रतिमेचा, कर्तृत्वाचा अपमान झाला आहे असं कोणालाही वाटले नाही? 'शिवसेना' हे नाव नक्कीच आक्षेपार्ह्य  नाही. परंतु शिववाडा आणि शिवथाळी? हे माझ्या तरी बुद्धीला पटलं नाही.

छत्रपती शिवाजी महाराज इतिहास पुरुष आहेत. ते राष्ट्रीय पुरुष आहेत. इंदिरा वडा, राजीव थाळी असे म्हणत त्यांच्या नावाचा कोणी बाजार मांडला नाही. मग वड्यात आणि थाळीत 'शिव' कसं चालू शकेल? वड्यात जोशी चालतील, रोहित चालेल. पण वड्यात 'शिव'? उद्या एखाद्याने महाराजांच्या नावाने वाईन शॉप सुरु  केलं तर चालेल का?

शिवसेना जनतेच्या मुखी रहावी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वडापावच्या गाड्या सुरु करता याव्यात म्हणून शिववडा सुरु केला. 'शिववडा' हे नाव वडापावच्या गाड्यांवर पाहिलं कि कारवाई करण्याची कोणीही हिंमत होऊ नये म्हणून शिव वडा. परंतु वड्यात आणि जेवणाच्या थाळीत छत्रपतींचं नाव आणणं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाला काळिमा फासण्यासारखं नाही का? इतरांचं जाऊ द्या हो पण छत्रपतींना दैवत मानतात त्यांना शिव वडा आणि शिव थाळी कशी चालते? 

Thursday, 23 July 2020

सलोनी, यु आर ग्रेट?

image by vijay shendge

सलोनी, आपलं माणूस मरणाच्या दाढेतून परत येतं तेव्हा आनंद होतोच. अशा वेळी त्याला डोळे भरून पहावं. त्याच्यावर डोळ्यातल्या पाण्याचा अभिषेक करावा. त्याला तांब्याभर पाणी द्यावं. त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवून माया करावी. त्याला गच्च मिठीत घ्यावं अशी पद्धत होती. आजवर कॅन्सरचे पेशंट बरे होऊन घरी आले तेव्हा कोणी फुलं उधळल्याचं ऐकिवात नाही. पण अलीकडे हि फुलं उधळण्याची रित आली आहे. सोम्या उधळतो म्हणून गोम्या उधळतो. यमी नाचते म्हणून पमी नाचते. 

पण सलोनी खरंच ग्रेट नाचली आहेस तू. टाईमिंग सुद्धा काय मस्त साधलस! छानच वाटलं पाहून. तुझा आदर्श घेऊन आता रस्तोरस्ती असे नाचे आणि नाच्या दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको. सलोनी मला सांग कसं प्लॅनिंग केलं होतं? म्युझिक कोणतं निवडायचं. स्टाईल कोणती ठेवायची. सगळं आधीच ठरवलं होतं का? आई बाबांची परवानगी घेतली होती का? आणि भाऊ. तो तर सामील होता असं दिसत होतं. बँक स्टेजला आवाज येत होता त्याचा. पण छान वाटलं. समाजाला दिशा दिलीस तू. आणि तुझं कर्तृत्व किती थोर होतं याची तुला कल्पना आली असेलच! अगं चक्क मीडियाने दखल घेतली तुझी. मीडियाचं तसं फार काही विशेष वाटतं नाही. ते नेहमी सवंग गोष्टीच दाखवत असतात. ( सवंग म्हणालो का मी.... सॉरी.... सॉरी.)

हा! तर, मीडियाने तर तुझी दखल घेतलीच. पण यशोमती ठाकूर या मंत्रीणबाईंनी सुद्धा तुला फोन केला. काय भारी वाटलं असेल ना तुला. आमचे नेतेसुद्धा किती जनताभिमुख? हेही ठळकने दिसून आलं. आणि सगळ्याचं टायमिंग किती ग्रेट. तू नाचतेस काय, तुझा व्हिडीओ त्यांच्यापर्यंत पोहचतो काय, त्या तुझा फोन नंबर हुडकून काढतात काय. तुला फोन काय करतात. आणि लगेच हि बातमी मीडियापर्यंत पोहचते काय. काय वेळ साधली सगळ्यांनी. ग्रेट. मीडियाने तुमचा फोन टॅप केला होता कि तुमच्यापैकी कोणी मीडियाला कळवलं होतं? असो. काही असो. पण तुमच्या कुटुंबाने, यशोमती ठाकुरांनी, मीडियाने समाजासमोर एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे.

घरातलं माणूस बरं होऊन आल्यानंतर एवढं. तर तुझं लग्न असेल तेव्हा काय होईल. मला वाटतं तेव्हाही तू अशीच नाचशील. उपस्थित व्हराडी तुझ्यावरून अक्षता ओवाळून टाकण्याऐवजी नोटा उधळतील. मीडिया पिपाणी आणि ताशा लाजवेल. आणि तुला मुलं होतील तेव्हा.... तेव्हा तर काय एखादी मंत्रीणबाई बाळाची बाळुती धुवायला महिनाभर तुझ्या घरी मुक्कामच ठोकेल बहुदा.     

हा लेख व्हायरल होऊन त्या सलोनीपर्यंत पोहचला तर मला मनापासूनआनंद वाटेल. पण त्यापेक्षा समाजाने यातून काही बोध घेतला तर अधिक आनंद होईल.

भाजप राजकीय किड दूर करते आहे. परंतु सामाजिक किड कोणी तरी दूर करायला हवी ना. त्यासाठी मला असे लेख लिहिण्याची गरज वाटते. कुणाला मी कर्मठ वाटेल. परंतु संस्काराची जोपासना करणं हा कर्मठपणा असेल तर, होय आहे मी कर्मठ. 

Wednesday, 22 July 2020

जनहित केवळ तुमच्या मुखात

cartoon edited by vijay shendge

साहेब, शिवरायांचे नाव घेऊन, जनसेवेच्या हेतूने बाळासाहेबांनी पक्ष स्थापन केला. बाळासाहेबांच्या हयातीत त्यांनी सत्तेसाठी कधी अट्टाहास केला नाही. परंतु आपण मात्र बाळासाहेबांची चितेची राख खाली बसू दिली नाही.

Tuesday, 21 July 2020

राऊतसाहेब, बाजार बुणगे युद्ध लढत नसतात

cartoon edited by vijay shendge

राऊत साहेब, राम मंदिराच्या उभारणीचा पायाभरणीचा शुभारंभ ठरला. लगेच तुमच्यातला बेगडी, संधीसाधू हिंदू जागा झाला. आमच्या मनात हिंदुत्व अजून जागं आहे हे दाखवण्यासाठी तुमची टिमकी टिमटिमू लागली. मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नसलं तरी उद्धव ठाकरे पायाभरणीच्या सोहळ्याला उपस्थित राहतील असे आपण जाहीर

Monday, 20 July 2020

पोलीस भरती आणि दिवाना अब्दुल्ला

images by vijay shendge

कृती काहीही करायची नाही. नुसत्या घोषणा करायच्या, जनतेसमोर तुकडा टाकायचा. जनता आपली बसते चघळत. जनतेसमोर तुकडे टाकणं एवढंच महाबिघाडी सरकारचं काम. घोषणा केली कि त्यात जनतेचं सुख

Sunday, 19 July 2020

खान तसा खान

images by vijay shendge

'खाण तशी माती' हि म्हण मला अगदी तोंडपाठ आहे. तरीही मी 'खान तसे खान' असं शीर्षक लेखासाठी निवडलं आहे. त्याला कारणही तसंच घडलं आहे.  यातलं खान हे मुस्लिम धर्मीयांसाठी आहेत हेही खरं. जगा आणि जगू

Saturday, 18 July 2020

सडलेली शिक्षण व्यवस्था आणि कुजलेली बुद्धिमत्ता


आमची शिक्षण व्यवस्था आमच्या राजकीय व्यवस्थेने सडवलेली आहे. खरंतर या विषयावर २०० पानांचं पुस्तक होईल एवढं लिहिता येईल. परंतु पुस्तक लिहून काय होईल? हे सगळं चित्र बदलणार आहे का? जे मला दिसतंय ते आजवर कोणाला दिसलं नसेल का? कोणी या विरोधात लिहिलं नसेल का? परंतु लिहून काही साध्य होणार

Friday, 17 July 2020

गुण, गुणवत्ता आणि खिरापत

cartoon by vijay shendge

काल बारावीचा रिझल्ट लागला. आणि आपापल्या पाल्यांना मिळालेले यश सांगणाऱ्या, त्यांच्या टक्केवारीचे आकडे मांडणाऱ्या अनेक पोस्ट पडल्या. प्रत्येक पोस्टवर त्या मुलांचं कौतुक करणाऱ्या लाईक, कॉमेंटचा खच

Thursday, 16 July 2020

खुळखुळा, मोबाईल आणि कान किटवणारे शब्द

cartoon by vijay shendge

परवाच्या माझ्या 'शेतातला गहू आणि शहरातल्या बायका ..... ' या पोस्टवर फार मोजक्या महिलांच्या प्रतिक्रिया मिळाल्या. हि पोस्ट वाचूनदेखील अनेक महिला तिच्याकडे दुर्लक्ष करतील याची मला जाणीव होती. राजकीय पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल करणारे माझे मित्र, सामाजिक पोस्ट मात्र शेअर करत नाहीत. असं का?

Wednesday, 15 July 2020

सूर्याला गिळण्याचं धाडस हनुमानाने करावं

cartoon edited by vijay shendge

'सासूने तिजोरीच्या चाव्या सुनेच्या हातात द्याव्यात, पण स्वयंपाक घराचा ताबा सुनेकडे देऊ नये.' असं म्हणतात. शरद पवार तर तिजोरीच्या चाव्याही दुसऱ्याच्या ताब्यात देऊ इच्छित नाहीत. आणि स्वयंपाकघरात जाऊन