Sunday, 2 March 2014

Love Poem : घाव


ती नाही म्हणते तेव्हा त्याला कुणीतरी त्याची मानच कापली आहे असं वाटतं . ती आयुष्यात आली तेव्हापासून त्याला वेडचं होतं तिचं. ती आयुष्यात आल्यापासून आयुष्य कसं आभाळासारख भरगच्च वाटू लागलं होतं त्याला. दिवस छान मजेत चाललेले असतात. तिची भेट............तिचे डोळे............तिचं हसू ............खळाळनाऱ्या ओढ्यासारखे तिचे शब्द. याहून वेगळ्या आयुष्याची कल्पनाही करवत नव्हती त्याला. प्रत्येक क्षणी मनात तिचा विचार.

पण कुठेतरी काहीतरी बिनसतं. ती रागावते....
....सारी सारी स्वप्नं भिरकावून देते. त्याच्यासमोर आली तर वाकडी वाट करून निघून जाते. तो जणू साता जन्माचा वैरी असल्यासारखी वागते त्याच्याशी. तो खूप धडपडतो तिची समजूत काढायला. तिच्यासमोर साऱ्या स्वप्नांच्या पायघड्या घालू पाहतो. पण ती तिच्या निर्णयावर ठाम. नाही ! याला पुन्हा आपल्या आयुष्यात प्रवेश नाही.

ती नुसतीच अबोला धरत नाही त्याच्याशी. त्याच्या काळजावर घाव करत राहते. तो सांगू पाहतो तिला, " अगं, तू अशी घाव  करते आहेस माझ्या काळजावर. पण तुला कळत नाही तुझे हे घाव माझ्या काळजावर होत नसून तुझ्याच काळजावर होत आहेत. कारण माझं काळीज माझं उरलंय कुठे आता. ते तर सर्वस्वानं तुझ्या अधीन झालंय."

पण तिला त्याचा आक्रोश कळत नाही. ती त्याच्या भरू आलेल्या जखमांवर पुन्हा............ पुन्हा.............. पुन्हा घाव करत रहाते. तेव्हा त्याचा मनोगत व्यक्त करताना तो म्हणतो -
  
" जुने घाव भरण्या आधी
नवा घाव करत गेलीस
मान तर चिरली होतीस
काळीज सुद्धा चिरत गेलीस."





No comments:

Post a Comment