Thursday 11 June 2020

अपयशाचा महामेरू.... आघाडीने सावरू

vijay shendge images

महाराष्ट्रातली कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेच आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केवळ शब्दांचे बुडबुडे सोडत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे तर असे काही बोलत आहेत कि,
महाराष्ट्रा एवढी उत्तम व्यवस्था जगाच्या पाठीवर कोठेही नसावी. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख तर पोलिसांना मारहाण होताना केवळ बघ्याची भुमिका घेताना दिसले.

अनेकांना बेड मिळत नाहीत, एकाच बेडवर दोन दोन रोगी उपचार घेत आहेत, खाजगी रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिले आकारात आहेत. त्याविषयीच्या अनेकांच्या सत्य कहाण्या, भेसूर व्हिडीओ वॉट्सपवर फिरत आहेत. वास्तविक राजेश टोपे यांनीच महात्मा फुले जण आरोग्य योजने अंतर्गत खाजगी रुग्णालयात देखील कोरोना रुग्णांवर मोफत उपचार होतील असे जाहीर केले होते. पण तसे होत नाही. केवळ सगळे अलबेल असल्याप्रमाणे विधाने करायची, केंद्र सरकारला दोष द्यायचा, योगींवर टीका करायची, सोनी सुदच तोंड दाबण्याचा प्रयत्न करायचा, आणि आपलं अपयश झाकून ठेवायचं. 

राज्यात इतकी अनागोंदी मजल्याचं चित्र महाराष्ट्रात यापूर्वी कधीही पहायला मिळालं नाही. रुग्ण शेकड्यात होते तेव्हा लॉकडाऊनची योग्य अंमलबजावणी केली नाही. आणि आता रुग्ण संख्या लाखाला पोहचत असताना राज्यात लॉकडाऊन काढून टाकण्यात आलेलं आहे. हे सरकार महाराष्ट्राला नेमके कोठे नेऊन ठेवणार आहे? आघाडीने राज्याला भ्रष्टाचाराच्या खाईत लोटले होते, तर महाविकास आघाडी राज्याला रोगराईच्या जबड्यात लोटत आहे. खूप शोध घेऊनही राज्यातली आकडेवारी उपलब्ध झाली नाही. परंतु देशात जवळ जवळ १३ लाख बेड उपलब्ध आहेत. पैकी सर्वाधिक विकसित राज्य असलेल्या महाराष्ट्रात १ लाख बेड तरी असतीलच. पैकी ३० % बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवायचे असे सरकारी धोरण होते. म्हणजे ७० हजार बेड उपलब्ध होण्याची परिस्थिती. राज्यात आजही ४६ हजार रुग्ण उपचाराखाली आहेत. असे असताना खाजगी आयसोलेशन सेंटर उभारण्याची गरज का पडली? कि ते फक्त दाखवायला उभारले? कि रुग्णसंख्या लपवली आहे.

एकही पत्रकाराला या अनुषंगाने अभ्यास करावा असे वाटले नाही का? जलसिंचन योजनेत जसा प्रचंड घोटाळा झाला तसा यातही मोठा घोटाळा झाल्याचे पुढे समोर येणार आहे. नाहीतरी मेलेल्या मढ्याच्या टाळूवरचे लोणी खायचे हि आपल्या लोकशाही सत्तर वर्षाची संस्कृती आहे. सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करतअसल्याचे सांगते आहे. पण कोरोना काही आटोक्यात येत नाही. लोकांना शिवबंधन बांधून आपल्या गटात ओढता येतं. संजय रावतांनी कोरोनावर सुद्धा तो प्रयोग करून पाहावा.    

2 comments:

  1. जुगाड जुगाड जुगाड, भोगायला लागेल ह्याना. आज जनता भोगते आहे उद्या हे भोगतील.

    ReplyDelete
    Replies
    1. आपण कोण आहात? कुठे असता माहित नाही. परंतु आपला नियमित अभिप्राय येतो. मनापासून आनंद वाटतो.

      Delete