Saturday, 13 June 2020

एकात लाख, लाखात एक

vijay shendge images


सत्ताधाऱ्यांचे समर्थक त्यांचं समर्थन करतात. त्याचं दुःख अजिबात नाही. परंतु आपण आपल्या सरकारचं समर्थन का करतो आहोत याची चार कारणं कोणी देऊ शकत नाहीत. निसर्ग वादळ आलं आणि 'ते कसं येणार आहे ते आपल्याला माहित नाही. त्याची दिशा अद्याप ठरलेली नाही. हे आजवरचं सर्वात मोठं वादळ असणार आहे.' असली विधानं करून
उद्धव ठाकरेंनी केली तेव्हा महाराष्ट्राला इतका बालिश बडबड करणारा मुख्यमंत्री आजवर लाभला नाही याची जाणीव झाली. मुलाचं जनतेला संबोधताना त्यांनी जी भाषणं केली त्यात कधीही परीक्वता दिसली नाही. 


राज्यात इतकी अनागोंदी मजल्याचे आजवर दिसले नाही. महिना दीड महिना मी रोज कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा अभ्यास करत होतो. परिस्थिती सुधारेल अशी आशा होती. परंतु सगळ्याच बाजूने भडका उडालेला दिसत असताना पहात राहण्यापेक्षा अधिक काहीही करता येत नव्हतं. १००, २००, १०००, १० हजार, ५० हजार आणि आता १ लाख. कोरोना रुग्णांची हि फुगत चाललेली आकडेवारी बघता, राज्यकर्ते महाराष्ट्राला कोरोनाच्या विळख्यातून सोडवू शकतील हि आशा मावळली आहे. 'डब्लिंगचा म्हणजे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी जवळजवळ ३० दिवसांच्या आसपास पोचला आहे.' असं चार सहा दिवसापूर्वी राजेश टोपे म्हणाले होते. हे विधान म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. डब्लिंगचा कालावधी वाढला हे मान्य. परंतु १०० चे २०० व्हायला चार दिवस लागले असतील तर १००० चे २००० व्हायला आठ दिवस लागणारच. कि १००० चे २००० सुद्धा चार दिवसात झाल्यावर राज्यकर्त्यांनी हे सगळे गांभीर्याने घेतले असते. २५ हजार चे ५० व्हायला १२ दिवस लागले. म्हणजे प्रत्येक दिवशी सरासरी २०८३ रुग्ण सापडले. ५० हजारचे १ लाख व्हायला १७ दिवस लागले यात समाधान वाटावे असे काय आहे. म्हणजे रोज सरासरी २९४१ रुग्ण सापडले. अशा रितीने रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. आणि तुम्ही डब्लिंगचा कालावधी वाढला आहे असे सांगून जनतेच्या डोळ्यात धूळ फ़ेकताय.   

नगरसेवकापासून, मंत्र्यांपर्यंत प्रत्येकजण संधीचा फायदा घेतो आहे. प्रत्येकजण पैसे खातो आहे. त्यामुळेच जनतेची कोरोनाच्या विळख्यातून सुटका व्हावी अशी राज्यकर्त्यांची इच्छाच उरलेली नाही असे दिसते. महाराष्ट्रात पहिला रुग्ण सापडल्यापासून राज्य कोरोना मुक्त व्हावे यासाठी राज्यकर्त्यांनी एकही निर्णय घेतल्याचे मला दिसत नाही. लॉकडाऊन गांभीर्याने घेतले नाही. भाजी मार्केट सुरु केले. जिल्ह्याच्या सीमा लॉक असताना परराज्यातले मजूर त्या त्या राज्यात पाठवून दिले. त्यामागे तर आपले राज्य सडले आहेच परंतु हे मजूर गेल्यानंतर ती राज्येसुद्धा नासली पाहिजेत असाच हेतू दिसतो आहे. 

आणि म्हणजे मी देशातला सर्वाधिक कार्यक्षम मुख्यमंत्री. कोणत्या यंत्रणेने सर्व्हे केला होता? असले सर्व्हे पेरून एखाद्याची कार्यक्षमता सिद्ध होत नाही. जरा जनतेच्या मनात डोकावून पहा, इतका दळभद्री मुख्यमंत्री आजवर झाला नाही असेच जनता म्हणत असेल. करून दाखवले, करून दाखवले. काय करून दाखवले? कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीत महाराष्ट्र लाखात एक, आणि एका महाराष्ट्रात लाख रुग्ण हे करून दाखवले काय?   

व्यंगचित्र माझे फेसबुक फ्रेन्ड गणेश भालेराव यांचे आहे. हे व्यंगचित्र त्यांनी रुग्ण संख्या ५० हजार + झाली तेव्हा रेखाटले होते. मी त्यात केवळ ५० हजारांचे लाख केले आहेत. 

No comments:

Post a Comment