Thursday 18 June 2020

जनता तुमचं खत करेल

vijay shendge images


मिडीयाला, मोदी काय म्हणतात यापेक्षा संजय राऊत, आणि राहुल गांधी काय म्हणतात याला अधिक महत्व द्यावे वाटते हेच फार दुर्दैवाचे आहे. राफेल मुद्यावरून मोदींना चोर म्हणणारे हे, सर्जिकल स्ट्राईक केले तेव्हा पुरावे मागणारे हे. त्यात आमचे 'बिन आमदारी,
फुल नेतागिरी' करणारे हिरो सुद्धा सहभागी होते. असली मंडळी देशात असताना देश चालविणे किती कठीण असावे. जनतेला मोदींकडून कोणत्याही उत्तराची अपेक्षा नसते. आणि योग्य वेळ आल्यानंतर मोदी बोलणार आहेत हे जनतेला माहित असते. त्यामुळे तुमच्यासारख्या वीतभर झेप असलेल्या माणसांनी मोदींना जाब विचारू नये.

संजय राऊतांनी बेळगावचा प्रश्न सोडवला तरी खूप झाले. महाराष्ट्रात लागलेली आग आपल्याला दिसत नाही. सामान्य माणसाच्या हाल अपेष्टा होत असलेल्याच्या रोज एकेक कहाण्या समोर समोर येत आहेत. व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहेत. हे व्हिडिओ मराठी पत्रकारांना, आणि तुम्हाला दिसत नाहीत काय? त्यावर बोला कि काहीतरी. आधी त्याची उत्तरे द्या. तुम्ही आंतरराष्ट्रीय प्रश्नावर, चायनावर, पाकिस्तानवर, राम मंदिरावर बोलता तेव्हा उंदराने मांजराचे कान खाजवल्यासारखे वाटते. 

आणि राहुल गांधींनी आपल्याला वायनाड का गाठावे लागले? आपण अमेठीत पराभूत का झालोत? या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. ती उत्तरे शोधता शोधताच त्यांचा जन्म कडेला जाईल. हा नेहरू, गांधींचा देश नाही. मोदी कोणाला स्वतःहून कोणाला अंगावर घेत नाहीत. आणि कोणी अंगावर आले म्हणून नळावर भांडणाऱ्या बायकांसारखे वचावचा करत नाही. योग्य वेळी गरजेपुरते नक्की बोलतात. आपल्याला देशातले राजकारण कळत नाही आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाची भाषा करताय. अक्साई चीन कोणी निर्माण केले? १९६२ ला चायनाने किती भारतीय भूभागावर कब्जा केला? राहुलजी तुमच्या सत्तेला जे सत्तर वर्षात जमलं नाही असं चायनाला धडकी भरवणारं रस्ते उभारणीचं काम मोदींनी केलं आहे. त्यामुळे चायना पिसाळली आहे. पाम मोदी बघतील काय करायचं ते. तुम्ही नका तसदी घेऊ. तुम्ही आपले वायनाडपेक्षा सुरक्षित मतदारसंघ शोधण्याच्या कामाला लागा.  

विरोधकांचे कर्तृत्व शून्य. ते जनतेसाठी काही करत नाहीत. देशासाठी काही करत नाहीत. त्यामुळे त्यांचे अस्तित्व दिसून येण्यासाठी त्यांना वाचाळतेचा आश्रय घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. परंतु देशाच्या पंतप्रधानविषयी बोलताना जरा अदबीने बोलायला शिका. तुम्ही त्यांचा कचरा करण्याचा प्रयत्न केलात तर जनता तुमचं खत करेल एवढं तरी ध्यानात घ्या.  

2 comments:

  1. Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.

      Delete