Wednesday, 3 June 2020

शाळेची शाळा कशाला?

vijay shendge images


जेव्हा महाराष्ट्रात कोरोनाचे पाच पन्नास रुग्ण नव्हते तेव्हा आम्ही घरात बसून होतो. आणि आज ४० हजार रुग्ण असताना आम्ही मोकळे फिरणार आहोत. आजवर कोणत्याही मुख्यमंत्र्याच्या भाषणाची
खिल्ली उडवली गेली नाही एवढी उध्दव ठाकरें यांच्या भाषणाची खिल्ली उडविली गेली. हे कुणी जाणीव पूर्वक केलं असं नव्हे...परंतु इतकं पोरकट बोलणारा मुख्यमंत्री जनतेने आजवर पाहिला नाही. 


शाळा सुरू करायची घाई का? सातवी पर्यंतच्या शाळा आणखी दोन महिने सुरू नाही केल्या तर काय बिघडणार आहे? अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास का करायचे? निलेश पाटील, किरण करलकर या तरुणांची माहिती खोटी मानायची का? मुंबईत एक मृत देह सात आठ तास रस्त्यावर कसा पडून राहतो? पुण्यात सुध्दा असाच एक मृतदेह तीन चार तास रस्त्यावर का पडून होता? महाराष्ट्र पोलिसांना मारहाण होण्याच्या घटना शेकड्याने घडल्या त्याला जबाबदार कोण? हेच का कायद्याचे राज्य? 

बायको सोडून वारांगणेचा हात धरावा तसा दोन दिवस माध्यमांनी कोरोनाच्या बातम्या दाखवणे बंद केले. आता काय तर निसर्ग चक्रीवादळ. बरं बातम्यांमधून जनतेला दिलासा देण्याचे काम माध्यमं कधीच करत नाहीत. असे का? 

आमची कोरोनाशी लढण्याची तयारी आहे....पण कोरोनाची आहे का आमच्याशी लढण्याची तयारी? एखाद्याच्या घरी कोरोना पोहोचण्यापूर्वी आम्ही त्याच्या घरी जाऊन उपचार करतो आहोत, लॉक डाऊन करणे हे एक शास्त्र आहे....तर लॉक डाऊन उठवणे ही कला आहे.अशा विधानात उध्दव ठाकरेंची परिपक्वता कोणाला दिसते. 

लायक नसणारा माणूस मुख्यमंत्री होतो, पक्षाध्यक्ष होतो ही आमच्या देशाच्या लोकशाहीची शोकांतिका आहे. परंतु जनता यातून नक्की धडा घेईल.

इथे वापरलेले व्यंगचित्र हे माझे फेसबुक मित्र गणेश भालेराव यांचे आहे.

No comments:

Post a Comment