मित्रहो,
वेबस्टर डेव्हलपर हि iso आणि anriod डेव्हपमेंट क्षेत्रात काम करणारी भारतीय कंपनी.आज अनेक क्लाइंटसाठी हि कंपनी वेब डिसाईन, प्रोग्रामिंग, ईकॉमर्स प्लॅटफॉर्म डेव्हलपमेंटचे काम करते.
आपल्या सगळ्यांसाठी
एक असंच पूर्ण भारतीय बनावटीचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा त्यांचा विचार आहे. या व्यासपीठावर कवी, लेखक, चित्रकार, शिल्पकार, वादक, गायक अशा सर्व कलावंतांनी आपलं लेखन प्रकाशित करावं असा हेतू त्यांच्या मनात आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतरही भारतीय भाषेतील लेखकांना, कलावंतांना येथे मुक्तपणे वावरता येईल. आपल्या पोस्टमध्ये आपल्याला इमेजेस लोड करता येतीलच, परंतु आपले व्हिडीओ देखील आपल्याला इथे लोड करता येणार आहेत. इतकेच कशाला आपल्या साहित्यकृतींना, चित्रांना, शिल्पकृतींना रसिक ग्राहक उपलब्ध होतील असाही प्रयत्न करण्याचा कंपनीचा विचार आहे. वाचकांचे सुद्धा इथे स्वागत आहे.
या वेबपेजला 'आम्ही साहित्यिक आम्ही कलावंत' हे नाव असावे मला वाटते आहे. आणि या वेबपेजचा ऍड्रेस asak.in असू शकेल. asak हि आम्ही साहित्यिक आम्ही कलावंत या टायटलच्या इंग्रजी अद्याक्षरातील प्रत्येक शब्दाचे प्रथम अक्षर असणार आहे. इतके छोटे नाव असल्यामुळे तो टाईप करताना चुका होण्याची शक्यता फारच कमी राहाणार आहे.
आपणही या वेबसाईटसाठी असे सर्वसमावेशक नाव सुचवावे.
No comments:
Post a Comment