हा लेख प्रत्येक स्त्रीला लागू आहे असे मानण्याचे काहीही कारण नाही. प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात. तसंच माझं सासर हेच माझं सर्वस्व असं मानणाऱ्या स्त्रिया असतातच. परंतु अशा स्त्रियांचं प्रमाण फार कमी असतं. सर्वसाधारणपणे स्त्रीला तिचा नवरा, तिची मुलं यापेक्षा दूरचं काहीही दिसत नाही. स्त्रिया फार हुशार असतात.
नवरा धोरणी नसला तर त्या त्याला अगदी सहज गुंडाळून ठेवतात. सासरची माणसं त्यांना फारशी खपत नाहीत. आणि माहेरच्या माणसांशिवाय करमत नाही. आमच्या हिंदू संस्कृतीत वाढलेल्या स्त्रीची हि कथा. तर या मातीशी, या संस्कृतीशी, इथल्या संस्कारांशी कोणतंही नातं नसलेल्या सोनिया गांधींची अवस्था कशी असेल? सोनिया गांधी यांना या देशाविषयी. या मातीविषयी, इथल्या जनतेविषयी प्रेम असण्याची सुतराम शक्यता असेल असं मला वाटत नाही.
काही दिवसांनी सोनिया गांधी यांचं मूळ नाव ऍन्टोनिया अल्बिना माईनो हे होतं याचा आम्हाला विसर पडलेला असेल. बार अटेंडंट म्हणून काम करणाऱ्या या बाईंची राजीव गांधी यांच्याशी पहिली भेट बारमध्येच झाली. राजीव गांधी इंजिनिअरिंग पूर्ण करू शकले नाहीत पण सोनियाचा हात धरून बोहल्यावर चढले. पुढे राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान झाले. गुणवत्ता काय तर आजोबा पंतप्रधान होते, आई पंतप्रधान होती. त्यामुळे ते पंतप्रधान झाले. हीच आमची लोकशाही.
देश स्वतंत्र झाला. सरंजामशाही मोडीत काढली. संस्थाने खालसा करून लोकशाहीत विलीन केली. राजे राजवाडे सरकारजमा केले. लोकशाही आणली आणि काय साधले? तर गेली साठ पासष्ट वर्षे एक गांधी घराणं या देशावर राज्य करतं आहे. मोदी सत्तेत आले तर मोदी हटावच्या घोषणा दिल्या जात आहेत. ज्या पक्षात लोकशाही नाही ते पक्ष देश लोकशाही पद्धतीने कसे चालू देतील?
तर मुद्दा असा कि सोनिया गांधी यांना या देशाविषयी प्रेम असण्याची तिळमात्र शक्यता नाही. त्यामुळेच राफेलचा विषय असो, पाकिस्तान विषय असो, काश्मीर प्रश्न असो, दिल्लीतलं शाहिनबाग प्रकरण असो अथवा चायना-भारत वाद असो गांधी कुटुंबीय कायम देशविरोधी विचारांना खतपाणी घालत राहिलं आहे. हातात पुरावे नसताना बेछूट आरोप करत राहिलं आहे. परवाच्या वादात 'चीनने कोणतीही घुसखोरी केली नाही' असं सरंक्षणमंत्री, लष्करप्रमुख, पंतप्रधान सांगत आहेत परंतु तरीही सोनिया गांधी आणि राहुल गांधी चीनने भारतीय भूभाग बळकावल्याचा आरोप करत आहेत. दळभद्री मीडिया 'तुमच्याकडे काय पुरावा आहे?' असे न विचारता त्यांच्या बेछूट वक्तव्यांना प्रसिद्धी देत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि सोनिया गांधी यांचे देशप्रेम एकसारखे असू शकेल काय? महाराज या मातीत जन्मले. मुगलांच्या राज्यात पिचलेली जनता त्यांनी पाहिली आणि हिंदवी स्वराज्य उभारण्याचा संकल्प केला. सिद्धीस नेला. या बाईचे काय? इटलीत बार अटेंडंट होती. या देशातल्या सर्वात जुन्या पक्षाची अध्यक्ष झाली. आज शरद पवार असोत, उद्धव ठाकरे असोत, ममता बॅनर्जी असोत, ज्योतित्याराजे असोत, दिग्विजय सिंग असोत त्यांना शह देऊ शकत नाही. जन्माच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी सोनिया गांधींच्या विरोधात भूमिका घेताच सोनिया सोनिया गांधींनी पवारांना पक्षातून हाकलून दिलं. त्यांच्या परवानगीशिवाय महाराष्ट्रातलं तिघाडीचं सरकार अस्तित्वात येऊ शकलं नाही. राजीव गांधी यांचा हात धरून सून म्हणून या देशात आलेली एक बाई देशविरोधी शक्तींना खतपाणी घालतो. आणि तरीही काही मंडळी तिची तळी उचलून धरतात. हि आमच्या लोकशाहीची शोकांतिका आहे. हि बाई उद्या देश विकू शकते. राहुल गांधींसह इटलीला जाऊ शकते. नशीब एवढंच कि भाजपसारखा एक अत्यंत प्रगल्भ विचारधारा असलेला पक्ष अस्तित्वात आला. सगळ्या अडचणींना तोंड देत सत्तेत आला. अजूनही आपण कोणाच्या पाठीशी जायला हवं याचा विचार जनतेने करायला हवा. काँग्रेस नको असं नव्हे. काँग्रेस हवीच पण गांधी घराणं नको.
No comments:
Post a Comment