Thursday, 4 June 2020

कोरोना : आपत्ती नव्हे संधी, कोणी, किती खाल्ले असतील?

vijay shendge images


कोरोना आला आणि अनेकांनी आपत्ती नव्हे संधी म्हणत आपापले खिसे भरले. दारूचा काळा बाजार झाला, १५ ची गायछाप ४० पन्नास रुपयाला विकली गेली. सिगारेट सुद्धा १०० चे पाकीट दोनशेला विकले गेले. मी परवा सेल घ्यायला गेलो.
दहाचा सेल २० ला सांगितला. प्रत्येकजण आपापल्या परीने जनतेला वेठीला धरत होता. डॉक्टर सुद्धा मागे नव्हते. किरण करलकर याचा अनुभव पुरेसा बोलका आहे. मुळात आमच्या जनतेची अन्याया विरोधात बोलण्याची मानसिकताच नाही. लेखातून एखादा पुढे येतो बोलतो. बाकी सगळे सहन करत बसतात.

लॉक डाऊन सुरु झालं. बसणारे घरात बसले. फिरणारे मात्र पोलिसांच्या लाठ्या खात गावभर फिरत होते. सत्ता भोगायची म्हणून हवं ते करून, महाविकास आघाडी हे नाव धारण करून सगळे लोभी सत्तेत बसले. लॉक डाऊनमुळे विकास काम सगळीच थांबली. परंतु याचं अर्थ सत्ताधाऱ्यांना चरायला कुराण मिळालं नाही असा नव्हे. माणुसकीच्या गप्पा फक्त मध्यमवर्गीय मारतो. परंतु उच्चवर्णीय, गरीब आणि पुढाऱ्यांसाठी अशी नैसर्गिक आपत्ती हि भ्रष्टाचाराची संधीच असते. पुठ्ठयाच्या जे बेड तयार करण्यात आल्या आहेत त्यातही मोठा भ्रष्टाचार असणार आहे. ऐकीव माहिती आहे. पण पुरावा नाही म्हणून नमूद करत नाही. परंतु आपल्याला ऑर्डर मिळते म्हटल्यावर मी कोणाला किती चारले हे कोण सांगणार हो?  

मुख्यमंत्री साह्यता निधी हे खूळ काँग्रेसनेच आणलं. १९६७ ला काँग्रेसने तसा कायदा करून घेतला. त्या नियमात वेळोवेळी जे काही बदल केले ते काँग्रेस, राष्ट्र्वादीनेच केले. गेल्या वर्षीच्या पूर परिस्थितीत फडणवीस सरकारने जनतेकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा केली नव्हती. परंतु कोरोना आला आणि पहिल्यांना मुख्यमंत्री साह्यता निधीला मदत करण्यासाठी आव्हान केलं गेलं. त्यात किती पैसे जमा झाले. आणि त्यातले किती खर्च झाले त्याचा हिशोब कोण देणार?  

शिर्डी देवस्थानाने कोव्हीड १९ मदत निधीसाठी ५१ कोटी रुपये दिले आहेत. परंतु राज्यातील सर्वाधिक श्रीमंत असणाऱ्या सिद्धिविनायक देवस्थानाने केवळ ५ कोटी दिले. शिर्डी पेक्षा जास्त नाही परंतु २५ कोटी तरी द्यायला हवे होते ना? पण नाही कारण एकच त्याचे ट्रस्टी शिवसेनेचे आदेश बांदेकर आहेत. असो त्याविषयी सुद्धा तक्रार असण्याचे काही कारण नाही. परंतु कोणत्याही मुस्लिम ट्रस्टने, ख्रिस्ती धर्मदाय संस्थांनी किती देणगी दिली? 

तेही जाऊ द्या, देवस्थानांचे सोने ताब्यात घ्यावे असे म्हणणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांनी फंडाला किती देणगी दिली? स्वतःची १२५ कोटीची मालमत्ता असल्याचे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी किती मदत दिली? आठ एकरात ११० कोटींच्या वांग्याचं उत्त्पन्न घेणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी किती देणगी दिली? सोबत एक यादी जोडली आहे. ती शासनाच्या साईटवरून घेतली आहे. लिंक सुद्धा दिली आहे कोणीही यादी चेक करावी. मित्रांनो एक लक्षात घ्या हे सरकार स्वतःच्या खिशात कधीही हात घालणार नाही. तुम्हाला काही देणार नाही. वेळ आली तर तुमच्या माना मोडून तुमच्या खिशातलेच चाराणे, आठाणे हे काढून घेणार आहेत. 

मुख्यमंत्री साह्यता निधीत २६६ कोटी जमा झाले आहेत. अशी बातमी होती. त्यातले केवळ २३ कोटी खर्च झाले. महाराष्ट्र हे सर्वात विकसित राज्य म्हणायचे आणि काही झाले कि केंद्राकडे याचना करायची कशासाठी? तिजोरीत पैसे नाहीत म्हणत सरकारी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे २५ % वेतन दिले नाही. आमदारांचे पगार सहा महिने थांबवले असते तर काय बिघडले असते. महाविकास आघाडीने कसे भ्रष्टाचार केले त्याचे आकडे योग्य वेळी पुढे येतीलच. परंतु कोरोना हि सामान्य माणसासाठी आपत्ती असली तरी. अनेकांनी या आपत्तीकडे संधी म्हणूनच पाहिले आहे. 

No comments:

Post a comment