जेष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचा मला खूप सहवास लाभला. त्यांनी चित्रकलेचं कोणतंही शिक्षण त्यांनी घेतलेलं नव्हतं. ते तसे शास्त्र शाखेचे पदवीधर. तरीही वयाच्या ३५ व्या वर्षी व्यंगचित्र रेखाटावी असं त्यांच्या मनात आलं. आणि पुढल्या चाळीस वर्षात त्यांनी हजारो व्यंगचित्र काढली. आणि
संपूर्ण देशभरात ८० हुन अधिक प्रदर्शने भरवली.
मला व्यंगचित्र काढता येत नाही. शब्दांचं वेड आहेच. परंतु आपल्याला एखादं वाद्य वाजवता यावं अशीही खूप इच्छा होती. पंधरा सोळा वर्षांपूर्वी तबला, हार्मोनियम शिकायला जायचो. जगण्याच्या धावपळीत ते नाहीच साधलं.
माझ्या आवाजाच्या मर्यादा मला माहित आहेत. तरीही मी माझ्या ग्रामीण गीतांच्या जोरावर तास दिड तासाचा कार्यक्रम सादर करतो. अर्थात मानधन घेऊन. माझ्या ग्रामीण गीतांना ज्या काही चाली आहेत त्या मी कोणत्याही लोकप्रिय गीतावरून उचललेल्या नाहीत. त्या उस्फुर्त आहेत. त्यामुळे कधी कधी परमेश्वराचा राग येतो. वाटतं त्याने चांगला आवाज दिला असता तर आपण गीतकार होऊ शकलो असतो. मी बारावीला असताना काही चित्रं माझ्या मित्रांनी त्यांच्या घरात फ्रेम करून लावलेली आहेत. म्हणजे चित्रकलेचं अंग अगदीच नाही असं नाही. परंतु जेवढं हवं तेवढं चित्रकलेचं ज्ञान नाही.
अशा अनेक गोष्टी परमेश्वराने माझ्या ओंजळीत टाकल्या पण लेखन सोडलं तर तर सगळ्या गोष्टी अर्धवट. त्यामुळे एकीकडे परमेश्वराचा राग येत असला तरी दुसरीकडे मी त्याचे आभार मानत असतो. कारण त्याने परिपूर्ण आणि निरोगी देह दिला. मनगटात ताकद दिली. लेखनाचं अंग दिलं.
कला कोणतीही असो ती रक्तात असावी लागते असं माझं मत आहे. यमक साधून कवी होता येत नाही. आणि वाचन करून लेखक होता येत नाही. अभिनवला प्रवेश घेतला म्हणून चित्रकार होता येत नाही. शिक्षणाने अंगभूत गुणांना वळण लावता येतं परंतु जातिवंत कलावंत घडत नाही. असो .
तर मला व्यंगचित्र काढता येत नसली तरी, व्यंगचित्रांच्या अनेक कप्लना मनात धुमाकूळ घालत असतात. आणि त्यामुळे मी नेटवरून व्यंगचित्रे घेऊन त्यात काही बदल करून ती माझ्या पोस्ट समर्पक होतील अशी काळजी घेऊन पोस्ट करत असतो. रंगपंचमीला राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पाणी टाकल्यामुळे शिवसेनेच्या वाघावरचा हिंदुत्वाचा रंग उडून गेला अशी कल्पना मनात आहेत. पण तसे चित्र रेखाटने मला कसे जमणार?
खालील कुत्र्याचे चित्र मला असेच व्हाट्सअपवर आले होते. आणि त्या हातात घड्याळ दाखवले कि काम झाले अशी कल्पना नातं आली. त्यातच सायन्स, आर्टचा फंडा त्यात वापरावा असेही वाटले. खात्री आहे चित्र तुम्हाला नक्की आवडेल. आणि आवडलं तर श्वर करायला विसरू नका.
No comments:
Post a Comment